मेष
- या आठवड्यात मनाप्रमाणे कामे होतील. नोकरदारांनी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. हाताखालच्या लोकांकडून युक्तीने कामे करून घ्या. व्यावसायिक वर्गाला कमी श्रमात जास्त यश आणि पैसा मिळेल. ओळखीतूनही नवीन कामे मिळू शकतात. भरपूर उलाढाल होईल. नवीन ओळखीतून महिलांना फायदा होईल. त्याचबरोबर आरोग्यही सांभाळा. विद्यार्थ्यांना सुट्टीची आनंद घेता येईल. आजोळी जाण्याचा योग आहे.
वृषभ
- या आठवड्यात ग्रहमान सुधारत आहे. त्यामुळे आठवड्याची सुरुवात उत्साहात होईल. नोकरदारांना अनपेक्षित कामे करावी लागतील. बेरोजगारांना काम मिळू शकते. कामानिमित्त प्रवास होईल. व्यावसायिक वर्गाची आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रामुख्याने कामाचे नियोजन करणे योग्य ठरेल. कमी कष्टात कामे पूर्ण करू शकाल. महिलांना प्रिय व्यक्तींचा सहवास मिळेल. त्यांना धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, त्यामुळे आनंदी रहाल.
मिथुन
- या आठवड्यात महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. नोकरदारांना वरिष्ठ महत्त्वाची जबाबदारी सोपवतील आणि ती यशस्वीरीत्या पार पाडाल. हितसंबंध मजबूत करू शकाल. व्यावसायिक वर्गाने व्यवसायात थोडा बदल करून पाहावा, फायदा होईल. जाहिरातीवर भर द्यावा. त्याचप्रमाणे जुनी येणीही वसूल होतील. महिलांची आर्थिक स्थिती समाधानकारक राहील आणि नवीन गुंतवणूक करू शकतील. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम नोकरी मिळू शकते. मित्रांना दिलेले पैसे परत मिळतील.
कर्क
- या आठवड्यात गुरु तुमच्या राशीत येत आहे आणि उच्चीचा होत आहे. नोकरदारांनी स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. कामाचा ताण जाणवेल. बोलताना सांभाळून बोला, अन्यथा अडचणीत येऊ शकता. व्यावसायिक वर्गाने आर्थिक लाभाच्या कामांना प्राधान्य द्यावे. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवा. महिलांना धार्मिक स्थळांना भेट देता येईल. त्यासाठी कुटुंबाबरोबर प्रवास होईल. विद्यार्थ्यांना मनाविरुद्ध कामे करावी लागू शकतात. त्यासाठी स्वतःला अनावश्यक त्रास करून घेऊ नका.
सिंह
- या आठवड्यात परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. नोकरदारांनी पुढे होऊन अतिरिक्त कामे ओढावून घेऊ नयेत. स्वतःची क्षमता ओळखून काम करा. व्यावसायिक वर्गाने वेळेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यतत्पर रहा. महिलांनी लोकांची योग्य पारख करून हुशारीने त्याचा उपयोग करून घ्यावा. विद्यार्थी मित्रांना मदत करू शकतील. पण त्याकरिता मित्रांची योग्य पारख करणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना
कन्या
- या आठवड्यात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नोकरदारांना विविध सवलती आणि भत्ते मिळू शकतात. त्यांचा प्रवासचा योग आहे. व्यावसायिक वर्गाला यश मिळेल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील, त्यामुळे गुंतवणूक करू शकाल. महिलांना कौटुंबिक समाधान मिळेल. तसेच, प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. विद्यार्थ्यांना मित्र-मैत्रिणींबरोबर पिकनिकला जाण्याचा आनंद मिळेल.
तुळ
- या आठवड्यात ग्रहांची अनुकूलता असल्यामुळे यश मिळेल. नोकरदारांनी नवीन जबाबदारी स्वीकारावी. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. हितचिंतकांची मदत मिळेल. व्यावसायिक वर्गाला पूर्वी केलेल्या कामाचे आता यश आणि आर्थिक फळ मिळेल. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. महिलांना माहेरची माणसे भेटतील, धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
- या आठवड्यात ग्रहमानाची उत्तम साथ मिळेल. नोकरदारांना स्वतःची कामे पूर्ण करून सहकाऱ्यांना मदत करता येईल. महत्त्वाच्या कामाबाबत गुप्तता ठेवा. व्यावसायिक वर्गाला अनपेक्षित लाभ होईल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. पैशाची आवक चांगली राहील. महिलांना केलेल्या कष्टाचे फळ मिळेल, मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे.
धनु
- या आठवड्यात कामासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. नोकरदारांना बेफिकीर राहून चालणार नाही. उलट, कार्यक्षमता वाढवून कामे करावी लागतील. व्यावसायिक वर्ग मेहनत आणि चिकाटीने अशक्य गोष्टीही साध्य करू शकेल. कामाचा उरक चांगला राहील. महिलांना कमी कष्टात जास्त यश मिळेल. त्यामुळे उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांनी अति साहस टाळावे. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.
मकर
- या आठवड्यात सकारात्मक विचार ठेवा. नोकरदारांची मनाप्रमाणे कामे होतील. पण त्याचबरोबर, दिलेला शब्द पाळा. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. व्यावसायिक वर्गाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. कामात लवचिकता ठेवावी लागेल. महिलांनी विचार आणि कृतीत एकवाक्यता ठेवावी. विद्यार्थ्यांनी पैशाचा हव्यास करू नये. निर्णय घेताना त्यांनी सावध राहावे.
कुंभ
- नोकरदारांच्या वाट्याला किचकट कामे येतील. पण हातात घेतलेली कामे पूर्ण कराल. वरिष्ठ आणि ज्येष्ठ सहकाऱ्यांचा विश्वास संपादन कराल. व्यावसायिक वर्गाची जुनी येणी वसूल होतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. नातेवाईकांती ये-जा वाढल्याने महिलांचा वेळ कामात जास्त जाईल. विद्यार्थ्यांना हातात घेतलेले प्रोजेक्ट पूर्ण करता येतील.
हेही वाचा – …होई का असे तुलाच स्मरताना?
मीन
- प्रकृतीच्या तक्रारी राहू शकतात. नोकरदारांच्या केलेल्या कामाचे चीज होईल. कामानिमित्त प्रवास होईल. प्रवासात नवीन ओळखी होतील आणि त्याचा फायदाही होईल. व्यावसायिक वर्गाचा कामाचा वेग उत्तम राहील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. महिलांना कामातून आनंद मिळेल. त्याचबरोबर आर्थिक गुंतवणुकीबाबत चोखंदळ राहावे. विद्यार्थ्यांना नवीन कामे मिळतील. मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा योग आहे.


