Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!
    ललित

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेAugust 31, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, लेखक सतीश बर्वे, मोडक आजोबा आणि सोहोनी आजोबा, मोडक सोहोनी मैत्री, मोडक सोहोनी शेजारी, मोडक सोहोनी तीन पिढ्याची मैत्री, मोडक आजोबांची विचित्र अट, धनवापसी, सोहनी आजोबांची फसवणूक, मोडक आजोबांचा व्यवसाय, सोहोनी आजोबा व्यवसाय, सोहोनी मोडक आजोबांचे बुद्धिबळ
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 3

    सुधीरने मला फोन करून सांगितले की, ‘मोडक आजोबांना घेऊन त्यांची गाडी हॉस्पिटलच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडायच्या तयारीत आहे.’

    मी त्याला ‘ठीक आहे’ म्हणालो आणि तडक आजोबांच्या खोलीत गेलो. आजोबांना खरंतर डोळा लागला होता. पण नाईलाजाने मला त्यांना उठवावं लागलं…

    “आजोबा आपल्याला परत बाहेर अंगणात जायला हवं. सुधीरचा नुकताच फोन आला होता. ते निघाले आहेत हॉस्पिटलमधून.”

    “तुझ्या आजीला तयारीत राहायला सांग. मला अपेक्षित असा चमत्कार घडलाच तर, तिला औक्षण करायला सांगितले आहे मी कालच रात्री.”

    सुधीरचा परत एकदा फोन आला हे सांगायला की, त्यांची गाडी कुठल्याही क्षणी आमच्या गल्लीत शिरेल. मी फोन बंद केला आणि रस्त्यावर डोळे लावून बसलो.

    प्रश्न एकच होता सगळ्यांसमोर… हो की नाही?

    पण त्या प्रश्नाचे उत्तर पुढच्या काही क्षणांतच मिळाले. आजोबांची इच्छा बहुतेक पूर्ण होणार, असं वाटत असतानाच सुधीरची गाडी आमच्या गेटजवळ येऊन थांबली.

    हेही वाचा – धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    सुधीरचा परत फोन आला मला, “दार उघडायला बाहेर ये.” मी अक्षरशः धावतच पुढे जाऊन आमचं गेट उघडले. सुधीरच्या बाबांनी सावकाशपणे त्यांची गाडी आत आणून आमच्या पोर्चजवळ उभी केली.

    गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि त्यातून सावकाशपणे काठी टेकत मोडक आजोबा खाली उतरले. चार पावलं पुढे टाकून त्यांनी क्षीण आवाजात विचारले,

    “माधवा, अरे आहेस का घरात?”

    मी आजोबांना घेऊन मुख्य दरवाज्यापाशी आलो. दोन्ही आजोबांच्या मधे इनमीन पाच-सहा पायऱ्यांचे अंतर होते. पण ते अंतर संपुष्टात येण्यासाठी नियतीने दोघांनाही बरीच वर्षे ताटकळत ठेवले होते.

    “तिथेच थांब जरा तू मंगेशा…” आजोबांनी मोडक आजोबांना विनंती केली आणि पाठमोरे होऊन त्यांनी आजीला हाक मारली, “सुमती, आरतीचं तबक घेऊन लगेचच बाहेर ये.”

    आजी लगबगीने बाहेर आली.

    “तो बघ आलाय तुझा लाडका भावोजी. खाली जाऊन आधी त्याचे औक्षण कर. मगच त्याला घरात येऊ दे.”

    आजीने मोडक आजोबांचे औक्षण केले. आजोबांचे डबडबले डोळे पुढे काय घडणार आहे, याची जणू कल्पनाच देत होते. औक्षण झाल्यावर सुधीरचा हात धरून मोडक आजोबा थेट आजोबांच्या जवळ येऊन उभे राहिले आणि पुढच्याच क्षणी त्यांनी दोन्ही हात बाजूला नेऊन आर्त साद घातली, “माधवा ये जवळ आता.”

    आजोबा इतकी वर्षे ज्या क्षणाची वाट बघत होते, तो क्षण समोर आल्यावर त्यांनी मोडक आजोबांना कडकडून मिठी मारली. आजोबांच्या पाठीवरून हात फिरवत मोडक आजोबा पुढे म्हणाले, “माधवा, अरे अहंकाराचे जोखड तेव्हाच गळून पडले, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो. आडनावाप्रमाणे मी आता पार मोडून गेलो आहे रे शरीराने आणि मनाने देखील. वर जाताना माझ्या आडमुठ्या स्वभावामुळे आजवर विनाकारण अडकवून ठेवलेल्या कुठल्याच गोष्टीचे पाश मला सोबत न्यायचे नाहीयेत. मी तुझ्यावर इतकी वर्षे खूप अन्याय केला, ज्याला कारणीभूत होता माझा अहंकार! पण तो देखील आता गळून पडला आहे. तू धनवापसी केलीस. पण त्या बदल्यात मी आपली मैत्री निष्ठूरपणे तोडून टाकली. तू माझा सल्ला झुगारून जोडधंदा सुरू केलास. तो राग होताच माझ्या मनात. पण ज्याच्या भूलथापांना तू बळी पडलास, त्या गुजरात्याची नियत चांगली नव्हती, हे मी जाणून होतो. त्यामुळेच तुझ्या निर्णयापासून तुला परावृत्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी खूपदा केला खरा, पण तू ईरेलाच पेटलास. मी हताशपणे देवाकडे प्रार्थना करत होतो की, तो भयंकर दिवस तुझ्या जोडधंद्यात न येण्यासाठी…

    पण दुर्दैवाने तो दिवस आला. तुला असं उद्ध्वस्त झालेले मला बघवत नव्हते, पण माझं न ऐकता तू स्वतःहून तुझ्या पायावर धोंडा पाडून घेतलास, याचा मला प्रचंड राग आला होता. रागाच्या त्याच आवेशात तुला देणेकऱ्यांच्या ससेमिऱ्यातून सोडवण्यासाठी आर्थिक मदत करताना मी आपली मैत्री संपुष्टात येण्याची विचित्र अट तुझ्यासमोर ठेवली. तू नाईलाजाने ती मान्य केलीस. तेव्हाच मी स्वतःच्या नजरेतून उतरलो कायमचा. नंतर कित्येक दिवस मी पश्चात्तापाच्या वणव्यात होरपळत होतो, पण ते सगळं निमूटपणे सहन करत गेलो.

    हेही वाचा – सोहोनी आजोबा आणि मोडक आजोबा यांच्या मैत्रीतील वळणे…

    हॉस्पिटलमध्ये असताना तुझ्या मनात आलेला विचार माझ्याही मनात येऊन गेला होता. पण सुधीरकडून तुझ्या मनातली इच्छा समजली आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की, घरी जाताना गाडी तुझ्या बंगल्यात न्यायची आणि तुला कडकडून भेटायचं. माधवा, मी खूप वर्षे चूक केली. प्लीज मला माफ करून ती चूक सुधारण्याची संधी दे.”

    आम्ही सगळेच मोडक आजोबांचे बोलणं ऐकून स्तब्ध झालो होतो.

    आजोबांनी मोडक आजोबांना जवळच्या खुर्चीवर बसवलं आणि म्हणाले, “एका अटीवर तुला माफ करीन मी.”

    “कोणत्या?” मोडक आजोबांनी विचारले.

    “आत्ता या क्षणी तू पूर्वीप्रमाणे उत्साहाने माझ्यासोबत बुद्धीबळाचा डाव खेळायला बसलास तर!”

    मोडक आजोबा ‘नाही’ म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी शांतपणे मान हलवून होकार दिला. त्याच आनंदात आजोबांनी आजीला सांगितले, “सुमती या तुझ्या लाडक्या भावोजीची आवडती थालिपीठं लावायला घे. त्या आधी आम्हाला आलं ठेचून घातलेला चहा पाठव.”

    आजोबांनी खूप वर्षांपूर्वी केलेल्या धनवापसीची परतफेड मोडक आजोबांनी आनंदाच्या रुपात केल्याने आमच्या दोन्ही बंगल्यात पुढचे काही दिवस दिवाळी साजरी होणार, यात शंकाच नव्हती.

    समाप्त
    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    अट

    August 31, 2026 ललित

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026 ललित

    अरे देवा…

    August 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अट

    By अतुला प्रणव मेहेंदळेAugust 31, 2026

    “श्रावणी अगं झालीस का तयार? चल बाई, येतीलच आता मुलाकडचे इतक्यात.” श्रावणीची आई वसुधाताई हाका…

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026

    अरे देवा…

    August 30, 2026

    जुम्मन चाचाची अधुरी प्रेमकहाणी!

    August 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु

    August 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑगस्ट 2026

    August 31, 2026

    ‘अफगाण डायरी : काल आणि आज’… मनाला भिडणारा काळाचा पट

    August 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 415
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 559
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 24
    • ललित 890
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अट

    August 31, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… स्वतःच्या पत्रिकेतील ग्रह आणि आपली वास्तू

    August 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.