Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026

    पहिली आरती

    September 23, 2026

    वास्तुशास्त्र आणि नवीन घर निवडण्याचे महत्त्वाचे नियम

    September 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सुमन आणि राधा…
    ललित

    सुमन आणि राधा…

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यSeptember 23, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, डॉ विवेक वैद्य, डॉक्टर विवेक वैद्य, लेखक डॉक्टर विवेक वैद्य, लेखक विवेक वैद्य, चहाची सवय, चहा आणि आठवणी, चहाची चव, अमृततुल्य चहा, चहाचे शौकिन, विंग्ज हॉस्पिटल, सुमन आणि राधा, सिस्टर सुमन, सिस्टर राधा, सुमन नर्स, राधा नर्स, राधा मैत्रीण,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पूर्वार्ध

    मी मुंबईत विंग्ज (Wings) या खासगी हॉस्पिटलला आरएमओ (निवासी वैद्यकीय अधिकारी) म्हणून लागलो. कामाचा अनुभव नव्हताच फारसा… त्यातच एवढे मोठे महानगर आणि ते छोटेसे का होईना, पण चकचकित हॉस्पिटल! नाही म्हटले तरी, थोडेसे दडपण होते मनावर. तीन डॉक्टर मिळून हे हॉस्पिटल चालवत होते. त्यांचे ते फ्लुएंट इंग्लिशमधून बोलणे बघून जीव दडपायचा. पण दोन-चार दिवसातच लक्षात आले की स्टाफ खूप को-ऑपरेटिव्ह आहे. रिसेप्शनिस्ट केतकी, वॉर्डबॉय अशोक, सफाईवाली मंजुबाई ही सर्व मराठी मंडळी. तर सिस्टर सुषमा, राधा, सुमन या केरळच्या. मी नवखा असल्याने मला नाइट ड्युटी नव्हती. रात्रीचा स्टाफ वेगळा होता. त्यातला रात्रीचा आरएमओ डॉ. केतन शाह याच्याशीच थोडे काम पडायचे. दिवसा जे नवीन पेशंट ॲडमिट झालेले असायचे, त्याची माहिती मला त्याला द्यावी लागायची.

    थोड्याच दिवसात मी इथे चांगलाच रूळलो. स्टाफशी माझे चांगलेच पटू लागले. याचे कारण कदाचित हे असावे की, सगळा स्टाफ मध्यमवर्गीय आणि मीही मध्यमवर्गीय! स्टाफ सगळा मुंबईत राहणारा असला तरी, बहुतांश चाळीत राहणारा, तर मीही छोट्या शहरातला… Down to earth. त्यांना मी आपल्यातला न वाटलो तर नवलच. त्याआधीचे आरएमओ बहुतेक मुंबईचे आणि हायफाय असावेत… असो. पण त्यामुळे माझ्यात आत्मविश्वास आला आणि तो आत्मविश्वास माझ्या कामातही दिसू लागला.

    ज्या तीन नर्स दिवसा कामाला होत्या. त्यातल्या सुमन आणि राधा या सख्ख्या बहिणी होत्या, हे मला बऱ्याच उशिरा कळाले. सुमन बारीक, सावळी आणि गंभीर. तर, राधा गोरी किंचित स्थूलपणाकडे झुकणारी, मात्र सतत हसणारी. या दोघी बहिणी विक्रोळीच्या कोणत्या तरी चाळीत भाड्याने राहायच्या. सुमन विवाहित, तिला पाच-सहा वर्षांची मुलगी. तिचा नवराही कामाला जायचा. मुलगी शाळेत जायची सकाळी. दुपारी घरी यायची. सुमन आणि राधा दोघी एकमेकांच्या ड्युट्या सांभाळून घ्यायच्या, मुलीला सांभाळता यावे म्हणून. सकाळी 6 ते 2 आणि दुपारी 2 ते 10 अशी ड्युटी असायची. पण रात्रपाळीच्या सिस्टर रात्री 8 ते सकाळी 8 ड्युटी करायच्या त्यामुळे सकाळी सात-साडेसात वाजेपर्यंत आले तरी चालायचे आणि रात्री 9 वाजता जाताही यायचे.

    हेही वाचा – आपल्यांचा आपलेपणा…

    या सगळ्या गडबडीत राधाशी माझे छान जमायचे. सुरुवातीला तिनेच मला हॉस्पिटलच्या रितीभाती शिकवल्या. या दोघी बहिणी तीन-चार वर्षांपासून तिथे काम करत असल्याने पेशंटला कसे ट्रीट करायचे, काय काय इन्व्हेस्टिगेशन्स करायच्या आणि केव्हा ॲडमिट करायचे इथपासून केव्हा मोठ्या हॉस्पिटलला पाठवायचे इथपर्यंत सगळे त्यांना माहीत होते. ते सगळे मला राधाने शिकवले. राधा अगदी मनमोकळी. कधीही खदखदून हसायची… अगदी बोलता बोलता सहज टाळीसाठी हात पुढे करायची. तिचे दात एकदम पांढरेशुभ्र होते…

    माझा पहिला पगार झाला, तेव्हा सगळ्या स्टाफसाठी मी हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या हॉटेलमधून गरम कचोऱ्या मागवल्या. सगळ्यांनी कचोऱ्या खाल्यानंतर राधा माझ्याकडे आली आणि हळू आवाजात म्हणाली… “मेरेकु कचोरी नहीं फालुदा चाहिये.”

    फालुदा तिथे कुठे मिळतो मला माहीत नव्हते. तो बऱ्यापैकी महागही असायचा. माझा पगार जेमतेम होता. मी काकाकडे राहायचो. दोन बस बदलून मला हॉस्पिटलला यावे लागायचे. बसला भाडे लागायचे. काकाची परिस्थिती चांगली असल्याने तिथे खाणे-पिणे आणि राहणे याचे पैसे द्यावे लागायचे नाही. (काकाची परिस्थितीच नाही, तर स्वभावही चांगला होता. काकूंचाही.) राधाने फालुदाचा आग्रह धरला आणि तो मोडणे मला शक्यच नव्हते. मी तिलाच सांगितले की, जेव्हा आपल्या दोघांना रिकामा वेळ असेल तेव्हा जाऊ. पण बाकीच्या स्टाफला सांगू नको नाहीतर एवढ्या सगळ्यांना फालूदा देऊन माझे पाकीट खाली झाले असते!

    सगळ्या स्टाफला दुपारी दीड ते तीन जेवणाची सुट्टी मिळायची. (इमर्जन्सीसाठी एक-दोन जण असायचे.) मी जेवायला घरी काकाकडे जायचो. जाण्या-येण्यातच सव्वा तास लागायचा. अक्षरशः पंधरा मिनिटांत भराभर जेवण करावे लागायचे.

    मी आणि राधा सोबत जाणार असलो, तर फक्त जेवणाच्या वेळीच जाऊ शकलो असतो. यावर शक्कलही राधानेच काढली. तिने सांगितले, ती डबा घेऊन येते घरून दोघांचा… म्हणजे माझा जायचा-यायचा वेळ वाचेल. इथेच जेवण करू आणि फालुदाही घेऊ. मला नाही म्हणण्याचे कामच नव्हते.

    त्यादिवशी ती डबा घेऊन आली आणि जेवणाच्या सुट्टीत मला घेऊन पुढच्या गल्लीत असलेल्या एका हॉटेलमध्ये गेली. हॉटेल छान होते. लहान जागेत बसवलेले. टेबलं-खुर्च्या सुबक. स्वच्छ स्टीलच्या ताट-वाट्या. राधाला ओळखणारे बरेच जण असावेत. कारण, ती मला डायरेक्ट फॅमिली रूममध्ये घेऊन आली. वेटरकडून पाणी मागितले. तिथे बाहेरचे पदार्थ आणून खाण्यास मनाई होती. पण राधाला कोणी बोलले नाही, त्याअर्थी तिथे तिचा बऱ्यापैकी वट असावी.

    “पहिले खाना खाते हैं.”

    “नहीं… पहिले फालुदा.”

    आम्ही फालुदा मागवला. तिचे म्हणणे पटले… जेवण केल्यावर एवढा मोठा ग्लास भरून फालुदा गेलाच नसता. फालुदा मात्र छानच होता. त्यानंतर तिने डबा काढला. पोळी-भाजी, रस्सम भात, वेफर्स आणि काही तळलेले पदार्थ होते. भाजी बरी होती, पण रसम मात्र उग्र आणि तिखट होता… वेफर्स आणि त्या तळलेल्या पदार्थांना वेगळाच वास येतं होता. (नंतर समजले की, ते तळण्यासाठी खोबरेल तेल वापरतात.)

    जेवण वेगळे होते. आवडले यासाठी की, तिने खास माझ्यासाठी ते बनवून आणले होते!
    जेवण झाल्यावर तिने पुन्हा पुन्हा “अच्छा लगा ना खाना?” विचारले तेव्हा तिच्यातली गृहिणी मला दिसत होती. मला तिचे हे वेगळे रूप खूप भावले. जेवण झाल्यावर मी निघणार तेवढ्यात राधा म्हणाली, “रुको. अभी आधा घंटा है. जायेंगे आरामसे.”

    “हॉटेलवाला कुछ बोलेगा नहीं?”

    “नहीं बोलेगा. उसका लडका अपने हॉस्पिटल में भरती था…”

    मला हॉटेलवाले राधाला काही बोलत नाही, याचे रहस्य कळाले. मग तो अर्धा तास मी तिच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. केरळच्या कुठल्यातरी खेड्यातली होती ती. चार बहिणी, दोन भाऊ. दोन बहिणींची लग्न झालेली. त्यातलीच एक सुमन. चारपैकी तीन बहिणींनी नर्सिंगचे शिक्षण घेतलेले.

    सुमननेच तिला इकडे बोलवले, म्हणजे इकडे नोकरी करता येईल. लग्न जमवता येईल.

    राधा मोकळेपणाने बोलली. माझ्याबद्दल तिने फारसे काहीच विचारले नाही. पण एक अंदाज मी लावला की, त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसावी. वडील दारूबिरू पिणारे असतील आणि त्यांनीच राधाला सुमनकडे पाठवले असावे.

    बोलता बोलता राधाने ती दहावी कोणत्या वर्षी पास झाली, ते सांगितले. तिला मी तिची जन्मतारीख विचारली नाही. ते विचारणे योग्य दिसले नसते. पण माझ्या अंदाजानुसार ती माझ्यापेक्षा वयाने एक ते दोन वर्षांनी मोठी असावी.

    दिवस पळत होते. मी सराईतपणे काम करू लागलो. स्टाफ डॉक्टर सगळे चांगले होते. मीही सगळ्यांशी जमवून घेत होतो… मला कुठे इथे कायमचे राहायचे होते? कशाला वाईट बोलून कुणाला दुखवायचं? एकदा सकाळी सुमनची ड्युटी होती, ती आलीच मुळात चेहरा उतरवून. तिची तब्येत अजिबात चांगली नव्हती. तिला ड्युटीवर असताना उलटी झाली. मी तिला तातडीने रिकाम्या रूममध्ये तपासले, इंजेक्शन दिले… आणि तिच्या वाटेचे काम मी आणि सिस्टर सुषमा यांनी मिळून केले. शिवाय, डॉक्टरांना सांगून तिला दोन दिवसांची रजाही मिळवून दिली. खरेतर, ही काही मोठी गोष्ट नव्हती; पण सुमनचा माझ्याबद्दल आदर वाढला.

    हेही वाचा – बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    राधाबरोबर दर आठवड्याला आता बाहेर जेवण चालू झाले होते. तो तास-दीडतास माझ्यासाठी एक रीफ्रेशिंग गोष्ट होती. पैसे बरेचदा तीच भरायची, कारण तिचा पगार माझ्यापेक्षा जवळजवळ दुप्पट होता आणि डिस्चार्ज मिळाल्यावर पेशंट त्यांना ‘खुशी’ म्हणून पैसे द्यायचे. राधा माझ्यासोबत वेड्यासारखी बोलायची, आणि वेड्यासारखी हसायची. त्या हास्याने मला वेड लागेल का? असे वाटू लागले. हॉस्पिटलमध्ये तिच्याशिवाय माझे पान हालत नसे. अर्थात, मी काही माझ्या मनाच्या भावना तिच्यापुढे मांडल्या नाहीत. कदाचित, ती जरी माझ्यासोबत मोकळेपणाने बोलत असली, तरी तिने कधीच माझ्याबद्दलच्या काही भावना सांगितल्या नाहीत, हे कारण असावे.

    मला सुमनचीही चिंता होती. माझ्या आणि राधाच्या संबंधाबाबत तिचा काही गैरसमज व्हायला नको. पण एके दिवशी सुमनच माझ्याकडे आली आणि म्हणाली, “डॉक्टर विवेक, फुरसत में मिलना मुझे अकेले में. थोडा बात करना है तुझ से…” (हे लोक बरेचदा ज्युनिअर डॉक्टरांना अरेतुरे करतात.)

    क्रमश:
    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    पहिली आरती

    September 23, 2026 ललित

    बिस्किटं… दोन कोटींची!

    September 22, 2026 ललित

    टिपिकल

    September 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पहिली आरती

    By सतीश बर्वेSeptember 23, 2026

    गणपतीच्या आधी आठवडाभर तिला फोन करून सांगायला मी फार उत्सुक असायचो इतकी वर्षे – “पहिल्या…

    बिस्किटं… दोन कोटींची!

    September 22, 2026

    टिपिकल

    September 22, 2026

    ललिताची खरेदी

    September 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026

    पहिली आरती

    September 23, 2026

    वास्तुशास्त्र आणि नवीन घर निवडण्याचे महत्त्वाचे नियम

    September 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : स्नेहाचिया भरोवरी, आंबुथिला दीपु घे थोरी

    September 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 सप्टेंबर 2026

    September 23, 2026

    बिस्किटं… दोन कोटींची!

    September 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 445
    • अवांतर 214
    • आरोग्य 149
    • पंचांग आणि भविष्य 595
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 940
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026

    पहिली आरती

    September 23, 2026

    वास्तुशास्त्र आणि नवीन घर निवडण्याचे महत्त्वाचे नियम

    September 23, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.