Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गेटवर धडकलेली ‘ती’ पार्थच्या समोर होती…

    July 2, 2026

    नोकरी करणाऱ्या मातेची बाळासाठी तगमग

    July 2, 2026

    Kitchen Tips : जॅमचे आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली!

    July 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : जॅमचे आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली!
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : जॅमचे आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली!

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 2, 2026Updated:July 2, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, जॅमचे आइस्क्रीम, मस्त जेली, स्वस्त मस्त जेली, मिक्स फ्रुट जॅम आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी जॅम आइस्क्रीम, पिस्ता आईस्क्रीम, रंगीबेरंगी जेली, मनपसंद जेली
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. वेगवेगळ्या जॅमपासून आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा.

    • एक लीटर दूध अर्धा लीटर होईपर्यंत आटवा. अर्धा कप दूध बाजूला काढा. ते गार झाल्यावर त्यात एक चमचा कस्टर्ड मिसळा. नंतर ते आटवलेल्या दुधात घाला. चवीप्रमाणे साखर घाला. मिश्रण गार झाल्यावर आपल्या आवडीचा जॅम दोन चमचे त्यात घाला. चव पाहून परत थोडी साखर घाला. सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून चांगले एकजीव करून घ्या. बाजारातून आणलेल्या आइस्क्रीमच्या  रिकाम्या कपांमध्ये मिश्रण ओता. हे कप फ्रिझरमध्ये ठेवा. दोन तासांत सुंदर आइस्क्रीम तयार होते. आंबा, अननस, स्ट्रॉबेरी जॅम (क्रश), मिक्स जॅम याचा वापर करता येईल. पिस्त्यासाठी थोडे काजू वाटून थोडे तुकडे घाला. थोडा हिरवा रंग घाला. मुद्दाम पिस्ता आणायला नको. पिस्ता आइस्क्रीम चांगले होते. ज्या सीझनमध्ये जी फळे मिळतात त्या फळाचा रस मिक्सरमधून काढा आणि गार मिश्रणात घाला. घट्ट आणि नैसर्गिक रंग, वास मिळतो. चवही छान लागते. आइस्क्रीम मात्र छोट्या कपातून फ्रिझरमध्ये ठेवले, तर पटकन होते. दूध व्यवस्थित आटवून घट्ट करा.

    हेही वाचा – Kitchen Tips : मटकीचे सूप, व्हेज पुलाव, कडधान्याची उसळ बनविताना…

    • बाजारात मिळणारी तयार जेलीची पाकिटे खूपच महाग असतात. घरच्या घरी जेली तयार करण्यासाठी बाजारात प्लेन जिलेटिनची छोटी पाकिटं मिळतात. घरात कुरडया आणि आइसक्रीम करण्यास वेगवेगळे स्वाद तसेच रंगाच्या बाटल्या असतात, त्याच वापरणे. यासाठी पाणी 500 मिलिलीटर, जिलेटिन एक टेबलस्पून, लिंबाचा रस दोन टेबलस्पून किंवा सायट्रिक अॅसिड पाव चमचा, साखर 10 टेबलस्पून… हे साहित्य घ्या. प्रथम जिलेटिन पाव कप पाण्यात भिजवा, उरलेले पाणी उकळवून त्यात साखर विरघळून घेणे. जिलेटिन मंद आचेवर विरघळून घेऊन गरम साखरेच्या पाण्यात मिसळवा. त्यात सायट्रिक अॅसिड किंवा लिंबाचा रस घालून ते थंड होऊ द्या. आवडीप्रमाणे रंग आणि इसेन्स घाला. मिश्रण गार झाल्यावर ‘जेली मोल्ड’ पाण्याने विसळून घ्या. त्यात जेलीमिश्रण सेट करायला ओतून, फ्रीजमध्ये बर्फाच्या कप्प्यात ठेवणे. सेट झाल्यावर साध्या कप्प्यात हलवा, म्हणजे जेली बर्फाळ आणि कडक होत नाही. साखर, रंग आणि इसेन्स आवडीनुसार कमी जास्त करता येते. एकदा ही बेसिक कृती जमली की, रंगीबेरंगी जेलीचे प्रकार करता येतात आणि आवडीनुसार फळांचे तुकडे, केळी, सफरचंद, पपनस वगैरे घालता येतात आणि ही स्वीट डिश दूध-सायीबरोबर खाणे योग्य, असे म्हणतात.

    हेही वाचा – Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर,  avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    June 30, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : चमचमीत आलू पराठा अन् खमंग बटाटावडा…

    June 26, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    By Team AvaantarJune 30, 2026

    नीलिमा विजय खडतकर कलिंगडाच्या सालीचे डोसे साहित्य मध्यम आकाराच्या कलिंगडाच्या हिरव्या सालीच्या फोडी – 5-6…

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026

    Recipe : चमचमीत आलू पराठा अन् खमंग बटाटावडा…

    June 26, 2026

    पोळी करणे… चंमतग

    June 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गेटवर धडकलेली ‘ती’ पार्थच्या समोर होती…

    July 2, 2026

    नोकरी करणाऱ्या मातेची बाळासाठी तगमग

    July 2, 2026

    Kitchen Tips : जॅमचे आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली!

    July 2, 2026

    पोळी बदलली… आणि विचारही!

    July 2, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : नवल अहंकाराची गोठी, विशेषें न लगे अज्ञानापाठीं 

    July 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 जुलै 2026

    July 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 346
    • अवांतर 193
    • आरोग्य 126
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 474
    • फिल्मी 54
    • फूड काॅर्नर 230
    • मैत्रीण 23
    • ललित 752
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गेटवर धडकलेली ‘ती’ पार्थच्या समोर होती…

    July 2, 2026

    नोकरी करणाऱ्या मातेची बाळासाठी तगमग

    July 2, 2026

    Kitchen Tips : जॅमचे आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली!

    July 2, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.