Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    धोंडा माझा भला…

    June 4, 2026

    शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!

    June 4, 2026

    दिनूचा वाढदिवस अन् सोसायटीतल्यांची बोटचेपी भूमिका

    June 4, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 5
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!
    ललित

    शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!

    Team AvaantarBy Team AvaantarJune 4, 2026Updated:June 4, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, शर्वरी राहुल प्रेम, शर्वरी राहुल विवाहाची 10 वर्षे, शर्वरीचे मातृत्व, राहुलचे पितृत्व, शर्वरीला मातृत्वाची प्रतीक्षा, राहुलला पितृत्वाची प्रतीक्षा, शर्वरीला कन्याप्राप्ती, राहुलला कन्याप्राप्ती, शर्वरी राहुलला कन्याप्राप्ती, शर्वरी बनली आई, राहुल बनला बाबा
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पल्लवी खरोसे आंबेकर

    तो हॉस्पिटलमध्ये ओटी बाहेर अस्वस्थ होऊन  फेऱ्या मारत होता… आतून त्याच्या बायकोच्या वेदनादायी किंचाळण्याचा आवाज  येत होता… आणि तिच्या त्या आवाजाने याचं काळीज दुप्पट वेगाने धावत होत… खूप प्रेम होतं त्याचं… पण तो सध्या हतबल होता… त्याला वाटलं तरी तो तिला मदत करू शकत नव्हता! काहीवेळाने तिचा आवाज थांबला आणि एक नाजूकसा रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला… तो आवाज एकून अधीर झालेला तो ओटीकडे नजर लावून होता…

    तेवढ्यात एक नर्स  लगबगीने बाहेर आली…

    “काँग्रॅच्युलेशन्स सर  तुम्हाला मुलगी झाली…” तिने त्याचं अभिनंदन केलं आणि परत ऑपरेशन थिएटरमध्ये निघून गेली…

    मुलगी झाली हे ऐकून तो खाली बेंचवर बसला… त्याच्या डोळ्यांतून अश्रूंची धार  लागली… हेच ऐकण्यासाठी त्याचे कान किती आतूर झाले होते, हे त्याच त्यालाच ठाऊक… कितीतरी वर्षांनी  हा आनंद त्याच्या आयुष्यात आला होता… खूपच भावूक झाला होता तो…

    काहीवेळाने त्याला आत जायची परवानगी मिळाली… त्याने त्या छोट्याशा  पिल्लाला  हातात घेतलं… किती नाजूक होती ती, जणू  कापसाचा गोळा…. इवले-इवले हात पाय, छोटंस नाक आणि गुलाबी ओठ… त्याने बायकोकडे नजर टाकली सेम तिच्यासारखी तर दिसत होती… अगदी तिचीच कॉपी…

    त्याने त्याच्या पिल्लाला खाली पाळण्यात ठेवलं… आणि बायकोकडे वळला… ती बेडवर शांत झोपली होती. थकली होती खूप… त्याने हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि कपाळावर  हलकेच किस केलं… “तू मला आज जगातला सगळ्यात मोठा आनंद दिलास… लव्ह यु शर्वरी…” म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर किस करून तो तिला व्यवस्थित पांघरूण घालून बाहेर पडला.

    हेही वाचा – About Website : ‘अवांतर’ नावामागची कथा…

    गाडी काढली  अन् तो थेट घरी गेला… त्याने सगळ्या नोकरांना सांगून बंगला नव्या नवरीसारखा  सजवायला सांगितला… त्याला त्याच्या पिलूचं खूप जंगी स्वागत करायचं होतं! सगळ्या दुनियेला त्याला  ओरडून सांगायचं होतं की, तो आज बाप झाला… त्याच्या आयुष्यात एक क्युटशी परी आली… जिनं  आता त्याचं आयुष्यच बदलवून टाकलं!

    तो आज खूप आनंदी होता. आता त्याच्या आयुष्यात शर्वरीशिवाय कोणीतरी आलं होत… त्याची फॅमिली आता कम्प्लिट झाली होती… तो खुशीतच फ्रेश झाला… शर्वरीसाठी  त्याने मेडला सांगून हलकंस, पण पौष्टिक जेवण बनवून घेतलं आणि परत हॉस्पिटलमध्ये निघाला…

    आता शर्वरीला स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलं होतं… तो आत आला तर, शर्वरी उठून बसली होती. त्याने तिच्याकडे एक पाहिलं, तिच्या चेहऱ्यावर  एक वेगळीच चमक आणि आनंद दिसत होता… का नाही दिसणार? तब्ब्ल दहा वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हलला होता!

    काय काय केलं नव्हतं तिनं हे सुख मिळवण्यासाठी… उपास-तापास, बुवा, दवाखाना सर्व काही… आणि त्याचं फळ एवढ्या वर्षांनी मिळालं…

    त्याने जवळ जाऊन तिला मिठी मारली… तिनेही ती मिठी घट्ट केली आणि हळूच कानात म्हणाली “काँग्रॅच्युलेशन्स  राहुल…”

    “तुलाही…” म्हणत त्याने तिला दूर केल आणि तिचं जेवण एका प्लेटमध्ये वाढून तिच्या समोर ठेवलं… तिलाही खूप भूक लागली होती… तिने जेवण उरकून घेतलं… तेवढ्यात पिलूने पाळण्यात चुळबूळ सुरू केली… राहुलने पटकन तिला उचलून घेतलं आणि शर्वरीजवळ आणून दिलं… तिने तिला पाजलं तसं ती परत शांत झोपून गेली…

    दोन दिवसांनी त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली…

    शर्वरी आणि बाळाला घेऊन राहुल घरी आला… शर्वरीची नजर बाहेर गेली तर त्यांचा बंगला रोषणाईने पूर्ण उजळून निघाला होता… ती गाडीतून हळूच खाली उतरली….गेटपासून फुलांच्या पाकळ्या आंथरल्या होत्या… तिला ते पाहून खूप आनंद झाला. तिने समाधानाने त्याच्याकडे पहिले… तर तो  पिलूला हळूवारपणे  हातात पकडून काळजीपूर्वक चालत होता… त्यांना दरवाज्यातच थांबवून रमा काकूने त्यांना ओवाळून आत यायला  सांगितलं… (रमा काकू त्यांची मेड कम काकू होती.)

    हेही वाचा – बोल माधवी… मनात चाललेले महाभारत!

    एकेदिवशी शुभमुहूर्त बघून तिचं नामकरण करण्यात आलं… त्याने त्या दिवशी खूप मोठी पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला सगळ्या नामवंत लोकांनी हजेरी लावली होती… सगळे त्यांचं कौतुक करत होते…

    असेच  दिवसावर दिवस जात होते… तो तर ऑफिस  आणि आपल्या मुलीमध्येच बिझी असायचा… खूप जीव होता त्याचा मुलीवर… ती जे मागेल ते तो तिला पुरवत असे… पण शर्वरीला हे पटायचं नाही…. तिने त्याला कधी विरोध करायचा प्रयत्न केला तर, तो तिलाच ओरडायचा… पण तिला नेमकं काय म्हणायचं आहे, ते तो कधीच समजून घ्यायचा नाही… तो तर फक्त तिचे लाड आणि हट्ट पुरवत असायचा… यामुळेच शर्वरी आणि  राहुलमध्ये आता बरेच खटके उडायला लागले… तरीही शर्वरी त्याला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायची; पण नाही…

    आजकाल ती खूपच हट्टी होत चालली होती… आणि तिचा हाच हट्टीपणा एकेदिवशी या  दोघांची  वाट लावणार होता…

    क्रमशः

    नोट : ही कथा लेखकाची स्वरचित असून पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी काहीही संबंध  नाही. जर काही  संबंध आढळून आलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    धोंडा माझा भला…

    June 4, 2026 ललित

    दिनूचा वाढदिवस अन् सोसायटीतल्यांची बोटचेपी भूमिका

    June 4, 2026 ललित

    स्मृतीगंध… गाण्यांची वही

    June 4, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    धोंडा माझा भला…

    By Team AvaantarJune 4, 2026

    पराग दामले मागच्या वर्षी पंचांग आणलं त्याच वेळेला माझ्या अंगावर काटा आला होता… पुढच्या वर्षी…

    दिनूचा वाढदिवस अन् सोसायटीतल्यांची बोटचेपी भूमिका

    June 4, 2026

    स्मृतीगंध… गाण्यांची वही

    June 4, 2026

    मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    June 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    धोंडा माझा भला…

    June 4, 2026

    शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!

    June 4, 2026

    दिनूचा वाढदिवस अन् सोसायटीतल्यांची बोटचेपी भूमिका

    June 4, 2026

    स्मृतीगंध… गाण्यांची वही

    June 4, 2026

    Dnyaneshwari : अगा आंधळिया अर्जुना, हाता आलिया मेरूही होय साना

    June 4, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 जून 2026

    June 4, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 318
    • अवांतर 189
    • आरोग्य 116
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 442
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 218
    • मैत्रीण 20
    • ललित 677
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    धोंडा माझा भला…

    June 4, 2026

    शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!

    June 4, 2026

    दिनूचा वाढदिवस अन् सोसायटीतल्यांची बोटचेपी भूमिका

    June 4, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.