Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026

    उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    July 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » हनुमान चालीसा… चौपाईमध्ये साक्षात हनुमंताचे दर्शन
    अध्यात्म

    हनुमान चालीसा… चौपाईमध्ये साक्षात हनुमंताचे दर्शन

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीJuly 30, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी, हनुमान चालीसा, हनुमान चालीसा चौपाई, चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन, चौपाईत हनुमानदर्शन, मनाचा आरसा, तिन्ही लोक प्रकाशमय, विचारांवर नियंत्रण मिळविणारा कपीस, चार पुरुषार्थांची प्राप्ती
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आपल्या आत्मिक आनंदासाठी ‘हनुमान चालीसा’ गायन ही खरोखरच एक अद्भुत पर्वणी असते. गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेली हनुमान चालीसा ही रोज पठण करण्याची प्रार्थना आहे. आपण ही हनुमानभक्ती हृदयातून एक-एक मोती वेचून चिंतन करूया.

    श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।

    बरनउँ रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि॥

    श्रीगुरूंच्या चरण कमलांच्या धुळीने आपल्या मनाच्या आरशाला स्वच्छ करून, आपण आता श्री रघुनाथांच्या, प्रभू श्रीरामांच्या त्या पवित्र आणि शौर्यसंपन्न विजयाचे चिंतन, मनन वर्णन करूया, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थाचे फळ देणारे आहे.

    हनुमान चालीसा वाचताना तुलसीदासांच्या रचनेतील अफाट मानसशास्त्रीय खोली आपल्या लक्षात येईल. हनुमान चालीसाची सुरुवात ‘श्री हनुमंताच्या’ नावाने होत नाही किंवा ‘श्रीरामांच्या’ नावानेही होत नाही. ती सुरुवात होते ‘श्रीगुरूंच्या’ चरणांपासून! असे का? कारण, जोपर्यंत आपल्या जीवनात श्रीगुरूंचे मार्गदर्शन मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला ना प्रभू श्रीरामांची ओळख पटेल, ना श्रीहनुमंताची शक्ती समजेल! गुरू हेच ते तत्त्व आहे, जे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल.

    ‘निज मनु मुकुरु’ इथे तुलसीदासांनी मानवी मनाला एका ‘आरशाची’ उपमा दिली आहे. आपण आरशात पाहू, तेव्हाच आपले रूप आपल्याला दिसते. पण जर त्या आरशावर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांची जाड धूळ साचली असेल, तर त्यात कोणतेही प्रतिबिंब स्पष्ट दिसणार नाही. आपले मनही अगदी असेच असते. या जगाच्या कोलाहलात आणि अनेक जन्मोजन्मीच्या प्रवासात आपल्या मनावर अहंकाराची आणि वासनांची प्रचंड धूळ साचलेली असते. हा आरसा स्वच्छ करण्यासाठी तुलसीदास कोणते रसायन वापरतात? तर ते म्हणतात, ‘श्रीगुरूंच्या चरणकमलांची धूळ!’

    इथे ‘धूळ’ हा शब्द अत्यंत सूचक आहे. अध्यात्मात धूळ आणि दास हे लीनतेचे, नम्रतेचे प्रतीक आहे. जेव्हा आपण स्वतःचा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवून, अतिशय नम्र भावाने गुरूंच्या चरणी लीन होतो, तेव्हा ती नम्रताच आपल्या मनावरची अहंकाराची सगळी धूळ पुसून टाकते आणि मग मनाचा आरसा लख्ख स्वच्छ झाला की, त्यात साक्षात परमात्म्याचे, प्रभू श्रीरामांचे अतिशय स्पष्ट आणि विलोभनीय रूप दिसू लागेल!

    हेही वाचा – कान्होपात्रेचे समर्पण

    एकदा मन स्वच्छ झाले आणि रामाचे कर्तव्य, विजय आणि यश आपण गाऊ लागलो, की जीवनात ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’ हे चारही पुरुषार्थ अगदी सहज प्राप्त होतात. म्हणजेच, माणूस केवळ आध्यात्मिक पातळीवरच, मोक्षाची प्रगती करत नाही, तर तो व्यावहारिक जीवनातही अर्थ आणि काम या धर्माच्या मार्गाने चालत अत्यंत यशस्वी आणि तृप्त होतो.

    श्रीगुरोश्चरणाम्भोज

    रजोभिः शुद्धमानसः ।

    वर्णयामि यशः शुभ्रं

    रामस्य फलदायकम् ॥

    – गीताव्रत

    श्रीसद्गुरूंच्या चरण कमलांच्या धुळीने ज्याचे मन पूर्णपणे शुद्ध झाले आहे, असा मी आणि आपण सर्व, त्या फळ देणाऱ्या, चार पुरुषार्थ देणाऱ्या श्रीरामाच्या शुभ्र आणि निर्मळ यशाचे वर्णन करीत आहोत.

    पहा, श्रीगुरूंच्या चरणकमलांच्या धुळीने आपण आपल्या मनाचा आरसा लख्ख स्वच्छ केला. मूर्तीच्या पायाला हात लावून पायधूळ कपाळी लावली. आणि याचक्षणी मनावरची अहंकाराची आणि वासनांची धूळ पूर्णपणे निघून गेली याची खात्री केली. आता या अत्यंत स्वच्छ आणि पवित्र झालेल्या मनाच्या आरशात आपल्याला जे पहिले आणि सर्वात विलोभनीय दर्शन घडते, ते साक्षात मारोतीरायांचे आहे.

    गोस्वामी तुलसीदासजींच्या सिद्ध वाणीतून प्रकट झालेली हनुमान चालीसाची पहिली चौपाई याच मंगलमय दर्शनाने सुरू होते.

    जय हनुमान ज्ञान गुन सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर…

    यात हनुमंताच्या अफाट व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांच्या अथांग सामर्थ्याचे संपूर्ण सार सामावलेले आहे. सर्वांत पहिला शब्द येतो तो ‘जय’! आपण जय हनुमान असे म्हणू, तेव्हा ती साद आणि ते स्पंदनं आपल्या आत असलेल्या एका सर्वोच्च आणि विजयी चैतन्यमयी तत्वाला जाणवतात.

    हनुमंताच्या नावातच एक खूप मोठा अर्थ दडलेला आहे. हन म्हणजे नष्ट करणे आणि मान म्हणजे अहंकार. ज्याने आपला अहंकार समूळ नष्ट केला आहे, ज्याच्या ठायी ‘मी’पणाचा लवलेशही उरलेला नाही, तो महापुरुष म्हणजे हनुमान!

    आपण अनेक गोष्टींचा नकळत अभिमान बाळगतो. मग तो आपल्या संपत्तीचा, आपल्या शिक्षणाचा, किंवा आपल्या अधिकाराचा, पदाचा आपल्याला सतत अहंकार वाटत असतो. पण मारोतीराया आपल्याला हेच शिकवतात की, जिथे ‘अहंकार संपतो’, तिथे खऱ्या, विजयाला आणि परमार्थाला सुरुवात होते. म्हणून जय हनुमान असे म्हणताना आपण स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवण्याचा एक अत्यंत प्रामाणिक संकल्प करत असतो.

    पुढे तुलसीदासजी हनुमंताला “ज्ञान गुन सागर” असे म्हणतात. मारोतीराया हे ज्ञानाचा झरा, आणि साक्षात एक अथांग सागर आहेत. ज्ञान आणि गुण हे दोन्ही शब्द दिसायला सोपे वाटले, तरी त्यांचा अर्थ खूप व्यापक आहे. ज्ञान म्हणजे, आत्मतत्वाची खरी ओळख! शाश्वत काय आणि नश्वर काय याचा विवेक म्हणजे ज्ञान!

    हनुमंताकडे हे सर्वोच्च ज्ञान आहे, कारण ते साक्षात ज्ञानभास्कर सूर्याचे शिष्य आहेत. पण अनेकदा असे होते की, एखाद्या व्यक्तीकडे खूप ज्ञान असते, पण त्याच्यात सौजन्य, नम्रता, करुणा यासारखे गुण नसतात. कोरडे ज्ञान माणसाला अत्यंत अहंकारी बनवू शकते. याउलट काही लोकांकडे खूप चांगले गुण असतात, ते स्वभावाने खूप गोड असतात, पण त्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य याचा निर्णय घेण्याचे ज्ञान किंवा प्रगल्भता नसते.

    हनुमंताचे व्यक्तिमत्त्व या दोन्ही गोष्टींचा एक अत्यंत परिपूर्ण संगम आहे. त्यांच्याकडे वेदोपनिषदांचे आणि शास्त्रांचे अफाट ज्ञान आहे आणि त्याच वेळी त्यांच्याकडे सेवा, भक्ती, नम्रता आणि शौर्य यांसारखे सर्वोच्च गुणही आहेत. ते खऱ्या अर्थाने ज्ञानाचे आणि गुणांचे सागर आहेत. सागराची दोन प्रमुख वैशिष्ट्ये असतात. वीर हनुमंत सागरासारखे बाहेरून कितीही खवळलेले आणि रौद्र दिसत असले तरी आतून ते अत्यंत शांत, संयमी आणि गंभीर असतात. तसेच, ते स्वतःची मर्यादा कधीही ओलांडत नाहीत. हनुमंताची बुद्धी, शक्ती त्यांचे चारित्र्य आणि मन अगदी याच सागरासारखे अथांग, खोल आणि अत्यंत मर्यादाशील आहे. त्यांच्या अफाट सामर्थ्याला भक्तीची अत्यंत सुंदर किनार लाभलेली आहे.

    यानंतरची ओळ, ‘जय कपीस तिहुँ लोक उजागर’ कपीस म्हणजे वानरांचा स्वामी किंवा वानरांचा राजा! हनुमंताला इथे वानरांचा स्वामी म्हटले आहे. यामागे अत्यंत सूक्ष्म आणि सुंदर अर्थ दडलेला आहे. आपल्या अध्यात्माने मानवी मनाला एका चंचल वानराची उपमा दिलेली आहे. आपले मन एका विचारावरून दुसऱ्या विचारावर सतत उड्या मारत असते. ते क्षणभरही एका जागी शांत बसत नाही. अशा या अत्यंत चंचल आणि अस्थिर मनावर जो पूर्णपणे नियंत्रण मिळवतो, तोच खरा कपीस असतो. हनुमंताने आपल्या सर्व इंद्रियांवर आणि आपल्या चंचल मनावर पूर्ण विजय मिळवला आहे. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने कपीस आहेत. आपण जेव्हा त्यांना शरण जातो, तेव्हा आपणही आपल्या या वानरासारख्या चंचल मनाला शांत करण्यासाठी आणि त्याला एका उदात्त ध्येयाकडे वळवण्यासाठी त्यांच्याकडे शक्ती मागत असतो.

    तिहुँ लोक उजागर म्हणजे तिन्ही लोकांना प्रकाशित करणारे असे हनुमंत! स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे ते तीन लोक! आपले शारीरिक जीवन, मानसिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे मानव धर्मासाठीचे तीन लोक! जेव्हा आपण महावीर हनुमंतांची खऱ्या मनाने भक्ती करू, तेव्हा आपल्या या तिन्ही लोकांमध्ये एक अत्यंत मंगलमय प्रकाश पडतो. शारीरिक पातळीवर आपल्याला संकटांशी लढण्याचे बळ मिळते आणि आपले आरोग्य उत्तम राहते. मानसिक पातळीवर आपल्या मनातील सर्व भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर होऊन तिथे अढळ आत्मविश्वास निर्माण होतो आणि आध्यात्मिक पातळीवर आपल्याला आपल्यातल्या खऱ्या भक्तीमय, श्रद्धासंपन्न स्वरूपाची ओळख होऊन परमेश्वराची प्राप्ती होते.

    मारोतीरायांचे चरित्र इतके तेजस्वी, तपस्वी आहे की, त्यांच्या केवळ नामस्मरणाने आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा आणि दुःखाचा अंधार कायमचा नाहीसा होतो आणि तिथे ज्ञानाचा, गुणांचा आणि भक्तीचा अत्यंत लख्ख प्रकाश पडतो. आपण अनेकदा खूप गोंधळून जातो. काय करावे आणि काय करू नये, हे अनेकदा समजत नाही. अशा वेळी ‘ज्ञान गुन सागर’ असलेला हा कपीस आपल्याला अचूक रस्ता दाखवेल.

    हेही वाचा – सगुण साकार उपासना

    बाह्य जगात मिळवलेले यश हे कौतुकास्पद असेलही पण अंतरंगात आपले गुण विकसित करणे आणि ज्ञानाची उपासना करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी, नि:स्वार्थपणे सेवा करण्यासाठी आपल्याला ज्या उर्जेची आणि ज्या प्रेरणेची गरज असते, ती सर्व प्रेरणा या एकाच चौपाईमध्ये सामावलेली आहे. आपण आपले प्रत्येक काम करताना जर या सागराचे स्मरण केले, तर आपल्याही कामात एक प्रकारची अथांगता आणि पूर्णता, शक्तीचा अनुभव नक्कीच येईल.

    आपण चिंतन, ज्ञान, गुण आणि प्रकाशाची प्रार्थना करावी.

    ज्ञानस्य सद्गुणानां च

    सागरं मारुतात्मजम् ।

    त्रैलोक्यं भासते येन

    तं नमामः कपीश्वरम् ॥

    – गीताव्रत

    जो ज्ञानाचा आणि सद्गुणांचा अथांग सागर आहे, अशा त्या पवनपुत्राला आपण सर्वजण अत्यंत विनम्र होऊन वंदन करूया! ज्यांच्या अत्यंत प्रखर तेजाने आणि दिव्य सामर्थ्याने हे तिन्ही लोक नेहमी प्रकाशित आणि मंगलमय होतात, अशा त्या वानरांच्या स्वामीला, कपीश्वराला आपण अत्यंत भावपूर्ण नमस्कार करूया!

    खरोखरच या एकाच चौपाईमध्ये साक्षात हनुमंत आपल्यासमोर उभे राहतात आणि त्यांच्या त्या प्रसन्न दर्शनाने आपले संपूर्ण जीवन एका वेगळ्याच आणि अत्यंत सुंदर प्रकाशाने उजळून निघते. आपण सर्वांनी या प्रकाशाचे पाईक होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू!

    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे

    July 30, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये

    July 29, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाभीं आपणचि जन्मे ऐसें गुरुमूर्तिप्रेमें

    July 28, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे

    By Team AvaantarJuly 30, 2026

    अध्याय तेरावा गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं । ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता…

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये

    July 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाभीं आपणचि जन्मे ऐसें गुरुमूर्तिप्रेमें

    July 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : हृदयशुद्धीचां आवारीं, आराध्यु तो धुरु करी

    July 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026

    उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    July 30, 2026

    बिघाड

    July 30, 2026

    हनुमान चालीसा… चौपाईमध्ये साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे

    July 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 378
    • अवांतर 200
    • आरोग्य 134
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 512
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 243
    • मैत्रीण 24
    • ललित 816
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026

    उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    July 30, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईमध्ये साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.