मेष
- या आठवड्यात आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. राशीस्वामी मंगळ मेष राशीत असला तरी, शनि व्ययस्थानी आहे. त्यामुळे आरोग्यासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना कामाचे नियोजन योग्य प्रकारे करावे लागेल. त्यातच वरिष्ठ तुमच्या कामात ढवळाढवळ करू शकतात. व्यवसायवाढीसाठी नवीन संधी मिळतील. त्यादृष्टीने व्यावसायिक वर्गाकडून नवी गुंतवणूक तसेच नवे करार होऊ शकतात. महिलांच्या दृष्टीने घरात चांगले वातावरण राहील. नोकरी करणाऱ्या महिलांना नवीन जबाबदारी मिळेल. विद्यार्थ्यांनी तडजोड करण्याची तयारी ठेवावी, फायदा नक्की मिळेल.
वृषभ
- या आठवड्यात जुने आजार पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी हा आठवडा खूप धावपळीचा जाईल. शिवाय, जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाने कोणतेही नवे करार करू नयेत. नवीन गुंतवणूक टाळणे इष्ट. रोजचे व्यवहार आहेत तसेच सुरू ठेवा. नोकरी आणि घराकडे लक्ष देताना महिलांची खूप धावपळ होईल. अशा स्थितीत त्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण घेणे हिताचे ठरेल.
मिथुन
- या आठवड्यात गुरु आणि शुक्र तुमच्या राशीत असल्यामुळे परिस्थिती आटोक्यात राहील. महत्त्वाची कागदपत्रे तसेच दागिने सांभाळा. नोकरदारांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठ महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. व्यावसायिक वर्गासाठी तेजीचे वातावरण राहील. तथापि, हितशत्रू त्रास देऊ शकतात, त्यामुळे व्यावसायिक गुपिते कोणालाही सांगू नका. कुटुंबासह महिलांना पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येईल. नोकरी करणाऱ्या महिलांना नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल. परदेशी जाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ आहे.
कर्क
- या आठवड्यात जवळच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. रवी आणि बुध लाभस्थानी असल्यामुळे नोकरदारांसाठी उत्तम काळ आहे. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल. व्यवसाय वाढवण्यासाठी व्यावसायिकांना नवीन उपक्रम राबवावे लागतील आणि नवीन गुंतवणूक करावी लागेल. महिलांना कुटुंबासाठी नवीन वस्तू खरेदी करता येतील. मात्र, त्यांनी जपून बोलावे, दुसऱ्यांना दुखवू नये. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. ते नवीन कोर्स पूर्ण करू शकतील.
सिंह
- या आठवड्यात रवी आणि बुध दशमस्थानी आहेत. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले वाटणार नाही. कामाचा कंटाळा येईल. अशा वेळी नवीन जबाबदारी न स्वीकारणे, हे इष्ट ठरेल. व्यावसायिक वर्गाने कायद्याचे काटेकोर पालन करावे. मोठे करार करताना सावध रहा. योग्य सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुद्दे वाचून समजून, मगच सही करा. महिलांची मानसिक आणि शारीरिक ओढाताण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी पथ्यं पाळा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे; पार्ट-टाइम नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – रेवतीने सांगितला उपाय… जुईलीच्या चेहऱ्यावर फुलले हसू
कन्या
- हा आठवडा अतिशय व्यग्र रहाल. परिणामी, मानसिक ताण जाणवेल. नोकरदारांची आर्थिक प्रगती होईल. कार्यकुशलतेने योजना मार्गी लावाल. तथापि, कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. व्यावसायिक वर्गाला नवीन योजना अमलात आणता येतील. उत्पादनांची जाहिरात करून लाभ मिळवू शकाल. अशातच जुनी येणी वसूल होतील. महिलांच्या बाबतीत वाहन खरेदीचा योग आहे. कामाच्या ठिकाणी त्यांना चांगल्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांमधील कलाकार मंडळींना कला सादर करण्याची संधी मिळेल आणि अर्थार्जन करू शकाल.
तुळ
- या आठवड्यात मित्र तसेच नातेवाईक मंडळींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना आपली कार्यक्षमता सिद्ध करता येईल. तुम्ही टार्गेट पूर्ण करू शकाल. नवीन जबाबदारी आणि बदलीची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने पुढील नियोजन करणे तसेच नवीन कच्चा माल खरेदी करण्यास हा काळ उपयुक्त ठरेल. जुनी येणीही वसूल होतील. महिलांना नोकरी सांभाळून कुटुंबाला भरपूर वेळ देता येईल. तर दुसरीकडे, एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून त्रास दिला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना नवीन उपक्रम हाती घेता येतील. छंद जोपासा आणि व्यायाम करा.
वृश्चिक
- हा आठवडा म्हणजे राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी विशेष लाभदायक काळ आहे. नोकरदारांच्या कामात अचानक बदल घडतील. त्यांना चांगले यश मिळेल. वरिष्ठ खूश राहतील. सामाजिक क्षेत्राशी निगडीत व्यवसाय केल्यास व्यावसायिक वर्गाला लाभ होईल. गुंतवणूक सावधपणे करावी, जाणकारांचा सल्ला घेणे उत्तम. महिलांना कुटुंबात आणि कार्यक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवता येईल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात अडथळे निर्माण होऊ शकतात, काळजी घ्या.
धनु
- या आठवड्यात कुटुंबात आनंदी वातावरण राहील. राशीस्वामी, शुक्राबरोबर सप्तमस्थानी असल्यामुळे जोडीदाराला लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल. पण त्याचबरोबर त्यांनी सर्वांना सांभाळून घ्यावे. टोचून बोलू नका. व्यावसायिक वर्गाला भागीदारी व्यवसायात चांगले यश मिळेल. स्पर्धक शांत राहतील. नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. महिलांना जबाबदाऱ्या पूर्ण करून वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कुटुंबात महत्त्व वाढेल. महिलांना नवीन गुंतवणूक करता येईल. विद्यार्थ्यांच्या मनासारख्या गोष्टी घडतील, शिकत असतानाच नोकरी करण्याची संधी मिळेल.
मकर
- या आठवड्यात पुढील आठवड्यासाठी सहलीचे बेत आखाल. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना मेहनतीशिवाय पर्याय नाही. सरकारी नोकरीत वरिष्ठ एकच काम अनेकदा नवनवीन पद्धतीने करायला लावू शकतात. अशावेळी संयम ठेवावा लागेल. व्यावसायिक वर्गाने आरोग्य सांभाळावे. त्याचबरोबर कामात दक्षता ठेवावी लागेल. स्पर्धकांच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. महिलांना सर्वांना सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. ऑफिस आणि कुटुंब यामध्ये प्राधान्य कोणाला द्यायचे याचा निर्णय घेताना अडचण येईल. यश मिळण्यास विलंब होत असला तरी विद्यार्थ्यांनी प्रयत्न सोडू नये, सकारात्मक विचार ठेवा.
हेही वाचा – संवादातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
कुंभ
- या आठवड्यात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. खाण्याचे पथ्य सांभाळा. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. गुंतवणूक करू शकाल. तसेच, कामानिमित्त प्रवास घडेल. व्यवसाय वृद्धीसाठी व्यावसायिक वर्गाला मोठी गुंतवणूक करता येईल. त्याचबरोबर कामे वेळच्या वेळी पूर्ण करा. भागीदारांकडे लक्ष ठेवा. कला आणि साहित्य क्षेत्रातील महिलांना स्वतःची ओळख निर्माण करता येईल. विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण घेता येईल, नवीन नोकरीच्या संधी मिळतील.
मीन
- या आठवड्यात तुमच्या मनातील योजना पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. नोकरदारांना कामात तडजोड करावी लागेल. गंभीर स्वरूपाच्या चुका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहून काम करणे योग्य. व्यावसायिक वर्गाने मोठी गुंतवणूक करण्याची घाई करू नये. ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्याचा आधी अभ्यास करणे गरजेचे आहे. महिलांच्या कामाचा प्रभाव पडेल. त्यांना संततीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांना अभ्यासात विशेष मेहनत घ्यावी लागेल.


