Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    June 28, 2026

    कोरोना काळातील ‘बावर्ची’

    June 28, 2026

    सलग 131 डॉट बॉल्स…

    June 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, June 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!
    फिल्मी

    Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारJune 28, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, चित्रपट परीक्षण, रेंटल फॅमिली, Rental family, आयुष्यातील गाळलेल्या जागा, गाळलेल्या जागा भरणारी एजन्सी, ग्राहकाशी भावनिक नाते, नातेवाइक पुरविणारी जपानी एजन्सी, खोटे नाते,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    Rental family… हा जापनीज सिनेमा एका वेगळ्याच विषयावर आहे. भाडोत्री नातलग किंवा गरजेनुसार व्यक्ती मिळवून देणारी संस्था असते. थोडक्यात, नात्याचा आभास निर्माण करून देणारी एजन्सी. अभिनयाची आवड असलेले पण यशस्वी नसलेले, पैशांची गरज असलेले नटनटी या संस्थेसाठी काम करतात.

    फिलीप नावाचा मध्यमवयीन अमेरिकन नागरिक जपानमध्ये राहात असतो. काही जाहिराती आणि मालिकांमध्ये काम केल्यावर आता बरेच दिवस या परक्या देशात त्याच्याकडे काम नाही. तो एजन्सीसाठी ‘टोकन व्हाइट गाय’ असतो आणि एजन्सी त्याला पहिले काम देते, एका लेस्बियन मुलीच्या नवऱ्याची भूमिका करण्याचा. तिचा खोटा खोटा विवाह सोहळा करण्याचे काम संस्था करत असते. यानंतर वेगवेगळ्या भूमिका त्याला मिळतात. वडील नसलेल्या मुलीचा पिता, सुप्रसिद्ध पण स्मृतीभ्रंश होऊ घातलेल्या वृद्ध अभिनेत्याची मुलाखत घ्यायला आलेला पत्रकार… अशा भूमिका तो करतो. चित्रपटातील नायिकासुद्धा हेच काम करत असते. एकूणच, माणसांच्या आयुष्यातल्या गाळलेल्या जागा भरायचे काम ही मंडळी करतात. नायिका आकिओ म्हणते की, आमच्या एजन्सीची सर्वात लोकप्रिय सेवा क्षमायाचना मागण्याची आहे. तिला एकदा ग्राहकाच्या पत्नीकडून मार खावा लागतो.

    हेही वाचा – वेगवेगळया पातळ्यांवर लढणारी ‘केतकर वहिनी’

    माणसे खोटे का बोलतात? याचे उत्तर नेहमीच नकारात्त्मक नसते. ज्या व्यक्तीवर आपले अत्यंत प्रेम आहे तिला दुखवू नये, आनंद मिळावा किंवा भले व्हावे या हेतूनेही खोटे बोलले जाते. जेव्हा असे भाड्याचे, खोटे आयुष्य जगू लागतो तेव्हा काही काळानंतर ते खरे वाटू लागते!

    सत्य असत्य, खोटे खरे काय असते? असा प्रश्न हा सिनेमा विचारतो. आयुष्यात अनेक प्रकारची नाती आपण सांभाळत असतो. काही रक्ताची नाती, कौटुंबिक, मैत्रीची आणि परिचित व्यक्तींची आणि यापलीकडे असलेले अपरिचित व्यक्तीशी नाते… सर्व नात्यांत भावनिक गुंतवणूक असते. भाडोत्री भूमिका करताना फिलीप त्याचे मन बाजूला काढून ठेवू शकत नाही आणि या व्यवसायात हा मोठा गुन्हा असतो. या सर्व भूमिकांमुळे जोडल्या गेलेल्या माणसांचे त्याचे एक कुटुंब होते. सत्य असत्यात असलेली सीमारेषा प्रेम या भावनेमुळे धूसर होते, क्षीण होते. अकिओ एकदा फिलीपला विचारते की, तुझ्या आयुष्यातली कोणती गाळलेली जागा एजन्सीकडून भरून घ्यायला आवडेल? इथे आपण अंतर्मुख होतो. गाळलेल्या जागा दिसायला लागतात…

    हेही वाचा – परतवारी… ही देखील ऐश्वर्यवारीच!

    पूर्ण सिनेमा अक्षरशः खिळवून ठेवतो. जग एक रंगमंच आहे, हे विधान पटू लागते. सिनेमातले कलाकार कसा अभिनय करत आहेत (फिलीपचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे) किंवा तांत्रिक बाबी कशा सांभाळल्या आहेत, या गोष्टी मनात येत नाहीत; कारण अतिशय सशक्त कथानक, विषयाची घट्ट मांडणी आणि सिनेमाचा आत्मा असलेला विषय यापुढे बाकी सगळे गौण ठरते.

    (ही फिल्म Jio hotstar वर पाहता येईल.)

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    मला कायम जपणारे स्नेहबंध…

    June 15, 2026 फिल्मी

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026 फिल्मी

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    June 2, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    मला कायम जपणारे स्नेहबंध…

    By हर्षा गुप्तेJune 15, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. शूटिंग दरम्यान मला अजून एक मुलगा…

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    June 2, 2026

    सेटवरची एनर्जी म्हणजे हरहुन्नरी साईराज!

    June 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    June 28, 2026

    कोरोना काळातील ‘बावर्ची’

    June 28, 2026

    सलग 131 डॉट बॉल्स…

    June 28, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 28 जून ते 04 जुलै 2026

    June 28, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : रचूनि महत्तत्त्वाचें खळें, मळी एके काळुगेनि पोळें 

    June 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 28 जून 2026

    June 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 342
    • अवांतर 191
    • आरोग्य 124
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 470
    • फिल्मी 54
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 742
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    June 28, 2026

    कोरोना काळातील ‘बावर्ची’

    June 28, 2026

    सलग 131 डॉट बॉल्स…

    June 28, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.