Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    September 11, 2026

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरी पुरुष अनादि आथी, आणि तैंचि लागोनि प्रकृति

    September 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, September 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » हो, मी आहे मध्यमवर्गीय!
    ललित

    हो, मी आहे मध्यमवर्गीय!

    तृप्ती देवBy तृप्ती देवSeptember 10, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, तृप्ती देव, लेखिका तृप्ती देव, मध्यमवर्गीय, अभिमानाने जगणारे मध्यमवर्गीय, समृद्ध आयुष्य, संसार व्यवस्थापन, संसार व्यवस्थापनात गोल्ड मेडल, समंजस मध्यमवर्गीय, समृद्ध मध्यमवर्गीय
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रविवारचा दिवस. संपूर्ण आठवड्याच्या धावपळीनंतर एक निवांत श्वास घेण्याचा दिवस. घरात सगळे जमलेले असतात. कुणाला उठायला उशीर होतो, कुणी पेपर वाचत असतो, कुणी चहा घेऊन टेरेसवर बसलेलं असतं. पण एक गोष्ट ठरलेली असते – आज जेवण स्पेशल असणार!

    हॉटेलिंग?

    ऑनलाइन फूड?

    छे! आमच्यासारख्या मध्यमवर्गीय घरांमध्ये या ‘लक्झरी’ गोष्टी फार कमीच परवडतात. त्यात आजीचं वाक्य आठवतं –

    “हॉटेलात पैशाने स्वाद मिळतो, पण घरात मनाचे प्रेम!”

    म्हणूनच आज आईच्या हातचा बटाट्याचा रस्सा, पापड, कोशिंबीर, गरमागरम पोळ्या आणि एखादं गोड – कधी श्रीखंड तर कधी फक्त गुलाबजाम!

    बाबा रेडिओवर गाणी लावतात – ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू…’

    आणि स्वयंपाकघरातून येणारा फोडणीचा आवाज, पातेल्यातून निघणारा वाफाळता बटाट्याचा घमघमाट…

    आईच्या चेहऱ्यावर हलकीशी घामाची धार, पण डोळ्यांत समाधान – कारण सगळ्यांनी आज तिच्या हातचं जेवण ‘हॉटेलपेक्षा भारी’ म्हणत ताटात पुरण वाढून घेतलं!

    रविवार म्हणजे केवळ सुट्टी नव्हे… रविवार म्हणजे घरातली ऊब, प्रेमाने सजलेली चविष्ट दुपार… आणि आयुष्याच्या छोट्या छोट्या आनंदांची पुन्हा एकदा आठवण!

    हेही वाचा – बिघाड

    बाबा वर्तमानपत्रात गुंतले आहेत. अमेय सोफ्यावर बसून कॉलेजचे फॉर्म भरतोय.

    “बाबा, एमआयटीचा फॉर्म भरतोय. फीस 15 हजार आहे पहिल्यांदाच!”

    बाबा डोळ्यांवरचा चष्मा नीट करतात. एक दीर्घ श्वास घेतात… “भर रे… भर… तू फक्त शिक. बाकीचं आम्ही बघतो.”

    “पण बाबा, तुमचं रिटायरमेंट दोन वर्षांनी आहे ना? तेवढं करून घ्यावं लागेल सगळं…” अमेय बोलता बोलता थांबला.

    बाबांनी पेपर बाजूला ठेवला. हळूच म्हणाले – “मुला, आपण मध्यमवर्गीय. आपलं आयुष्य म्हणजे एक मोठं गणित असतं आणि त्यात ‘उत्तर मिळालं की सुटतं’ असं काही नसतं. कारण गणिताच्या प्रश्नांपेक्षा आयुष्याचे प्रश्न आधीच येतात!”

    1988

    नवीन लग्न झालेलं. बाबांचं नवीन नोकरीत पदार्पण. आई नुकतीच घरात आली होती. त्या दोघांनी मिळून स्वप्न पाहिलं – घर घ्यायचं, मुलं शिक्षण घेणार, एकदा सगळं सेट झालं की, थोडा आराम करायचा.

    पण गणिताचं पहिलं प्रमेय आधीच समोर उभं राहिलं – “पगार 3500, EMI 1500!”

    तेव्हा कोणतंही फायनान्शियल प्लॅनिंग नव्हतं, पण होतं ते मनातलं व्यवस्थापन. कोणती साडी पुढच्या वर्षीच्या सणासाठी ठेवायची, चपातीचं पीठ दोन दिवस पुरवायचं आणि कोणत्या महिन्यात ‘सिनेमा’ म्हणतोय तो खरंच पाहायचा का फक्त जाहिरातीतच?

    1995

    अमेयचा जन्म झाला. मुलगा घरात आलाय म्हणजे नवीन हिशोब सुरू. आई-बाबांनी कपड्यांपासून ते दवाखान्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत काटकसर केली. कुणी आजी म्हणाली – “बाळासाठी सोन्याचं पैंजण घालायचं रे…” आईने नुसतं हसून विषय बदलला.

    ते पैंजण त्या घरात नव्हतं, पण घरात प्रेम आणि काळजी सोन्यासारखी चमकत होती.

    2005

    अमेय चौथीत. शाळा, वह्या, युनिफॉर्म, स्पर्धा परीक्षा… एकेक नवीन खर्च हजेरी लावू लागला. बाबांचं प्रमोशन झालं होतं, पण त्या प्रमोशनसोबतच आईचं कामही वाढलं – घराचा खर्च मॅनेज करायचा आणि घरातल्या प्रत्येक स्वप्नाची काळजी घ्यायची.

    कधी लग्नात जायचं ठरवलं, तर विचार येई – “तिथे आहेर किती घ्यावा?”

    कधी हॉटेलमध्ये जायचं म्हटलं, तर मेन्यू कार्डापेक्षा मनाचा कॅल्क्युलेटरच आधी उघडायचा.

    2015

    अमेय बारावीला. आई म्हणाली, “आपण थोडेसे दागिने गहाण ठेवू. मुलाच्या शिक्षणाला काही कमी नको.”

    बाबा शांत होते. त्यांनी कोणालाच न सांगता पीएफमधून अ‍ॅडव्हान्स काढला. त्या दिवशी त्यांनी स्वतःसाठी घड्याळ घेण्याचं मनातलं एक जुनं स्वप्न बाजूला ठेवलं. कारण वेळ मोजायला घड्याळ नको, पण वेळेवर पैसा लागतो – हे मध्यमवर्गीयांना कुठल्याही एमबीएच्या आधी कळतं.

    आज

    आई-बाबा आता 58-59 वयाचे आहेत. रिटायरमेंट अवघ्या दोन वर्षांवर. बँकेचं रिकरिंग डिपॉझिट, पीएफ, थोडंफार म्युच्युअल फंड… सगळं करताना त्यांनी एक गोष्ट कायम जपली – “पुढच्या पिढीला कमी पडू नये.”

    पण त्यांच्या स्वतःच्या आरोग्याच्या तपासणीला त्यांनी “पुढच्या महिन्यात” म्हणत टाळलं… कारण मध्यमवर्गीय घरात आरोग्याची चाचणीसुद्धा “बजेटमध्ये” बसवावी लागते.

    बाबा चहा घेत म्हणतात – “आयुष्याचं हे गणित असतं रे – सगळ्या उदाहरणांना पूर्ण उत्तरं मिळत नाहीत. कधी कधी फक्त समीकरण सोडवायचं असतं… आणि काही वेळा उत्तरं आपल्याऐवजी दुसऱ्याच्या यशात दिसतात.”

    अमेय डोळे मिटतो. त्याला त्या ‘न दिसणाऱ्या’ उत्तरांची किंमत आता कळते आहे आणि आपण मध्यमवर्गीय आहोत म्हणजे नक्की काय आहे?

    मध्यमवर्गीयांचं मॅनेजमेंट म्हणजे – ‘पगार’ आणि ‘खरंच गरज आहे का?’ यामधली रोजची संघर्ष कथा.

    मध्यमवर्गीयांचं आयुष्य हे कधीही थांबत नाही. त्यातले स्वप्नं – घरी सायकल आणणं, मुलासाठी शिकवणी लावणं, लग्नात मान राखणं – सगळं हिशोबाच्या काट्यावर चालतं. त्यांचं गणित रोज बिघडतं, पण तेच ते रोज नव्यानं सोडवतात – प्रेमाने, संयमाने, आणि जबाबदारीने. एमबीए नसलेलं हे व्यवस्थापन म्हणजेच जगण्याचं खऱ्या अर्थानं गणित!

    मध्यमवर्गीयाचं मॅनेजमेंट म्हणजे 25,000 रुपयांत 40,000 रुपयांचं आयुष्य जगणं.

    आज गॅस संपला… उद्या फ्रीज बंद पडला… परवा EMI आहे… तरीसुद्धा चेहऱ्यावर हसू ठेवणं हे मध्यमवर्गीयांचं खऱ्या अर्थानं मॅनेजमेंट. मध्यमवर्गीय आयुष्य म्हणजे केवळ काटकसर नाही, ती एक समृद्धता आहे – जिथे ‘तडजोड’ ही ताकद आहे, ‘बचत’ ही सवय आहे, आणि ‘आनंद’ ही निवड आहे.

    त्यांना कधी पुरस्कार मिळत नाहीत, पण त्यांनी बांधलेलं घर हे जगण्याचं सर्वात मोठं प्रमाणपत्र असतं. मुलांचे शिक्षण आणि लग्न आणि आपलं म्हातारपणाची तरतूद,  वर्तमानातही भविष्याची काळजी…

    हेही वाचा – ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…

    भारतातला सगळ्यात खंबीर आणि समंजस वर्ग – मध्यमवर्ग. मध्यमवर्गीय ‘संसार व्यवस्थापन’ या कोर्समध्ये गोल्ड मेडलिस्ट असतात! अशा या मध्यमवर्गीय परिवारला कोणत्याही सेवा उपलब्ध नाहीत. कोणाच्या आधाराशिवाय जगणं… छोटा संसार म्हणजेच खऱ्या अर्थाने समृद्ध आयुष्याचं उदाहरण असतं.

    “स्वबळावर उभं आयुष्य जगणारा – हेच मध्यमवर्गीयांचं खरं स्वप्न आणि जगण्याचं तंत्र.”

    अमयला मध्यमवर्गीय असल्याचा आज अर्थ कळला… मध्यमवर्गीयांचं आयुष्य हे चिमूटभर साखरेसारखं असतं, कमी असलं तरी गोड लागतं, पण अभिमानाने जगणारे!

    मला तरी मध्यमवर्गीय असण्याचा अभिमान आहे.

    Avatar photo
    तृप्ती देव

    मी भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे. मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथाविश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात. एखादा विषय मनाला भिडला की, त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे. शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.

    Related Posts

    शार्वीने अखेर टोकाचे पाऊल उचललेच!

    September 10, 2026 ललित

    मुंबई मेरी जान

    September 10, 2026 ललित

    जीवनसंग्राम

    September 9, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शार्वीने अखेर टोकाचे पाऊल उचललेच!

    By Team AvaantarSeptember 10, 2026

    पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 14 राहुल अग्रवाल विभाकडे पार्थ आणि शार्वीच्या लग्नाचा विषय काढतो.…

    मुंबई मेरी जान

    September 10, 2026

    जीवनसंग्राम

    September 9, 2026

    भक्ती

    September 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    September 11, 2026

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरी पुरुष अनादि आथी, आणि तैंचि लागोनि प्रकृति

    September 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 सप्टेंबर 2026

    September 11, 2026

    शार्वीने अखेर टोकाचे पाऊल उचललेच!

    September 10, 2026

    हो, मी आहे मध्यमवर्गीय!

    September 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 430
    • अवांतर 208
    • आरोग्य 145
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 576
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 910
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    September 11, 2026

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरी पुरुष अनादि आथी, आणि तैंचि लागोनि प्रकृति

    September 11, 2026
    Most Popular

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.