Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सौरभचा बारावी परीक्षा निकाल अन्…

    July 14, 2026

    शेठजी अन् ‘चत्रभुज नानजी’कडचे पेढे

    July 14, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल चटपटीत आलू बोंडा रस्सा

    July 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, July 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कालातीत कलाकृती…
    फिल्मी

    कालातीत कलाकृती…

    सुरेखा मोंडकरBy सुरेखा मोंडकरJuly 14, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सुरेखा मोंडकर, लेकिका सुरेखा मोंडकर, अदरक के पंजे, बब्बन खान यांचा एकपात्री प्रयोग, अदरक के पंजाची गिनीज बुकमध्ये नोंद, बब्बन खान ॲक्टिंग अकादमी, अदरक के पंजेची 28 भाषांमध्ये
    अभिनेते दिलीप कुमार यांच्यासमवेत बब्बन खान (पहिले छायाचित्र). 'अदरक के पंजे'ची पॅरिसमधील जाहिरात (दुसरे छायाचित्र.)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    22 सप्टेंबर 1965 रोजी रंगमंचावर आलेल्या ‘अदरक के पंजे’ या एकपात्री कार्यक्रमाची सांगता 11 फेब्रुवारी 2011 ला झाली. त्या दिवशी पडलेला पडदा प्रचंड लोकप्रियता आणि रसिकांची मागणी असूनही पुन्हा वर उचलला गेला नाही. त्याचा कर्ताकरविता बब्बन खान आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

    अदरक के पंजे  आणि  बब्बन खान  यांची  इस्टोरी  पुरी  फिल्मी  वाटावी अशी आहे. बब्बन खान तेव्हा ऐन विशीत होते. हातात पदवी होती, पण नोकरी नव्हती. घरात चारी  विश्व दारिद्र्य होतं. हातातोंडाची गाठ पडणं मुश्कील होतं. बब्बन खानचे तीन भाऊ आणि चार बहिणी कुपोषणामुळे निरनिराळ्या वयाला मरण पावले होते. हे धाकटे मुल जगले होते. गरिबीत कसेबसे वाढत होते. नोकरीसाठी, काही आमदनी व्हावी अन् कुटुंबाला चार घास मिळावेत म्हणून रस्तोरस्ती फिरत होते.

    एक दिवस त्यांच्या मनात कल्पना आली. हैदराबादच्या त्यांच्या चंद्रमौळी घरासमोरच्या  टुकार गल्लीतल्या मंद प्रकाशाच्या रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून त्यांनी आपलीच जीवन  गाथा लिहायला सुरवात  केली. उपहास, उपरोध यांनी ते लेखन ओतप्रोत भरलेलं होतं. विनोदाला कारुण्याची झालर होती. ते जे काही भोगत होते, त्याहून काहीतरी वेगळंच कागदावर उतरत होतं. याला कारण म्हणजे आयुष्याकडे बघायची त्यांची सकारात्मक वृत्ती!

    हेही वाचा – …असाही विचार करता येतो!

    हाती दमडी नव्हती. आईचं मंगळसूत्र त्या काळात 275 रुपयाला विकून त्यांनी 22 सप्टेंबर 1965 रोजी ‘अदरक के पंजे’ रंगमंचावर आणलं. पैशांची तर वानवाच होती… डोळे दिपवणारा सेट नाही, पार्श्वसंगीत नाही, दिव्यांची, प्रकाशाची उधळण नाही… असा हा एकपात्री कार्यक्रम  सुरू झाला. मंचावर फक्त जुनाट, पत्र्याची दुमडता येणारी खुर्ची, काही पत्र्याचे डबे, एक मोडकी बाबा आदमच्या काळातली बाज (खाटलं)… एवढंच! पहिले एक-दोन प्रयोग साफ पडले. खर्च सुद्धा भरून आला नाही. पण नंतर मात्र हा कार्यक्रम धो धो चालायला लागला.

    1984मध्ये सर्वात जास्त प्रयोग झालेला एकपात्री कार्यक्रम म्हणून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness Book of World Records) नोंद झाली. उर्दू आणि जुन्या हैदराबादी  भाषेत असणाऱ्या या एकपात्री कार्यक्रमाचे, जगभरातील 27 निरनिराळ्या भाषांमध्ये अनुवाद झाले. 35 वर्षांत 3 करोड लोकांनी तो पाहिला. 60 देशांत त्याचे प्रयोग झाले. परदेशातील त्यांच्या प्रयोगांना भारतीय लोकांबरोबरच ही भाषा अवगत नसणारे स्थानिक पण हजर  असायचे. केवळ हे काय अजब गारुड आहे, हे बघण्याच्या उद्देशाने! वॉशिंग्टन ऑडिटोरिअममध्ये (Washington Auditorium) मायकेल जॅकसन, फ्रँक सिनात्रा यांच्याबरोबरच बब्बन खान यांची पण स्वाक्षरी जतन करून ठेवलेली आहे. 128 आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रातून ही अजब कहाणी लिहिली गेली आहे. परदेशात तर ‘Babban Khan In Your Town’ एवढीच  पाटी गर्दी खेचायला पुरेशी असायची.

    बब्बन खान यांनी आपल्या कार्यक्रमाचे हक्क टीव्ही, सिनेमा… कुणालाच विकले नाहीत. सर्व हक्क त्यांच्या स्वाधीन आहेत. त्या काळात कुटुंब नियोजनाचा संदेश  देणारा, ‘छोटा परिवार सुखी परिवार’ हे हास्यस्फोटक पद्धतीने सांगत असणारा हा कार्यक्रम सरकारी कृपादृष्टीपासून वंचित राहिला.

    हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    मी देखील हा कार्यक्रम बऱ्याच उशिरा, ठाण्यात झाला तेव्हा, साधारण ऐशीच्या उत्तर दशकात  पाहिला. या कार्यक्रमाने बब्बन खान यांना प्रचंड लोकप्रियता, कीर्ति, यश, पैसा, नावलौकिक दिला; पण त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले. जिथे त्यांचं मोडकळीला आलेलं दरिद्री घर होतं, तिथे आज त्यांचा आठ शयनकक्ष असणारा आलिशान बंगला उभा केला. हैदराबादमध्ये ते बब्बन खान ॲक्टिंग अकादमी (Babban  Khan Acting Academy) सुरू केली.

    युट्यूबवर जमशीद खान यांचा मूळ संहितेवर आधारित ‘अदरक को पंजे’ हा कार्यक्रम उपलब्ध आहे. पण आता विनोदाने आणि एकंदरीत जगानेच, माणसांच्या आवडीनिवडीनेच इतकं अजब रूप धारण केलं आहे की, हा कार्यक्रम मनापर्यंत पोचत नाही. पण, ज्यांना हा कार्यक्रम  माहिती नसेल त्यांनी बब्बन खान आणि ‘अदरक के पंजे’ ही काय चीज होती, याची झलक म्हणून ही क्लिप बघायला हरकत नाही. पण ती मजा येत नाही. काही काही कलाकृतींना  कालमर्यादा असती तर काही कालातीत असतात.

    Avatar photo
    सुरेखा मोंडकर

    लेखिका सुरेखा मोंडकर या M A, B Ed, माजी मुख्याध्यापिका (मराठी माध्यम हायस्कूल) आहेत. याशिवाय, समाजकार्यकर्ती, Rotarian, आकाशवाणी कलाकार, हौशी नाट्यकर्मी (अभिनय, लेखन, दिग्दर्शन), कथाकथनकार, समुपदेशक (मानसशास्त्र), निसर्ग/ बागप्रेमी, यूट्यूबर आणि दोन इंजिनीअरिंग कंपनीच्या संचालिका देखील आहेत.

    Related Posts

    माझी छोटी मैत्रीण…

    July 13, 2026 फिल्मी

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026 फिल्मी

    Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    June 28, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    माझी छोटी मैत्रीण…

    By हर्षा गुप्तेJuly 13, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझी एक मैत्रीण आहे… छोटी मैत्रीण,…

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    June 28, 2026

    मला कायम जपणारे स्नेहबंध…

    June 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सौरभचा बारावी परीक्षा निकाल अन्…

    July 14, 2026

    शेठजी अन् ‘चत्रभुज नानजी’कडचे पेढे

    July 14, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल चटपटीत आलू बोंडा रस्सा

    July 14, 2026

    कालातीत कलाकृती…

    July 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाना रोगीं अहाळलीं, लोळतीं भूतें देखिलीं 

    July 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 जुलै 2026

    July 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 359
    • अवांतर 196
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 489
    • फिल्मी 57
    • फूड काॅर्नर 235
    • मैत्रीण 24
    • ललित 779
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सौरभचा बारावी परीक्षा निकाल अन्…

    July 14, 2026

    शेठजी अन् ‘चत्रभुज नानजी’कडचे पेढे

    July 14, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल चटपटीत आलू बोंडा रस्सा

    July 14, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.