Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 26, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    आतां ययावरी । गुरुभक्तीची परी । सांगों गा अवधारीं । चतुरनाथा ॥368॥ आघवियांचि दैवां । जन्मभूमि हे सेवा । जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातें ॥369॥ हें आचार्योपास्ती । प्रकटिजैल तुजप्रती । बैसों दे एकपांती । अवधानाची ॥370॥ तरी सकळ जळसमृद्धी । घेऊनि गंगा रिगाली उदधी । कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहाली ॥371॥ नाना वेंटाळूनि जीवितें । गुणागुण उखितें । प्राणनाथा उचितें । दिधलें प्रिया ॥372॥ तैसें सबाह्य आपुलें । जेणें गुरुकुळीं वोपिलें । आपणपें केलें । भक्तीचें घर ॥373॥ गुरुगृह जिये देशीं । तो देशुचि वसे मानसीं । विरहिणी कां जैसी । वल्लभातें ॥374॥ तियेकडोनि येतसे वारा । देखोनि धांवे सामोरा । आड पडे म्हणे घरा । बीजें कीजो ॥375॥ साचा प्रेमाचिया भुली । तया दिशेसीचि आवडे बोली । जीवु थानपती करूनि घाली । गुरुगृहीं जो ॥376॥ परी गुरुआज्ञा धरिलें । देह गांवीं असे एकलें । वांसरुवा लाविलें । दावें जैसें ॥377॥ म्हणे कैं हें बिरडें फिटेल । कैं तो स्वामी भेटेल । युगाहिहूनि वडिल । निमिष मानी ॥378॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें

    अर्थ

    आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगू. हे चतुरांच्या राजा, तो तू ऐक. ॥368॥ ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते ॥369॥ ती गुरुभक्ति आता तुला स्पष्ट सांगितली जाईल. (मात्र) तू तिकडे एकवटून लक्ष दे. ॥370॥ तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते, अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात, ॥371॥ अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगच्या गुणावगुणांसह सरसकट आपल्या स्वत:ला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले, ॥372॥ त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर, मनादिक व बाह्य इंद्रियांदिक गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरुभक्तीचे घर केले आहे, ॥373॥ ज्याप्रमाणे विरहिणीच्या चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशांत गुरूचे घर असते, तो देश ज्याच्या मनामधे असतो ॥374॥ गुरूच्या देशाकडून जो वारा येत असेल, त्या वार्‍याला पाहून त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, “आपण माझ्या घरी यावे” ॥375॥ सद्गुरूविषयीच्या खर्‍या प्रेमाने जो वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेशीच बोलणे आवडते व जो आपल्या जीवाला गुरूच्या घरात मिरासदार करून ठेवतो. ॥376॥ परंतु वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गाईकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हलता येत नाही, त्याप्रमाणे गुरूची आज्ञा हेच कोणी एक दावे, त्याने देहास बांधून टाकल्यामुळे, त्याला एकट्याला आपल्या गावी राहावे लागून गुरूच्या गावाकडे धाव घेता येत नाही. ॥377॥ जो म्हणतो, ही गुरुआज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो स्वामी भेटेल ? तो (गुरूच्या वियोगात जाणार्‍या) निमिषाला युगाहून मोठे मानतो. ॥378॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वारियाची धांव, तैसे सरळ भाव

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : वारियाची धांव, तैसे सरळ भाव

    July 25, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें

    July 24, 2026 अध्यात्म

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : वारियाची धांव, तैसे सरळ भाव

    By Team AvaantarJuly 25, 2026

    अध्याय तेरावा तरी आर्जव तें ऐसें । प्राणाचें सौजन्य जैसें । आवडे तयाही दोषें ।…

    सार्थ ज्ञानेश्वरी : अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें

    July 24, 2026

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवुनि न्याल

    July 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    थायरॉइड विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    July 25, 2026

     ज्योतिषशास्त्र… शुभ-अशुभ ग्रहांची माहिती

    July 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 373
    • अवांतर 199
    • आरोग्य 133
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 506
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 804
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.