नीलिमा खडतकर
खवा-काजू तिरंगी मोदकाचे साहित्य
- मिल्क पावडर – 1/3 कप
- दूध – अर्धा कप
- खोबऱ्याचा बारीक किस (डेसिकेटेड कोकोनट) – 1 कप
- साखर – पाव कप
- साजूक तूप – 1 टीस्पून
- काजू पावडर – पाव कप
- खायचा केशरी – चिमूटभर
- हिरवा रंग – चिमूटभर
कृती
- नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घ्यावे आणि त्यात दूध घालून मध्यम आचेवर ते गरम करावे.
- ते थोडे गरम झाल्यावर त्यात काजू पावडर, मिल्क पावडर आणि साखर घालावी आणि सतत ढवळत राहावे.
- थोडा सैलसर गोळा झाल्यावर त्यात अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घालावे आणि थोडे परतून गॅस बंद करावा.
- मिश्रण थोडे थंड होऊ झाल्यानंतर त्याचे तीन भाग करावेत. एक भाग तसाच ठेवावा, दुसऱ्या भागात केशरी रंग आणि तिसऱ्या भागात हिरवा रंग मिसळावा.
- प्रत्येक रंगाचे छोटे गोळे करावे आणि प्रत्येक गोळा डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळून साच्यात घालून मोदक तयार करावे.
- अशा प्रकारे अगदी झटपट सर्व तिरंगी मोदक तयार करावे.
हेही वाचा – Recipe : चटपटीत सोया पॅकेट्स
उपवास पुरीसाठी साहित्य
- कच्चे केळे – 1
- राजगिरा पीठ – पाऊण कप
- आलं-हिरवी मिरची पेस्ट – 1 टीस्पून
- सेंधव मीठ – चवीनुसार
- तेल – तळणासाठी
कृती
- कच्चे केळे उकडून, सोलून आणि किसून घ्यावे.
- किसलेल्या केळ्यात आलं मिरची पेस्ट, राजगिरा पीठ, मीठ घालून छान घट्ट गोळा करून घ्यावा.
- आता छोटे छोटे गोळे करून जाडसर पुऱ्या लाटाव्यात. लाटताना राजगिरा पीठ घ्यावे, म्हणजे पुरी पोळपाटाला चिटकणार नाही.
- तेल गरम झाल्यावर त्यात पुरी सोडावी. पुरी एका बाजूने लालसर रंग होईपर्यंत तळावी आणि नंतर परतून दुसऱ्या बाजूने तळावी.
- अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्याव्यात आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत गरम गरम सर्व्ह कराव्यात.
हेही वाचा – Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


