Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » फुलविक्या
    ललित

    फुलविक्या

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरJuly 28, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मी मराठी, अभिजात मराठी, दिलीप कजगांवकर, लेखक दिलीप कजगांवकर, फुलविक्याची कहाणी, राजचा पश्चाताप, फुलविक्याला कमी लेखणारा राज, फुलविक्याची श्रीमंती, अमेरिकेतील उद्योगपती फुलविक्या, अमेरिकेतील उद्योगपती विकी, राजच्या शाळेला डोनेशन, दानशूर फुलविक्या, दानशूर विकी, गुरूसेवा करणारा विकी, गुरूसेवा करणारा फुलविक्या
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सकाळचे आठ वाजले होते. बंगल्याच्या हिरव्यागार बागेत राज आणि त्याचा मित्र चहा-नाश्ता करत निवांत बसले होते.

    “राजसाहेब, येऊ का मी?”

    ट्रॅक पँट, हाफ बाह्यांचा टी-शर्ट, पायात चपला, डोक्यावर टोपी आणि जुनाट सायकलवर आलेला माणूस नम्रपणे विचारत होता.

    “अरे, तू फुलविक्या ना? ये रे,” राज जरा नाईलाजानेच म्हणाला. “वीस-बावीस वर्षांनी उगवलास. शाळेत असताना होतास, तसाच दिसतोस. अजूनही फुले विकतोस का? हुशार होतास लेका. पुढे शिकलास की नाही? काय काम काढलंस?”

    फुलविक्या उभाच होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी सांगण्याची उत्कंठा होती. पण राजने त्याला बसायला सांगितले नाही आणि तो काही बोलणार, तेवढ्यात राज म्हणाला,

    “मित्रा, मी जरा घाईत आहे. पुढच्या आठवड्यात ये.”

    चहा-नाश्ताच काय, साधं पाणीही न देता राजने त्याची बोळवण केली.

    वडिलांच्या निधनानंतर शाळेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राजवर आली होती. शाळेत अनेक सुधारणा करण्याची त्याची इच्छा होती. त्यातच शाळेच्या नूतनीकरणासाठी न्यूयॉर्कस्थित माजी विद्यार्थी विकीने तब्बल एकावन्न लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती. त्या देणगीचा धनादेश स्वीकारण्याचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता होता.

    कडक इस्त्रीचे कपडे आणि ब्लेझर घालून राज निघणार, तेवढ्यात त्याची मामेबहीण नेहाचा फोन आला.

    “दादा, पप्पांना खूप त्रास होतोय. गाडी घेऊन लगेच ये ना. त्यांना दवाखान्यात न्यावं लागेल.”

    “नेहा, मला खूप महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. तू प्लीज त्यांना रिक्षाने ने, कार्यक्रम संपला की मी लगेच येतो.”

    सामाजिक प्रतिष्ठेच्या मोहापायी त्या क्षणी राजने कौटुंबिक जबाबदारीकडे पाठ फिरवली.

    राज शाळेत पोहोचला तेव्हा सभागृह खचाखच भरले होते. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी तो स्वतः प्रवेशद्वाराजवळ उभा राहिला. थोड्याच वेळात एक आलिशान गाडी प्रवेशद्वाराशी येऊन थांबली. पांढरा शुभ्र शर्ट, निळी पॅंट आणि चकचकीत बूट घातलेला एक तरुण खाली उतरला. सर्वांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

    हेही वाचा – आंधळा मागतो एक डोळा…

    “मी विकीचा मित्र,” स्वागताने संकोचलेला तो तरुण नम्रपणे म्हणाला. “विकीला अचानक एका महत्त्वाच्या कामासाठी जावं लागल्याने तो कार्यक्रमाला येऊ शकला नाही. शाळेच्या प्रगतीसाठी खूप शुभेच्छा आणि हा धनादेश विकीने दिला आहे.”

    कार्यक्रम यथासांग पार पडला. विकीच्या अनुपस्थितीची खंत सर्वांनाच वाटली; त्याच्या दातृत्वाचे राजने भरभरून कौतुक केले.

    कार्यक्रम संपताच राज दवाखान्यात पोहोचला.

    “मामा कसे आहेत? किती पैसे भरायचे?” त्याने नेहाला विचारले.

    “पप्पा आता स्थिर आहेत,” नेहा म्हणाली. “दादा, त्यांचं नशीब थोर. तुझ्याशी बोलून फोन ठेवला आणि तितक्यात त्यांचा एक जुना विद्यार्थी आला. त्यानेच त्यांना दवाखान्यात आणलं आणि पंधरा हजार रुपयेही भरले. डॉक्टरांनी धोका टळल्याचं सांगितल्यावरच तो गेला.”

    तेवढ्यात राजचा फोन वाजला.

    फोनवर विकी होता. रिटर्न फ्लाइट पकडण्यासाठी तो मुंबईला निघाला होता.

    “सर, प्रत्यक्ष भेट झाली नाही. निदान व्हिडीओ कॉलवर तरी आपले दर्शन होईल का?” राजने विचारले.

    “नक्की. पाच मिनिटांत मी व्हिडीओ कॉल करतो,” विकी म्हणाला.

    “नेहा ताई, सर कसे आहेत आता?” सरांना अगदी वेळेत दवाखान्यात आणणाऱ्या आणि आता अतिशय आस्थेने चौकशी करणाऱ्या सरांच्या माजी विद्यार्थ्याचा फोन नेहाने राजला दिला.

    “मित्रा, तू ऐनवेळी केलेल्या मदतीमुळेच सरांची तब्येत स्थिर आहे,” राज कृतज्ञतेने म्हणाला.

    “साहेब, त्यात विशेष काय? सरांसाठी काही करता आलं, हे माझं भाग्यच.”

    आवाज ऐकताच राज दचकला.

    “अरे, फुलविक्या! तू दवाखान्यात ये. तुझे पंधरा हजार रुपये मी परत करतो. शिवाय, एक हजार रुपये बक्षीसही देतो. तुझ्यासाठी ही रक्कम खूप मोठी असेल. ये, मी वाट पाहतो. मला एक महत्त्वाचा फोन येणार आहे.” म्हणत राजने फोन डिस्कनेक्ट केला.

    तेवढ्यात राजला व्हिडीओ कॉल आला.

    “विकी सर, कॅमेरा जरा नीट करा ना. तुमचा चेहरा नीट दिसत नाही,” राज म्हणाला.

    हेही वाचा – संशय

    विकीने कॅमेरा स्वतःकडे वळवला.

    स्क्रीनवरचा चेहरा पाहून राज स्तब्ध झाला… तो चेहरा दुसऱ्या कुणाचा नव्हता… तो सकाळी घरी आलेला फुलविक्या होता!

    लहानपणी फुले विकणारा तोच गरीब मुलगा… पुढे शिक्षण घेऊन न्यूयॉर्कमध्ये स्वतःचं मोठं उद्योगविश्व उभं करणारा विकी!

    न बोलवता घरी आलेल्या विकीला राजने ओळखले नव्हते. आदरातिथ्य न करताच त्याची बोळवण केली होती. स्वतःच्या कौतुक सोहळ्यापेक्षा सरांना दवाखान्यात नेण्यास प्राधान्य देणाऱ्या त्या दानशूराला राज म्हणाला होता, ‘तुझे 15 हजार रुपये परत करतो, शिवाय 1 हजार रुपये बक्षीसही देतो. तुझ्यासाठी नक्कीच ही खूप मोठी रक्कम असणार…’

    राज मनोमनी शरमला, त्याला स्वतःचीच कीव आली.

    मोठ्या देणगीदाराच्या स्वागतासाठी राज आतुर झाला होता; पण केवळ जुन्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून पूर्वीसारख्या साध्या पेहरावात स्वतःहून दारी आलेल्या त्या धनवानाला राज ओळखू शकला नव्हता.

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026 ललित

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026 ललित

    बदला

    September 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सुधाकररावांची प्रस्तावना

    By दीपक तांबोळीSeptember 16, 2026

    पूर्वार्ध “सर नमस्कार. मी चेतन शेलार, माळी सरांनी मला तुमच्याकडे पाठवलंय,” दारात उभा असलेला तरुण…

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    बदला

    September 15, 2026

    वधू-वर सूचक मंडळ

    September 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 436
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 584
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 29
    • ललित 923
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.