मेष
- सुखदायक आठवडा आहे. नोकरदारांसाठी बढतीचे योग आहेत. मित्रांबरोबर पैशांचे व्यवहार टाळणे हिताचे ठरेल. मातृचिंता मिटेल. वाहन किंवा वास्तू खरेदीचा योग आहे. गुरुच्या दृष्टीमुळे व्यावसायिक वर्गाला आईचे आशीर्वाद उपयोगी येतील. कामाच्या जागेत बदल होण्याची शक्यता आहे. पैशांची आवक वाढेल. मनाप्रमाणे खर्च करू शकाल. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी. त्या मनाप्रमाणे खर्च करू शकतील. विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवून अभ्यास करावा लागेल.
वृषभ
- सर्वार्थाने उत्तम आठवडा आहे. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रीत करावे. वरिष्ठांशी वाद घालू नका. घर किंवा इतर काही खरेदी करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. व्यावसायिक वर्गाला नवीन प्रकल्प हाती घेता येतील. पैशांची बचत करू शकाल. कामासाठी लहान-मोठे प्रवास घडतील. महिलांचे भावंडांबरोबरचे संबंध सुधारतील आणि त्याच्यासमवेत छान वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकेल.
मिथुन
- आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्तम आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकेल. त्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल. आर्थिक बाजू भक्कम असेल. अशा वेळी धनसंपदा साठवून ठेवा. व्यावसायिक वर्गाची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. परदेशात फिरायला जाण्याचा योग आहे. अडकलेले पैसे हाती येतील. घरात पाहुणे येण्याची शक्यता असल्याने महिलांना त्याचे आगतस्वागत करावे लागेल. भाऊ-बहिणींशी वाद होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल; आवडत्या क्षेत्रात प्रवेश मिळेल.
कर्क
- गुरू कर्क राशीत असल्याने निराशेचे वातावरण जाऊन नवीन मार्ग सापडतील. कामाच्या ठिकाणचे राजकारण आणि गटबाजीचा नोकरदारांवर काही परिणाम होणार नाही. तथापि, स्वतःचे काम चोख करा, तुमचे कामच बोलेल. व्यावसायिक वर्गाला पैशाची चांगली गुंतवणूक करता येईल. कामानिमित्त छोटे-मोठे प्रवास करू शकाल. आर्थिक आणि सामाजिक पत वाढेल. महिलांना मुलांकडून आनंदाच्या बातम्या समजतील, त्यामुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना ज्येष्ठ गुरू आणि प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल.
सिंह
- या आठवड्यात मोठे प्रवास घडण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक एखादी घटना घडण्याची शक्यता आहे, तयार रहा. हितशत्रूंपासून सावध रहा. व्यावसायिक वर्गाने आर्थिक नियोजन व्यवस्थित करावे. दिवाळीपर्यंत खर्च जपून करा. महिलांचे सासरच्या मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. उत्तम काळ असला तरी विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावे. श्रीगणेशाची उपासना करावी.
हेही वाचा – वर्दे सर 40 वर्षं अज्ञातवासात का होते?
कन्या
- भाग्यकारक आणि शुभ काळाची सुरुवात आहे. नोकरदारांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच वैद्यकीय मदत घ्या. कामाच्या ठिकाणी हितशत्रूंपासून तसेच गोड बोलणाऱ्यांपासून सावध रहावे. व्यावसायिक वर्गाने नवीन कर्ज घेण्याचे तूर्तास टाळावे. अडचणीच्या वेळी मित्रांची साथ मिळेल, इच्छापूर्ती होईल. महिलांच्या नवीन ओळखी होतील. तरी या नवीन ओळखींच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. सामाजिक कार्य कराल. विद्यार्थ्यांनी अध्ययन योग्य प्रकारे करावे. तसेच प्राणीसेवा करावी.
तुळ
- कार्यक्षेत्रातील प्रगतीचा उत्तम आठवडा आहे. नोकरदारांना आर्थिक स्थैर्य मिळेल. मात्र, अविचारातून निर्णय घेणे टाळा. कामासाठी लांबचे प्रवास होतील. व्यावसायिक वर्गाने जुने कर्ज फेडून टाकण्याला प्राधान्य द्यावे. तज्ज्ञ व्यक्तीकडून आर्थिक नियोजन करून घ्या. महिलांनी योग्य आहार-विहार करावा, तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी मोबाइलच्या व्यसनापासून दूर रहावे.
वृश्चिक
- भाग्याचा आलेख चढता राहील. या आठवड्यात धार्मिक स्थळी भेट देऊ शकाल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. बदली होण्याची शक्यता आहे. नवीन घर घेण्याचा योग आहे. व्यावसायिक वर्गासाठी शेअर मार्केटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भावनेच्या भरात घेतलेले महिलांचे निर्णय चुकू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, श्रद्धा आणि सबुरी ठेवावी.
धनु
- या आठवड्यात संमिश्र फळ मिळेल. नोकरदारांना घरच्या मंडळींसाठी खर्च करावा लागेल. सेकंड हॅण्ड वाहन खरेदीचा योग आहे. छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाने सगळ्यांना बरोबर घेऊन कामे करावे. भागीदार आणि हाताखाली काम करणाऱ्यांशी चर्चा करून तुमचे प्रश्न मांडा. तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल. महिलांनी कोणाशीही वाद घालू नये. तसेच, प्रवासात पर्स सांभाळावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण येऊ देऊ नका, योगाभ्यास करा.
मकर
- उत्तम काळ आहे. नोकरदारांचा कामाचा व्याप वाढेल. पण त्याचबरोबर अधिकार वाढेल. पैशांची योग्य गुंतवणूक करू शकाल. भागीदारीत व्यापार असेल तर व्यावसायिक वर्गाला चांगला फायदा होईल. प्रदर्शन आणि जाहिरातींतून जास्त फायदा मिळेल. महिलांच्या दृष्टीने घरात आनंदी वातावरण असेल. तथापि, अनावश्यक खर्च टाळावा. विद्यार्थ्यांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. खोटे वायदे देऊ नका, कुसंगत टाळावी.
कुंभ
- स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. नोकरदारांच्या बाबतीत सामान्य आठवडा आहे. नेहमीप्रमाणे सर्व कामे पूर्ण करू शकाल. वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाला कामाच्या ताणामुळे खूप संभ्रम आणि अनामिक भीती वाटत राहील. शांत विचार करून निर्णय घ्या. योगाभ्यास करा. गरजेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील. सात्त्विक आहार घ्यावा. विद्यार्थ्यांनी व्यायाम करावा. मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा योग आहे.
हेही वाचा – वातविकारासाठी आहार मार्गदर्शन
मीन
- ग्रहांची चांगली साथ लाभेल. नोकरदारांनी संयम ठेवावा. अपेक्षा न ठेवता काम करत रहा. चांगल्या कामाचा मोबदला नंतर मिळेल. व्यावसायिक वर्गाने स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवावे. व्यावसायिक गुपिते सांभाळून ठेवा, कोणाच्याही हाती देऊ नका. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. महिलांनी कोणतीही अपेक्षा ठेवू नये, अपेक्षाभंगाने दुःख होईल, हे जेवढे लवकर समजेल तेवढे आनंदी राहू शकाल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकेल, वेळेचे महत्त्व समजून घ्या.


