Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शहाण्यांनाही शहाणं करून सोडणारा ‘आनंद’यात्री
    अवांतर

    शहाण्यांनाही शहाणं करून सोडणारा ‘आनंद’यात्री

    हर्षा गुप्तेBy हर्षा गुप्तेMay 15, 2026Updated:May 15, 20261 Comment2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, डॉक्टर आनंद नाडकर्णी निधन, डॉ आनंद नाडकर्णी निधन, आनंद नाडकर्णी श्रद्धांजली, ड्रग्जविरोधी मोहीम, नशामुक्तीचा वसा, असंख्य लोक नशामुक्त, आनंद नाडकर्णीची समाजसेवा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    आजची सकाळ उगवली ती एका वाईट बातमीने, डॉ. आनंद नाडकर्णी गेले. कारण, Pancreas cancer with secondaries in liver… माझ्या डोळ्यांसमोर एक हसरा चेहरा आला आणि मनात दोन ओळी गुणगुणल्या – ‘ये कैसी नशा है भाई, ये जहर नशा है भाई… एन्टरप्राइज कला विभाग सदर करत आहे, लेखक-दिग्दर्शक चेतन दातार… गीत डॉ. आनंद नाडकर्णी… कलाकार…’

    एक प्रसन्न हसरा चेहरा! फार तर दोन वेळा भेटलो असू. फारसं बोलणंही नाही झालं त्यांच्याशी, पण छान बोलायचे, वागायचे तेवढीच आठवण…

    हेही वाचा – नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    तर डॉक्टर साहेबांमुळे आम्ही लायन्स क्लब सोबत जोडले गेलो. मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये ड्रग्स म्हणजे गर्दविरोधी माहितीसाठी मीटिंग्ज व्हायच्या. रटाळ भाषण ऐकण्यापेक्षा नाटकरूपाने बोध केल्यास तो लोकांना आवडतो अन् पटतोही. म्हणून या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे झोपडपट्टीमध्ये, नरिमन पॉइंटला जमेल तिथे आम्ही या नाटकाचे प्रयोग करत होतो. अगदी मराठी साहित्य संमेलनात पण आम्ही याचे प्रयोग केलेत. जाण्या-येण्याचा खर्च म्हणून प्रत्येक प्रयोगाचे मला 10 रुपये मिळायचे. खरंतर, आम्ही समाजसेवा करत होतो. पण आपण समाजसेवा करतोय हे समजत नव्हत!

    आमच्या या प्रयोगांना ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त आणि राजेंद्रकुमार पण यायचे. आमचे हे नाटक बघून कितीतरी व्यसनाधीन गर्दुल्ले नशेतून सुटका हवी, म्हणून पुढे यायचे. नाटकादरम्यान कितीतरी सुधारलेले गर्दुल्ले आपले अनुभव सांगायचे. गर्दच्या अमलाखाली असताना कित्येकांनी शिक्षण सोडलं, नोकरीधंदा सोडला. घरात चोऱ्या, मारामारी, खून, तोडफोड बरंच काही केलं होतं… भिकेला लागले होते. पण सुधारायचा देखील प्रयत्न करत होते. जेवढे सुधारले त्यातले कितीतरी जण पुन्हा ढासळले. पुन्हा व्यसनाच्या मार्गावर गेले अन् आयुष्य गमावून बसले.

    हेही वाचा – जयू आत्या… स्मृतीबंध!

    गर्दुल्ल्यांना सुधारण्यासाठी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी खूप परिश्रम घेतले होते. सर मानसोपचारतज्ज्ञ असल्यामुळे आपल्या पेशंट ना बरं करण्यात बऱ्यापैकी यशस्वी होत असत. त्याच मीटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी कळून आल्या. संजय दत्तची केस तर जगजाहीर आहे. पण नशिबाने तो सुधारला. ड्रग्जमधून बाहेर पडला. बऱ्याच अंशी त्याच्या आयुष्यात घडलेल्या इतर गोष्टींमुळे सुद्धा तो सुधारला असावा!

    मला अभिमान आहे की, छोटंस नाटक सादर करून, डॉक्टर सरांच्या गाण्याद्वारे गर्दविरोधी प्रचार करून समाजाचे प्रबोधन आणि व्यसनमुक्त करायचा प्रयत्न करत होतो. थोडेफार यशस्वी होत होतो. या गोष्टीला आता जवळपास 40 वर्षे झाली. त्यावेळी असंख्य लोक व्यसनाच्या पाशातून मुक्त होऊन चांगल्या मार्गावर आले. त्यासाठी चेतन दातार आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे शतशः आभार.

    ज्या समाजात आपण जन्माला येतो, त्याच आपण काही ना काही देणं लागतो. ते देणं जमेल तसं फेडावे, हे या मोठ्या लोकांकडून नक्कीच शिकावं!

    Avatar photo
    हर्षा गुप्ते

    मालिका, सिने, नाट्य अभिनेत्री

    Related Posts

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    September 11, 2026 अवांतर

    चहाचा कप अन् आठवणी!

    September 9, 2026 अवांतर

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026 अवांतर

    1 Comment

    1. समता फडतरे सकपाळ on May 20, 2026 11:02 am

      खूप छान

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    By प्रणाली मंगेश महाशब्देSeptember 11, 2026

    आई मुलांसाठी फक्त त्याग करत नाही; ती मुलांच्या स्वप्नांना स्वतःच्या स्वप्नांपेक्षा मोठं मानते. पिठोरी अमावस्येला…

    चहाचा कप अन् आठवणी!

    September 9, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026

    बदला

    September 15, 2026

    वधू-वर सूचक मंडळ

    September 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 436
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 584
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 922
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.