Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    September 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शुक्राचे अध्यात्म
    अध्यात्म

    शुक्राचे अध्यात्म

    अस्मिता दीक्षितBy अस्मिता दीक्षितSeptember 1, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अस्मिता दीक्षित, लेखिका अस्मिता दीक्षित, अध्यात्म अस्मिता दीक्षित, शुक्र अध्यात्म, भौतिक सुखाचा मेरुमणी, शुक्र म्हणजे आनंद, मीन राशीत उच्च शुक्र, सगुण भक्तीचा कारक शुक्र, शुक्र म्हणजे लक्ष्मी, शुक्र म्हणजे अष्टलक्ष्मी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    || श्री स्वामी समर्थ ||

    जिथे आनंद तिथे शुक्र. शुक्र हा भौतिक सुखाचा मेरुमणी आहे. माणसाला सुखासीन आयुष्य जगायला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा कारक शुक्र आहे. मग आलिशान वाहन असो की पर्यटन, उंची वस्त्रे असो की, मौल्यवान दागिने, मधुर वाणी असो की अत्तर किंवा सुमधुर संगीत… सर्वांवर हक्क शुक्रचाच! शुक्र हा कन्या राशीत नीच फळे देतो, तर मीन राशीत उच्च. मीन राशीच त्याने उच्च होण्यासाठी का निवडली असावी? हा प्रश्न अभ्यासकांना पडला पाहिजे; कारण जितके प्रश्न अधिक तितका अभ्यास सखोल.

    मीन ही कुंडलीतील व्यय भावात येणारी राशी. या राशीला मोक्षाची राशीसुद्धा म्हटले जाते. शेवटची रास असल्याने शरीररचनेनुसार इथे ‘पावले’ येतात. मीन ही अथांग महासागराची रास आहे. सागर सर्वांनाच समाविष्ट करणारा, त्यामुळे ही लोक सर्वाना हृदयात सामावून घेणारी, सदाचारी, सहानुभूती, भूतदया असणारी असतात. इथे संवेदनशीलता, प्रेम आहे. याचे बोध चिन्ह पाहिले तर, उलट सुलट मासे – म्हणजे जणू काही आत्मा आणि परमात्म्याचे मिलन करणारी ही राशी. व्यव भाव हा मोक्ष त्रिकोणातील अखेरचा भाव.

    या महासागरात जीवनातील सगळे चढ-उतार, सुख-दु:ख सामावलेली आहेत. मीन राशीत आपल्या इहलोकीची यात्रा संपते आणि पुन्हा जेव्हा आपण मेषेत प्रवेश करतो, तेव्हा आपल्या आत्म्याचा नवीन प्रवास सुरू झालेला असतो. आपला आत्मा म्हणजेच रवी, सूर्य. म्हणूनच मीन राशीतून सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो, तेव्हा तो उच्चीची वस्त्रे परिधान करतो.

    या भावापर्यंत यायला व्यक्तीला आधीच्या अकरा भावातून प्रवास करावा लागतो, तेव्हा कुठे तो मोक्षाला पोहोचतो. आयुष्य सर्वार्थाने म्हणजेच धर्म, अर्थ, काम या त्रिकोणांचा पुरेपूर अनुभव घेतल्याशिवाय मोक्षाचा खरा आनंद दुर्मीळ आहे.

    सूर्य आणि चंद्र हे प्रकाश देणारे आहेत. आपल्याला मार्ग दाखवणारे आहेत. पण प्रकाशासोबत सावली सुद्धा येते, त्यामुळे त्याचाही विचार असला पाहिजे. असो.

    हेही वाचा – केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    मी नामस्मरण करतेय, पण मन शांत नाही; कारण काही ना काही इच्छा अजून अपूर्ण आहे. सर्व इच्छा पूर्ण होतात, तेव्हाच मन परमेश्वराच्या चरणाशी खऱ्या अर्थाने रमते. आयुष्याची अखेरच आपल्याला खरे ज्ञान देत असते आणि ते देणारा दुसरा-तिसरा कुणी नाही तर, सगुण भक्तीचा कारक ‘शुक्र’ आहे. अनेक संतांच्या पत्रिकेतून आपल्याला हा मीनेतील शुक्र भेटतो. शुक्र हा फक्त विलासी ग्रह नाही. असे असेल तर शुक्राचा अभ्यास अपूर्ण आहे, असे म्हटले पाहिजे. मीन रास ही मोक्षाची आहे आणि तिथे गुंतवणूक आहे, ती फक्त पैशाचीच नाही तर, भावनांची सुद्धा! आपले सर्वस्व परमेश्वराच्या चरणावर वाहताना भक्ताच्या डोळ्यांतून ज्या अश्रूधारा वाहतात, त्या म्हणजेच ‘शुक्र’. हे संवेदना वाहून नेणारे जल आहे. हा शेवटचा क्षण… तेव्हा काहीच आठवत नाही, आठवते ते फक्त त्याचे रूप, निर्गुण आणि निराकार. शेवटच्या प्रवासात जेव्हा सर्व बंधने तुटली जातात, सर्व सोडून जातात, तेव्हा त्याचे आपल्याभोवतीचे अस्तित्व जाणवू लागते आणि तोच खरा सर्वार्थाने आनंद देणारा क्षण फक्त ‘शुक्र’ आपल्याला देऊ शकतो. जितक्या आनंदाने संपूर्ण आयुष्य जगलो त्याहीपेक्षा स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करणारा तो क्षण किती सुखद, परमोच्च आनंदाचा असेल! आणि त्या क्षणाचे प्रतिक म्हणूनच या शुक्राने सागरासारख्या विशाल मनाच्या मीन राशीत स्वतःला उच्च होण्याचा मान दिला असावा. मीन राशी खोल अथांग सागराची असल्यामुळे इथे गूढत्व, सखोल ज्ञान आहे.

    व्यय म्हणजेच मोक्षाच्या भावापर्यंत पोहोचण्यासाठी आत्म्याला अकरा भावांचा प्रवास करायला लागतो तेव्हा परमेश्वर प्राप्ती होते आणि त्याच्या अस्तित्वाची अनुभूती मिळते. अगदी तसेच शुक्राला सुद्धा अकरा राशीतून प्रवास केल्यावरच मोक्षाच्या राशीत उच्च होता येते. सर्व सुखांचे आगर म्हणजे भगवंताचे चरण आहेत आणि आजवर अनुभवलेले सुख परमेश्वर सानिध्याच्या पुढे किती कवडीमोलाचे आहे, हे मोक्षाच्या राशीतील हा आध्यात्मिक सगुण भक्तीच्या आनंदाचा आस्वाद घेतल्याशिवाय समजणार नाही. भौतिक सुखात गुरफटलेला हा आत्मा शेवटी भगवंताच्या चरणीच विलीन होतो, तोच खरा ‘शुक्र’. सगुणभक्ती ही अनुभवायची असते, ज्याला आत्मिक मानसिक ओढ आहे, त्यालाच ते चरण दिसतील आणि त्या चरणांना आपल्या डोळ्यातील अश्रूंनी भिजवून टाकताना जो परमानंद मिळतो, तो जन्मोजन्मी टिकणारा असतो. मीनेतील शुक्र परमेश्वराच्या सान्निध्याची ओढ लावतो.

    जन्मल्यापासून आपण शुक्र जगात आहोत, पण अखेरच्या काळातील मोक्षाच्या उबरठ्यावर नेणारा शुक्र आपल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव करून देतो. भक्ती आणि सेवा हेच खरे जीवन आहे हे पटवून देणारा शुक्र इथेच भेटतो. समाधानाच्या उच्च शिखरावर नेणारा आणि आपल्या शेवटच्या प्रवासात त्याचा हात आपल्या हातात देणारा हा शुक्रच आहे. शुक्राचे हे असीम अध्यात्मिक महत्त्व ज्याने जाणले, त्याला मोक्षाचे द्वार खुले झालेच म्हणून समजा.

    रेवतीच्या चतुर्थ चरणात 27 अंशावर उच्चत्व प्राप्त करणारा हा शुक्र, असामान्य आत्मिक सुखाची परम अनुभूती देणारा आहे. हे सुख सहज नाही म्हणूनच 108 नक्षत्र चरणांचा प्रवास त्याला करावा लागला, तेव्हा कुठे रेवतीचे चतुर्थ चरण त्याला दिसले. त्याच्या चरणाशी लीन होण्यासाठीच आपला जन्म आहे आणि त्याची सेवा म्हणजेच आपले आयुष्य आहे, हेच तर जणू या शुक्राला सांगायचे नसेल ना! म्हणूनच शुक्राने उच्च होण्यासाठी रेवतीसारखे देवगणी नक्षत्र निवडले असावे. मीन रास म्हणजे वैकुंठ आहे आणि शुक्र स्वतः महालक्ष्मीचे प्रतिक आहे. शुक्र म्हणजे लक्ष्मी, अष्टलक्ष्मी. आयुष्यात उच्च शिखरावर जायचे असेल तर, महालक्ष्मी आणि महाविष्णूची उपासना फळ देईल.

    आजवर मिळवलेले सर्व काही शाश्वत नाही, पण परमेश्वराच्या चरणाशी मिळालेला असीम आनंद खरोखरच शाश्वत आहे, म्हणूनच तर तो सत्-चित आनंद आहे. क्षणभर विचार करा चंद्रभागेच्या काठाशी टाळ-मृदुंगाच्या गजरात जेव्हा देहभान विसरून गेलेल्या आपल्या वारकऱ्यांसोबत प्रत्यक्ष पांडुरंग, ज्ञानबा तुकाराम म्हणत ताल धरतो, त्याचे वर्णन कशात करणार आपण? हे सर्व आपल्या आकलनाच्या बाहेर आहे. या सर्वांचे शब्दांत वर्णन होऊच शकत नाही,  हे फक्त अनुभवायचे असते. अगदी याचप्रमाणे आपल्या आयुष्याची अखेर होताना त्याचा हात धरूनच त्याच्याच चरणाशी विलीन होतानाचा आनंद परमोच्च सुखाचा अविष्कार नाहीतर काय आहे! त्याची तुलना आयुष्यभर मिळवलेल्या कुठल्याच सुखाशी होऊ शकत नाही.

    हेही  वाचा – कान्होपात्रेचे समर्पण

    मला लेखनाचा आनंद हा शुक्रच बहाल करत असावा. लिहिताना कुणीतरी आपल्याकडून लिहून घेत आहे, असा भास मला अनेकदा होत असतो आणि माझ्याकडून तोच हे शब्दभांडार जणू खुले करत असावा. सांगायचे तात्पर्य असे की, ज्या सुखाच्या मागे आपण आयुष्यभर असतो, ते शाश्वात सुख नसतेच. खऱ्या अर्थाने सुख हे आयुष्याच्या अंतिम क्षणी अनुभवायला मिळते, ते मीन राशीत. कारण महाराजांच्या चरणाशी असणारा हा आनंद दुर्मीळ आहे आणि जेव्हा उमगते की, आयुष्यभर आपण ज्याला आनंद, सुख म्हणत होतो, तो सुखाचा निव्वळ भ्रम होता. खरे सुख तर भगवंताच्या चरणाशी आहे आणि हे चरण म्हणजेच पाऊले, जी मीन राशी दर्शवते. आपल्या महाराजंच्या चरणाशी विलीन होणे, हे भाग्याचे लक्षण आहे.

    सर्व अहंकार सोडून त्याच्या चरणावर नतमस्तक व्हा, हे सांगणारा हा व्यय भाव आहे. म्हणूनच, इथे शरीराची पाऊले आहेत. नतमस्तक झाल्याशिवाय, आत्मसमर्पण केल्याशिवाय मोक्ष नाही.

    सद्गुरूंच्या चरणी उभा संसार अर्पण करून या सगुण भक्तीचा आनंद लुटूया आणि हा शाश्वत आनंद टिकवण्याचा मनोमन निर्धार करूया, त्याच्या चरणी आपले संपूर्ण आयुष्य विलीन करूया… कारण शेवटी तो त्याच्या अस्तित्वाची ग्वाही तुम्हाला तुमच्या अखेरच्या प्रवासात देतोच देतो.

     

    पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

    Avatar photo
    अस्मिता दीक्षित

    जवळपास 18 वर्षं IT क्षेत्रात recruitment मध्ये कार्यरत होते. त्यानंतर केसरी टूर्समध्ये 3 वर्षं लेखन केले. तसेच, ‘antarnad18.blogspot.com’ हा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. लोकमत, सकाळ या दैनिकांमध्ये लेखन केले. ज्योतिष शास्त्राचे कुतूहल पहिल्यापासून होते, त्यामुळे 1999पासून या शास्त्राचे अध्ययन केले आणि अविरत करत आहे. माझे परमगुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रुजू आहे. त्यांची कृपा आहे म्हणून सर्व चालले आहे, हा ठाम विश्वास आहे. गेली 10 वर्षं ‘हसत खेळत ज्योतिष शिकूया’ या कार्यशाळांचे झूमच्या माध्यमातून आयोजन करत आहे.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    August 31, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रेमाथिलेनि भक्तें, जैसेनि भजिजे कुळदैवतें

    August 30, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    By Team AvaantarSeptember 1, 2026

    अध्याय तेरावा आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे । ते आइकोनि डौर…

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    August 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रेमाथिलेनि भक्तें, जैसेनि भजिजे कुळदैवतें

    August 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : न धरावा तो संगु, न लागावें तेथ लागु

    August 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    September 1, 2026

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 417
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 560
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 28
    • ललित 886
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    September 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.