Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मे 2026

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, May 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : मटकीचे सूप, व्हेज पुलाव, कडधान्याची उसळ बनविताना…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : मटकीचे सूप, व्हेज पुलाव, कडधान्याची उसळ बनविताना…

    Team AvaantarBy Team AvaantarMay 18, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, मटकीचे सूप, व्हेज पुलाव, कडधान्याची उसळ, सांबार भात, मोड आलेली मटकी, लिंबाचा ताजा रस
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. मटकीचे सूप, व्हेज पुलाव, कडधान्याची उसळ, सांबार भात बनविताना या टिप्स वापरून पाहा.

    • उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबे खूप महाग मिळतात, तरीही आमटी-भातावर तूप, मीठ, लिंबाचा ताजा रसाळ रस स्वादाकरिता लागतोच. तेव्हा हा प्रयोग करून बघा. घरात लिंबू जर नसेल, तर आमटी उकळतानाच लेमन इसेन्सचे चार ते पाच थेंब आमटीत टाका आणि अनुभवा लिंबाचा नैसर्गिक ताजा स्वाद.
    • सकाळची किंवा रात्रीची आमटी किंवा सांबार उरले असेल तर त्यातच भात शिजत टाकावा. या भाताला वेगळ्या प्रकारची चव येते. आमटी आणि सांबार वाया जात नाही. हा भात वेगळ्या चवीमुळे सगळ्यांना आवडतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    • मटकी किंवा चवळीची उसळ शिल्लक राहिल्यास फ्रीजमध्ये झाकण लावून ठेवावी. दुसऱ्या दिवशी त्यात थोडे टोमॅटो चिरून घाला. थोडा नारळ खवून किंवा कोरडे खोबरे किसून घाला. मिक्सरमध्ये चांगले घुसळा. थोडे पाणी घालून परत घुसळून गाळा. सुंदर चविष्ट सूप होते. पौष्टिक असते. उसळही वाया जात नाही, पटकन तयार होते.
    • कडवे वाल रात्री पाण्यात भिजत घालून ते दुसऱ्या दिवशी (फडक्यात न बांधता) एखाद्या कुंडीत पसरावेत. त्यावर थोडी माती टाकावी म्हणजे लवकर मोड येतील. नंतर बारीक पाने आली की सर्व काढून सोलावेत. (पटकन सोलून होतात.) पान फुटलेल्या बिरड्यांची (वालाची) भाजी करावी. ती जास्त पौष्टिक होते.
    • मोड आलेल्या मटकीस वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो.

    हेही वाचा – Kitchen Tips : बिटाचे कटलेट आणि परोठे, भरली वांगी करताना…

    • केशर महाग असते. व्हेजिटेबल पुलाव करताना, तो शिजताना त्यात गाजर किसून टाकल्यास पुलावास केशरासारखा रंग येतो.
    • कोणतेही कडधान्य शिजवताना थोड्याशा तेलात परतून घेऊन कुकरमध्ये शिजवणे आणि नंतर नेहमीप्रमाणे फोडणी देऊन उसळ किंवा आमटी करणे. यामुळे कडधान्ये लवकर शिजतात आणि चवदार होतात. (कुकरची एक शिटी होऊ देणे)

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर,  avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    May 17, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : पारंपरिक ‘उन्हातले कैरीचे लोणचे’

    May 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : चटपटीत लाल मिरच्यांचे लोणचे, खमंग गाजराचे लोणचे

    May 14, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    मुंबईची भेळपुरी अन् कोलकात्याची झालमुरी!

    By माधवी जोशी माहुलकरMay 17, 2026

    अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकात्यामध्ये एका झालमुरीच्या दुकानाजवळ आपला ताफा थांबवून तेथील स्थानिक दुकानातील भेळीचा…

    Recipe : पारंपरिक ‘उन्हातले कैरीचे लोणचे’

    May 15, 2026

    Recipe : चटपटीत लाल मिरच्यांचे लोणचे, खमंग गाजराचे लोणचे

    May 14, 2026

    Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…

    May 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मे 2026

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026

    दिनचर्या… तिची अन् त्याची!

    May 18, 2026

    Kitchen Tips : मटकीचे सूप, व्हेज पुलाव, कडधान्याची उसळ बनविताना…

    May 18, 2026

    शेअर बाजार अन् सामंत काका

    May 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 302
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 424
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 210
    • मैत्रीण 19
    • ललित 634
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मे 2026

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.