Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मैत्री

    July 21, 2026

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026

    वाकडं बोट

    July 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, July 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वेळ
    ललित

    वेळ

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेJuly 20, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अतुला प्रणव मेहेंदळे, अतुला मेहेंदळे, लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे, अमोलचे धावपळीचे आयुष्य, अमोलला हार्टअटॅक, करिअरमध्ये थांबण्याची योग्य वेळ, कुटुंबाला वेळ देणे, अस्मिताची धावपळ, अस्मिताची तारेवरची कसरत, अस्मिताची शाळेत नोकरी,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अस्मिताची आज खूप धावपळ होत होती. सध्या तिला नोकरी आणि हॉस्पिटल अशी तारेवरची कसरत करावी लागत होती. सोबत सासूबाई होत्या, पण वयानुसार त्यांच्या पण बारीक सारीक कुरबुरी चालूच होत्या. “अगं अस्मिता, तू जा बघू आंघोळीला. मी टाकते ती भाजी फोडणीला. अगं घाबरू नकोस नाही करत झणझणीत… अमोलला नाही सांगितली आहे ना डॉक्टरांनी… तू नको काळजी करू, जा तू…” अस्मिता लगेचच आंघोळीला पळाली आणि नंतर अमोलसाठी डबा घेऊन हॉस्पिटलला गेलीसुद्धा! थोड्या वेळाने सारंग त्याच्या क्लासला गेल्यावर सरोज वहिनी अस्मिताने बनवलेल्या चहाचा कप घेऊन गॅलरीमध्ये लावलेल्या झोपाळ्यावर येऊन बसल्या.

    सरोज वहिनी म्हणजे श्रीमती सरोज अरुण ताकभाते. त्यांना एकुलता एक मुलगा अमोल, सून अस्मिता आणि नातू सारंग. सरोज वहिनींचे मिस्टर काही वर्षांपूर्वी कार अपघातात गेले आणि सगळ्या घराची जबाबदारी सरोज वहिनी सांभाळायला लागल्या. अमोलचं आईवर नितांत प्रेम होतं. त्या होत्याच तशा प्रेमळ. अमोल जसजसा मोठा झाला, त्याला जबाबदारीची जाणीव झाली आणि शिक्षण पूर्ण करता करता त्याने लगेचच नोकरी धरली. खरंतर, त्याला ‘फाइन आर्ट’मध्ये डिग्री घ्यायची होती. त्याला कलेची आवड होती पण खिसा आणि घर सांभाळण्यासाठी त्याने सीए केलं आणि स्वतःला बैलागत घाण्याला जुंपून टाकलं.

    आता तर मोठ्या तीन बेडरूमच्या घरात सगळे आनंदाने रहात असतानाच 7-8 दिवसांपूर्वी अचानक त्याला ऑफिसमध्ये छातीत दुखायला लागलं. ऑफिसमधले त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि अस्मिता ज्या शाळेत नोकरी करते, तिथे फोन करून तिला बोलवून घेतलं. तेव्हापासून सगळ्यांची ओढाताण सुरू होती. जास्तकरून अस्मिताची. शाळेत तर तिने 15 दिवसांची रजा टाकली होती. अमोलला माइल्ड हार्टअटॅक आला होता. पण ‘थोडक्यात निभावलं’ असं डॉक्टर म्हणत होते.

    हेही वाचा – कौटुंबिक कथा… ‘सुखस्वप्न’

    “आजी येतेस ना जेवायला,” विचार करता करता दुपारच्या जेवणासाठी सारंग घरी कधी आला ते सरोज वहिनींना कळलंच नाही. “अग्गोबाई, तू आलास पण घरी? काय बाई मी विचारात गढून गेले. आपल्यासाठी थांब जेवण गरम करते,” असं म्हणून त्या उठताना गुडघ्यात बारीकशी कळ गेली, चेहरा कसनुसा झाला. नेमकं ते सारंगने बघितलं. “आजी मी जेवण गरम केलं आहे. तुला इकडे आणून दिलं असतं मी. तसे पण इतकी वर्ष आपणच तर जेवतो दोघे. बाबा तर कधीच नसतात दुपारी जेवायला आणि मी शाळेतून घरी येईपर्यंत आई आधीच नोकरीवर गेलेली असते. तशी माझी काहीच तक्रार नाहीये. पण आज जास्तच एकटं वाटत होतं गं… म्हणून म्हटलं निदान तू तरी ये…”

    सरोज वहिनींना चेहरा बघावला नाही नातवाचा. बाबा आजारी बघून 14 वर्षांचं पोर अगदी भांबावलं आहे. त्यानंतर दोघे निमूट जेवले. अस्मिता संध्याकाळी जरा खूश होती. उद्या अमोलला घरी सोडणार आहेत, त्यामुळे तिची ओढाताण थोडीफार तरी थांबणार होती. आता घरीच काळजी घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता सगळे घरी आले. अमोलचा चेहरा बघून सरोज वहिनी आनंदल्या. आठ दिवसांत मुलाचा चेहरा फक्त दोनदा दिसला होता त्यांना! गुडघेदुखीमुळे त्या आता कुठे बाहेर जात नव्हत्या.

    दोन-तीन दिवसांनी सगळं बस्तान बसल्यावर रविवारी सगळे घरी असताना सरोज वहिनींनी सकाळीच फर्मान सोडलं, “आज संध्याकाळचा चहा आपण सगळ्यांनी एकत्र घ्यायचा आहे. मी बनवणार आहे. अस्मिताला आराम तेवढाच. आपल्याकडे वसू आहे तशी वरकामाला. पण तरीही घरच्या बाईची कामं काही कमी नाहीत. सारखी कष्ट करून दमत असेल. त्यात माझी काही साथ नाही. त्यामुळे आज मी करते चहा.”

    अमोल आणि अस्मिता आई असं का म्हणाली असेल याचा विचार करत एकमेकांकडे बघत होते. संध्याकाळी सरोज वहिनींनी सगळ्यांसाठी आलं घालून चहा केला. अमोलसाठी थोडाच केला. त्यावर अमोल म्हणाला, ” हे काय मला घोटभरच चहा? आणि तुम्हाला हवा तेवढा? हे काय गं आई!” त्यावर सरोज वहिनी काही न बोलता अमोल शेजारी येऊन बसल्या. “आमू बाळा, अरे सध्या इतकाच घे. डॉक्टरांनी कमी चहा सांगितला आहे ना! काही दिवसांनी परत करेन आणि तेव्हा तुला जास्त देईन हो…” असं म्हणून त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला.

    अमोल तर बघतच बसला त्याच्या डोळ्यांत एकदम अश्रू दाटून आले. “आई, तू कित्ती वर्षांनी मला आमू बाळा म्हणालीस. कान आसुसले होते गं आणि हा तुझा कापरा हात कित्ती दिवसांनी हातात घेतोय…”

    आता मात्र सरोज वहिनींचे डोळे भरले. “आमू एक सांगू का? सोन्या कित्ती वर्षं नुसता धावतोच आहेस रे. तुझे अप्पा गेले आणि तू जे स्वतःला कामात गुरफटून घेतलं की, तुला कशाचा पत्ताच नाही. अरे, तुम्ही सगळे धावताय रे, पण मी मेली दुखऱ्या पायांनी नाही धावू शकत आहे. मी मागेच राहिले. थोडं मागे वळून पहा की रे! मी काय म्हणते थोडा वेळ स्वतःसाठी तरी देत जा. तुला ती चित्रकला का काय ते, त्याची आवड होती, मला माहिती आहे. पण माझ्यासाठी आणि आता आमच्यासाठी तू तुझी आवड बाजूला ठेवलीस. ती आवड परत जोपास ना. अरे, धावता धावता तू तुझ्यासाठी, घरच्यांसाठी जगायला विसरत चालला आहेस. मी काय रे आज आहे उद्या नाही. पण तू इतका ही पळू नकोस की, स्वतःची तब्येत ढासळेल. तरुणपण आहे, तोच जगून घे. अस्मिताचे एन्जॉय करण्याचे दिवस आहेत. तिला वेळ दे. फिरायला जा. तिलाही शाळेतून सुट्टी मिळत नसली तरी, ती आवर्जून काढा. इतकाही व्यग्र होऊ नकोस की, सारंग अकाली मोठा होईल तुझ्यासारखा! त्यांनाच कशाला मलाही तू हवा आहेस. आता पुरे झालं पैसा पैसा करणं थोडं जगून घे रे… म्हातारं झाल्यावर मग पश्चात्ताप करत बसशील, तेव्हा काही उपयोग नाही. हीच वेळ आहे स्वतःला आनंदी ठेवण्याची आणि दुसऱ्याला आनंद देत जगण्याची… आणि अस्मिता हीच गोष्ट तुला पण लागू होते, काय कळतंय का काही?”

    हेही वाचा – दृष्टिकोन…

    आईच्या या शब्दांनी अमोल आणि अस्मिता दोघांना कळून चुकलं की, आपलं गणित नक्की कुठे गंडलं आहे. दोन मिनिटं शांततेत गेल्यावर अमोलच म्हणाला, “हो आई, तू बरोबर बोलत आहेस. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला भानावर आल्यासारखं झालं. मी इतका कसा वहावत गेलो. सगळ्यांना ऐहिक आनंद देण्याच्या प्रयत्नात मी जगण्यातला आनंदच विसरून गेलो. पण खरं सांगू आई? मी लहानपणी म्हणायचो ना, तेच खरं आहे… U ARE THE BEST! आता मी नक्की कुठे थांबायचं, हे स्वतःला रोज आवर्जून सांगेन आणि त्याप्रमाणे थांबेन… आणि हो, एक गोष्ट मला आजही मान्य आहे की, तू कान ओढल्याशिवाय मी काही ताळ्यावर येत नाही. शेवटी काय, ‘तू है तो सबकुछ है माँ, वरना कुछ भी नहीं…” असं त्याने म्हणताच सगळे मनमोकळे हसले.

    सरोज वहिनींना आभाळ मोकळं झाल्यासारखं वाटलं. त्यांनी परत अमोलच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. निसटत चाललेला लेकाचा हात हातात परत गवसल्याचा आनंद संध्याकाळच्या संधीप्रकाशातही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे, वय 38. राहणार ठाणे येथे. प्रॅक्टिसिंग सी. एस. आणि एल. एल. बी.चं शिक्षण घेतलं आहे. गेली 14 वर्षं कंपनी सेक्रेटरी म्हणून स्वतःची प्रॅक्टिस करत आहे. पुस्तक वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरण्याचा छंद आहे. तसं आधीही लिहावं असं खूप वाटायचं, पण खरी सुरुवात कोरोना काळात स्वामींच्या आशीर्वादाने म्हणा किंवा प्रसादाने म्हणा स्वामींच्या प्रकट दिनी त्यांच्यावरच्याच लेखाने झाली. मी लिहिलेल्या बऱ्याच कथांच्या अभिवाचनासह दिवाळी अंक, छोट्या छोट्या वर्तमानपत्रात विविध कथा छापून येत राहिल्या. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला. वय आणि अनुभव छोटा असला तरी आता बऱ्याच कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या. व्यावसायिक दृष्टिकोनातून कधीच लिखाण केलं नाही. लोकांना आवडतील, रुचतील, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा लघुकथा लिहिण्याचा प्रयत्न करते. शेवटी मायबाप रसिक, आईवडील, सर्व वडीलधारे नातलग आणि देवाच्या कृपाशीर्वादाने असं लिखाण आजन्म घडो, ही दत्तगुरूचरणी प्रार्थना.

    Related Posts

    मैत्री

    July 21, 2026 ललित

    वाकडं बोट

    July 21, 2026 ललित

    कलियुगातील एकलव्य

    July 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मैत्री

    By दिलीप कजगांवकरJuly 21, 2026

    राज आणि नेहा पुण्यातील एका प्रशस्त बंगल्यात राहणारे अतिशय श्रीमंत दाम्पत्य होते. बड्या साहेबांचा मुलगा…

    वाकडं बोट

    July 21, 2026

    कलियुगातील एकलव्य

    July 20, 2026

    एका घासात विठ्ठल…

    July 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मैत्री

    July 21, 2026

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026

    वाकडं बोट

    July 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते

    July 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 जुलै 2026

    July 21, 2026

    वेळ

    July 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 366
    • अवांतर 198
    • आरोग्य 131
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 499
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 240
    • मैत्रीण 24
    • ललित 792
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मैत्री

    July 21, 2026

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026

    वाकडं बोट

    July 21, 2026
    Most Popular

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.