सुरळीच्या वड्यांची रेसिपी
साहित्य
- चण्याचे पीठ – एक वाटी
- मैदा – एक चमचा
- आंबट ताक – पाऊण वाटी
- पाणी – दोन वाट्या
- ओले खोवलेले खोबरे – एक वाटी
- तिखट – चवीनुसार
- मीठ – चवीनुसार
- हळद – एक चमचा
- चिरलेली कोथिंबीर – एक वाटी
- हिरवी मिरची – 2
- फोडणीचे साहित्य
कृती
- ताक आणि पाणी मिसळून, त्यात चण्याचे पीठ कालवावे आणि एक चमचा मैदा त्यात घालावा.
- पिठात चवीप्रमाणे तिखट, मीठ तसेच हळद घालावी आणि पीठ शिजावयास ठेवावे.
- शिजवताना सारखे ढवळत राहावे. ढवळताना थांबू नये, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
- पीठ चांगले शिजले, म्हणजे झाकण ठेवून मंदाग्नीवर दोन वाफा येऊ घ्याव्यात.
- यादरम्यान फोडणी करून घ्यावी. फोडणीत हळद घालू नये.
- नंतर ताटे घेऊन, ती कोरडी करून घ्यावी.
- एका ताटास दोन-तीन चमचे या प्रमाणात वरील शिजविलेले पीठ घेऊन, ते गरम असतानाच ताटावर अगदी पातळ पसरावे. हाताला अगर ताटाला तेल लावू नये.
- वरील प्रमाणात तयार केलेले पीठ ताटाच्या दोन्ही बाजूंस असे अंदाजे पाच ताटांना पीठ लावून होईल.
- खोबऱ्याला थोडी मिरची आणि मीठ वाटून लावावे. ते खोबरे आणि कोथिंबीर पसरलेल्या पिठावर घालावी आणि फोडणी घालावी.
- नंतर ताटावर सुरीने उभे कापून पाच पट्ट्या पाडाव्या.
- प्रत्येक पट्टीची एक गोल वळकटी करावी.
- अशा रीतीने झाल्या सुळीच्या वड्या
हेही वाचा – Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…
टीप्स
- पीठ ताटावर पसरत असताना ते गरम राहण्यासाठी भांडे शेगडीवरच ठेवावे. खाली उतरवून ठेवू नये. कारण गार झाल्यावर पीठ पसरता येत नाही.
- ताटाऐवजी प्लास्टिकच्या कागदावर (जरा जाड कागद) पीठ पसरले, तरी चालेल.
गव्हाचे वड्याची रेसिपी
साहित्य
- गहू – दोन वाट्या
- चण्याची डाळ – अर्धी वाटी
- तिखट – चवीनुसार
- मीठ – चवीनुसार
- तीळ – दोन चमचे
- हिंग – पाव चमचा
- हळद – पाव चमचा
- ओल्या मिरच्या – 2-3
- धण्याची पूड – एक चमचा
- जिऱ्याची पूड – अर्धा चमचा
- तेल – तळणासाठी
हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी…
कृती
- गहू आणि डाळ वाळूमध्ये चांगली खमंग भाजावी आणि किंचित जाडसर दळावी.
- या पिठात ओल्या मिरच्यांचे बारीक तुकडे, तिखट, मीठ, धण्या-जिऱ्याची पूड, तीळ, हिंग, हळद आणि दोन-तीन चमचे तेल घालावे.
- पीठ चांगले मळून, ते थापून वडे करावेत आणि तेलात तळावेत.
- आवडत असल्यास पीठ भिजवताना थोडीशी साखर घालावी.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


