Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?
    फूड काॅर्नर

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    Team AvaantarBy Team AvaantarMay 29, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, टेस्टी गोळे सांबार, स्वादिष्ट गोळे आमटी, मसुराचे सांबार, गोळ्यांचेल सांबार, गोळ्यांची आमटी, चण्याच्या डाळीची आमटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    गोळ्यांचे सांबार

    साहित्य

    • मसुराची डाळ – दोन वाट्या
    • जिरे – दोन चमचे
    • धणे – तीन चमचे
    • ओल्या मिरच्या – चार-पाच
    • तिखट – एक चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • किसलेले सुके खोबरे – पाव वाटी
    • आमसुले – दोन
    • गूळ – चवीपुरता (अंदाजे सुपारीएवढा)
    • कोथिंबीर – बारीक चिरलेली अर्धी वाटी
    • फोडणीचे साहित्य
    • तेल – तळणाकरिता

    कृती

    1. मसुराची डाळ दोन तास भिजत घालावी आणि नंतर ती वाटावी.
    2. थोडे धणे, थोडे जिरे, मीठ आणि मिरच्या वाटून तो वाटलेला गोळा, वाटलेल्या डाळीच्या गोळ्यात घालावा आणि चांगले कालवून घ्यावे.
    3. या पिठाचे सुपारीएवढे गोळे करून, तेलात तळून काढावेत.
    4. मग पाणी फोडणीस टाकून त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, गूळ आणि आमसुले घालावीत.
    5. राहिलेले धने आणि खोबरे वाटून त्या पाण्यात घालावे.
    6. पाण्याला उकळी आल्यावर तयार करून घेतलेले गोळे त्यात सोडून आणखी उकळी आणावी.
    7. उकळल्यानंतर, फार पातळ वाटल्यास, एक-दोन चमचे डाळीचे पीठ घालावे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

    हेही वाचा – Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    टीप

    • आवडत असल्यास या सांबारात कांदा बारीक चिरून आणि लसूण तेलावर तांबूस परतून घालावा.

     

    गोळ्यांची आमटी

    साहित्य

    • चण्याचे पीठ – एक वाटी
    • चण्याची डाळ – दोन चमचे
    • सुक्या लाल मिरच्या – दोन ते तीन
    • लसणाच्या पाकळ्या – पाच ते सहा
    • गोडा मसाला – दोन चमचे
    • सुक्या खोबऱ्याचा किस – अर्धी वाटी
    • कांदे – दोन मोठे
    • आले – एक इंच तुकडा
    • मीठ – चवीनुसार
    • हळद – दोन चमचे
    • गोडा मसाला – एक चमचा
    • फोडणीचे साहित्य
    • धणे पूड – दोन चमचे
    • जिरे पूड – एक चमचा
    • दाण्याचे कूट – अर्धी वाटी (जाडसर)
    • कोथिंबीर – अर्धी वाटी (बारीक चिरलेली)

    कृती

    1. चण्याच्या पिठात थोडे तिखट, मीठ, दाण्याचे कूट, धणे-जिरे पूड आणि पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे आणि त्याच्या शेंगाच्या दाण्याएवढ्या गोळ्या कराव्या.
    2. तव्यावर तेल घालून त्यात एक बारीक चिरलेला कांदा, चण्याची डाळ आणि खोबऱ्याचा किस हे जिन्नस तांबूस परतून घ्यावेत.
    3. नंतर हे परतलेले जिन्नस, गोडा मसाला, मिरच्या, लसणाच्या पाकळ्या तसेच आले आणि चवीप्रमाणे मीठ एकत्र करून, अगदी बारीक वाटून गोळा तयार करावा.
    4. नंतर एका पातेल्यात फोडणी करून त्यात एक भाजलेल्या कांद्याच्या फोडी करून घालावा.
    5. आपल्याला सांबार दाट अगर पातळ पाहिजे असेल, त्या प्रमाणात पाणी घालावे.
    6. उकळी आल्यावर त्यात तयार केलेल्या गोळ्या सोडाव्यात.
    7. पुन्हा चांगली उकळी आल्यावर वाटून घेतलेल्या मसाल्याचा गोळा घालून पुन्हा उकळी आणावी.
    8. आमटी शिजल्यानंतर खाली उतरवून कोथिंबीर घालावी.
    9. हे सांबार शक्यतो गरमगरम वाढण्यास घ्यावे.

    हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो

    टीप

    • हवे असल्यास या सांबारात चवीकरिता आमसूल आणि थोडा गूळही घालावयास हरकत नाही.

    (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    By Team AvaantarMay 28, 2026

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही…

    Kitchen Tips : केसरी भात, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ बनविताना…

    May 27, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    साजूक तुपाची धार आणि इतिहासाची फोडणी… आजचा बेत दाल-बाटीचा!

    May 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026

    Dnyaneshwari : हे विश्वरूपाचे सोहळे भोगूनि निवाले जी डोळे

    May 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026

    शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    May 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 312
    • अवांतर 187
    • आरोग्य 114
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 435
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 661
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026
    Most Popular

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.