Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी

    August 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » फ्रेंडशिप डे
    ललित

    फ्रेंडशिप डे

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेAugust 2, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, लेखक सतीश बर्वे, फ्रेंडशिप डे, वैजू आणि फ्रेंडशिप डे, मैत्रीण वैजूचा फ्रेंडशिप डे, फ्रेंडशिप डेच्या आठवणी, कॅन्सरग्रस्त वैजू, वैजूच्या आठवणी, वैजूशिवाय फ्रेंडशिप डे, वैजूचा शेवटचा फ्रेंडशिप डे,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘‘फ्रेंडशिप डे’पर्यंत तरी माझा श्वास चालू रहाण्यासाठी प्लीज प्रार्थना करा देवाजवळ सगळ्यांनी!’

    रविवारी सकाळी वैजूचा असा अचानक मेसेज आला आणि आमच्या कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ‘फ्रेंडशिप डे’ला अजून दोन महिन्यांचा कालावधी होता. म्हणजे, परिस्थिती आणखी गंभीर झाली होती बहुतेक… लगोलग आम्हा मित्रांची फोनाफोनी झाली. रवी, जयंत, कौशल आणि परेशला मी तयार केले आणि पुण्याला जाऊन आम्ही वैजूला भेटलो.

    “सकाळी मेसेज आणि पांडव हजर लगोलग. क्या बात है!”

    आम्हाला घरी आलेले बघून वैजू आश्चर्यचकित होऊन म्हणाली. तिचा कॅन्सर खरंतर शेवटच्या स्टेजचा, पण त्याचा कसलाच मागमूस तिच्या चेहऱ्यावर नव्हता.

    मुंबईहून निघताना विकासला म्हणजे वैजूच्या नवऱ्याला मी फोन करून आमच्या येण्याची कल्पना दिली होती.

    मी वैजूचा हात हातात घेऊन म्हणालो, “काही कुठे जात नाहीयेस तू इतक्यात. अजून खूप मोठी वेटिंग लिस्ट आहे तुझ्याआधी, जी देवाला संपवायची आहे. या वर्षीचाच काय आणखी कितीतरी वर्षे तुला आमच्यासोबत फ्रेंडशिप डे साजरा करायचा आहे, समजलीस ना! उगाच घाबरवून सोडलंस आम्हाला.”

    वैजू एक डॅशिंग व्यक्तिमत्व आमच्या कॉलेजचं. मला आठवतोय कॉलेजच्या ॲडमिशनचा दिवस. सकाळी 11ची वेळ होती, पण 12 वाजून गेले तरी काऊंटर सुरू झाले नव्हते. वैजूने पुढे जाऊन कॉलेजच्या ऑफिसमध्ये जो राग काढला, तो बघून आम्हा बाकीच्या मुलांना हुरूप आला. संबंध मजला घोषणाबाजीने दणाणून गेला होता… एकंदर रागरंग बघता दुसऱ्या दोन क्लार्कना तिथे बसवून काऊंटर सुरू झाले आणि तासाभरात ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण झाली. आम्ही सगळ्यांनी वैजूचे आभार मानले. तेव्हापासून वैजूशी जी गट्टी जमली ती आजतागायत.

    हेही वाचा – रमेश वेटर अन् न दिलेली टीप

    त्या दिवशी पुण्याला गेल्यावर विकासला गाडी काढायला सांगून आम्ही सगळे दोन गाड्या घेऊन पवना धरणाच्या आसपास भटकंती करून आलो. वैजूसोबत हसतखेळत संध्याकाळ झाली. तिला घरी सोडून आम्ही मुंबईला परतलो ते मनात कायमची धाकधूक बाळगत.

    मन चिंती ते वैरी न चिंती. नंतर जेमतेम महिना नाही लोटला आणि एकदिवस विकासचा फोन आला. मोबाइलच्या स्क्रीनवर विकासचे नाव बघून समोरून काय ऐकायला मिळणार, या विचाराने माझी छाती धडधडली.

    “सगळं ठीक आहे ना विकास?”

    क्षण दोन क्षण समोरून आवाज नाही काही… आला तो फक्त हुंदका…

    “विकास, अरे बोल काही तरी… माझा जीव टांगणीला लागला आहे…” माझा आवाज किंचित वरच्या पट्टीत गेला.

    “लवकरात लवकर तुम्ही तुमचा फ्रेंडशिप डे उरकून घ्या. डॉक्टरांनी कालच स्पष्ट सांगितले आहे की, परिस्थिती हाताबाहेर जायला सुरुवात झाली आहे त्यामुळे कधीही…”

    महिन्याभरात आम्ही दुसऱ्यांदा वैजूच्या घरी पोहोचलो. तिची खोली छानपैकी सजवलेली होती. बेडवर नवीन चादर, उशांना नवीन कव्हर, टेबलावर नेहमी मांडून ठेवलेली औषधे आज तिथून उचलली गेली होती आणि गुलाबाच्या फुलांची एक आकर्षक परडी तिथे ठेवण्यात आली होती. गेल्यावर्षी तिच्या वाढदिवसाला आम्ही सगळ्यांनी मिळून तिला दिलेल्या ड्रेसपैकी एक ड्रेस वैजूने घातला होता. जणू राजवाड्यातील मखमली आसनावर बसलेली ती एक सम्राज्ञी होती. वैजूच्या चेहऱ्याकडे बघून किंचितही जाणवत नव्हती तिची आजची खरी शारीरिक अवस्था! आजही तिच्या चेहऱ्यावर पसरलेले तेज बघून आम्ही सगळे चक्रावून गेलो होतो.

    अचानक खोलीच्या पडद्याआडून वैजूच्या सासूबाई डोकावल्या.

    “बसा रे सगळ्यांनी. नाश्त्याच्या प्लेट भरून आणते मी,” त्या एवढं म्हणाल्या खऱ्या पण त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचा काळजीचा महासागर बघवत नव्हता. गरमागरम उपमा आणि चहा झाल्यावर आमच्या गप्पा रंगल्या.

    रवीने मग वैजूसाठी आणलेला ड्रेस तिच्या हातात ठेवला. आज पहिल्यांदाच वैजूने धीर आणि जगण्याची आशा सोडल्याचं, तिच्या डोळ्यांतून गालांवर टचकन ओघळलेल्या अश्रूंनी आम्हाला सांगितले. खोलीत अचानक सन्नाटा पसरला.

    “And now the attraction of the Day Begins…” असं म्हणून जयंतने फ्रेंडशिप बँड आणि स्केचपेन्स बाहेर काढली.

    आम्ही एकेकाने वैजूकडून फ्रेंडशिप बँड बांधून घेतले मग नंतर तिच्या हातावर बांधले. मला तिच्या हाताची कातडी शुष्क झाल्याचे चटकन जाणवलं आणि त्याच क्षणी आमची नजरानजर झाली. मी नि:शब्द झालो. नंतर स्केच पेन्सनी अगदी कॉलेजच्या दिवसांत असल्यागत साग्रसंगीत एकमेकांच्या हातावर सह्या केल्या आम्ही. वैजूला आमच्या हातावर थांबत थांबत सही करायला देखील कितीतरी वेळ लागला. तिच्या स्केच पेन्सचा हाताला झालेला स्पर्श तिच्या पुढच्या प्रवासाच्या तयारीची जाणीव करून देणारा होता…

    सगळ्यांच्या हातावर सह्या करून झाल्यावर वैजू रडायला लागली. तिला त्याच अवस्थेत जवळ घेऊन कौशल दबक्या आवाजात गाणं पुटपुटला “देख सकता हूं मैं कुछ भी होते हुए, नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए…” वैजूने डोळे पुसले, पण गाणं ऐकून आमचे डोळे भरून आले.

    हेही वाचा – आयुष्याचा वेग आणि रहाटगाडगे…

    “चला आता आपलं सगळ्यांनी मिळून म्हणायचं गाणं आपण म्हणूया…”

    आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून गाणं म्हणायला सुरुवात केली –

    “ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे…”

    काल-परवापर्यंत आमच्या सगळ्यांमध्ये हे गाणं म्हणताना वैजूच सगळ्यात जास्त बेहोश व्हायची. पण आज तिचीच होश जाण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती.

    उन्हं कलती झाली. आमची निघायची वेळ झाली. प्रत्येकाच्या कुशीत शिरून वैजूने आम्हाला निरोप दिला.

    फ्रेंडशिप डे साजरा झाला खरा पण फ्रेंडशिप नाइट एवढ्यात नको येऊ दे, अशी मनोमन प्रार्थना देवाजवळ करून आम्ही वैजूच्या घरून परतीचा प्रवास सुरू केला.

    आमची एवढी कळकळीची प्रार्थना देवाने देखील नाही ऐकली. पुढच्याच आठवड्यात वैजूच्या हातावरून आम्ही बांधलेले फ्रेंडशिप बँड सोडायची वेळ विकासवर आली.

    कालच्या फ्रेंडशिप डेच्या दिवशी आमच्या कोणाच्याच डोळ्यांसमोरून वैजू काही हलली नाही. तिच्याशिवाय साजरा केलेला आमचा हा पहिलाच फ्रेंडशिप डे आहे.

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026 ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026 ललित

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    By विशाल कुलकर्णीAugust 2, 2026

    उत्तरार्ध रोहन सधन घरचा. वडिलांचा छोटासाच, पण स्वतःचा कारखाना होता. घरी लक्ष्मी पाणी भरत होती.…

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी

    August 2, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 381
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 516
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 823
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी

    August 2, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.