Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गोट्या… अप्पांची सावली!
    ललित

    गोट्या… अप्पांची सावली!

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यMay 13, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, गोट्या कुत्र्याची कहाणी, गोट्याची स्वामीनिष्ठा, गोट्या आणि अप्पा नातं, गोट्याचे अप्पांना जीव लावणे, आत्मरामची गोट्यासाठी तगमग, गोट्यासाठी आत्मरामची शोधाशोध, अन्नपाणी सोडणारा गोट्या,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आत्मारामच्या बुढ्याले वावरातून येताना रस्त्याच्या कडेला एक कुत्र्याचे पिल्लू पडलेले दिसले. जोरजोरात श्वास घेत… अर्धवट बेशुद्ध… बुढ्याले दया आली. त्याने पिल्लाला थोडे पाणी पाजून पाहिले… आजूबाजूला कोणी आहे का ते पाहिले… पिल्लाच्या आईचा तपास केला, पण कोणी दिसले नाही. पिल्लाला असेच सोडून दिले तर, ते वाचणे कठीण याची कल्पना आल्याने बुढ्याने त्याला उचलून सरळ घरी आणले. घरी आणल्यावर त्याला ओल्या फडक्याने पुसून बुढ्याने थोडे दूध पाजले आणि त्याला कपड्यात गुंडाळून ठेवले.

    आत्माराम संध्याकाळी खताच्या थैल्ल्या घेऊन घरी आला आणि कुत्र्याच्या पिल्लाला पाहून संतापलाच, “अप्पा, काहून हे रिकामे काम घेऊन आला. कुत्रागित्रा कुठे पाळता पुन्हा? डोक्याले काय कमी ताप आहे का? सोताईच्या तब्येतीकडे लक्ष द्या आता.”

    आत्मारामच्या बुढ्याने पोराच्या बडबडीकडे लक्षच दिले नाही. तोंडातल्या तोंडात फक्त “मुका जीव” एवढेच उच्चारले.

    बुढ्याच्या सेवेला फळ आले आणि दोन-चार दिवसांत पिल्लू चांगलं झालं. त्यानंतर वर्षभरातच पिल्लू चांगल्यापैकी मोठं झालं. आत्माराम सोडून सगळ्यांनाच त्याने लळा लावला. बुढ्याचे आणि पिल्लाचे तर एक विशेष नातेच तयार झाले. बुढ्याने त्याचे नाव आवडीने गोट्या ठेवले. बुढा वावरात जायला निघाला की, गोट्या त्याच्याधीच तयार असे. वावर दीड दोन किलोमीटर होते. बुढा पायीच जायचा. त्यांच्याबरोबर गोट्या जायचा. तिथे बुढा फक्त चक्कर मारायचा, पिकावर रोग पडला का? पाणी बरोबर पोहचतय का? हे बघायचा. मग तिथे एका झाडाखाली सावलीत बराच वेळ बसायचा. तिथेच त्यांच्याजवळ गोट्या बसून राहायचा. उन्हे कलू लागली की, बुढा उठायचा. पाइपमधून पाणी येत असेल तर, चूळ भरून मग पाणी प्यायचा. मग तंबाखू मळून दाढेखाली ठेवून… वहाणा घालायचा. “चाल रे गोट्या” म्हटले की गोट्या उड्या मारत त्याच्या मागे निघायचा. रात्रीच्या जेवणात बुढा गरम भाकरीचा मोठा तुकडा तोडून पहिल्यांदा गोट्याला द्यायचा मगच स्वतः खायचा.

    हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?

    आत्मारामला मात्र कुत्रा पाळणे मंजूर नव्हते. आधीचा पाळलेला एक कुत्रा मटणासाठी गावातल्याच अब्दुल खाटीककडे कायमचा निघून गेल्यावर तर, त्याला कुत्र्याची चिडच यायची. पण बुढ्यापुढे तो जास्त बोलत नसे. आत्मारामची नाराजी गोट्याच्याही लक्षात आली असावी म्हणून तो आत्मारामकडे जातच नसे. तो बुढ्याच्या सहवासातच सुखी होता.

    नियतीला मात्र हे पाहवले नाही.

    झाले असे की, दोन-तीन दिवसांपासून बुड्याईले जरा कसर वाटत होती. गावातल्या डॉक्टरने रक्त तपासले तर काय म्हणे प्लेटलेट का काय ते कमी होतं चालल्या होत्या. मग त्याला शहरात धाडले, मोठ्या दवाखान्यात. पण तिथेही काही उपयोग झाला नाही आणि आठवड्याच्या आतच बुढ्याने राम म्हटला. अचानक झाल्याने खूपच धावपळ झाली. बुढ्याला आत्माराम एकच मुलगा. पण चार मुली, परत आत्मारामचे काका चुलते गावातच. घरी खूप गर्दी झाली. बुढ्याचे अंत्यसंस्कार होऊन पुढचे दोन-तीन दिवस खूपच गडबडीत गेले. मग जरासा निवांतपणा झाला. आत्माराम दुपारी घरी जरा लवंडला होता. त्याच्या बहिणी बुढ्याच्या गोष्टी सांगत होत्या. बोलता बोलता बहीण म्हणाली, “आमचा अप्पा लई मायाळू. अगदी कुत्र्यावरबी जीव लावायचा.”

    आत्मारामच्या डोक्याला एकदम झिणझिण्या आल्या. गोट्या कुठंय? अप्पा गेल्यापासून गोट्या दिसलाच नाही. तो ताडकन उठला. त्याने घरात बघितले… आजूबाजूला बघितले…. मागील दारी बघितलं… गोट्या दिसलाच नाही. त्याने चपला घातल्या आणि पारापर्यंत गेला. तिथे बसलेल्या पोरांना विचारले,

    “बे? आमचा गोट्या दिसलं का तुम्हाले?”

    पण सगळीकडून नकार घंटाच आली. फक्त एकाने सांगितलं की, बुढ्याले उचलले तेव्हा गोट्या गल्लीच्या एका कोपऱ्यात बसला होता. उतरलेल्या चेहऱ्याने आत्माराम घरी आला. बुढा जाऊन चार दिवसही झाले नाही, तोपर्यंत बुढ्याचा आवडता कुत्रा असा निघून जावा आणि आपल्या ते लक्षातही येऊ नये, याचे आत्मारामला फार वाईट वाटले. तो हळहळत बसला. अचानक त्याला काय वाटले कोणास ठाऊक, तो तडक उठला, चपला घातल्या आणि मोटरसायकल घेऊन निघाला.

    आत्माराम वावरात पोहचला, गाडी लावली, आत नजर टाकली आणि सुटकेचा निश्वास सोडला. बुढा जिथे झाडाखाली बसायचा अगदी तिथेच गोट्या बसला होता. हा इथे असेल हे आधीच आपल्या लक्षात यायला हवे होते. पण हा आला कसा आणि केव्हा?
    आत्माराम हळूहळू चालत गोट्याकडे आला. गोट्या मान शरीरात खुपसून मलूल होऊन पडला होता. समोर एका जर्मन थाळीत कडक झालेल्या पोळ्या आणि भाकरीचा तुकडा पडला होता. शेतावर कामाला येणाऱ्या माणसाने बहुदा त्याला पोळी टाकली असावी, पण त्याने त्याला तोंड ही लावले नव्हते. एका कटोरीत माती कचरा असलेले पाणी होते, कटोरी पूर्ण भरलेली होती. म्हणजे गोट्या पाणीही प्यायला नव्हता! आत्मारामला भडभडून आले. गोट्याने दोन-तीन दिवसांत काही खाल्ले नसावे… त्यांच्याशेजारीच बसत त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवत तो म्हणाला,

    “बुढाईले देवाने बलिवलं बाबा… आपल्या हातात है का ते? आणि तू इथे असा बगर आन्नपाण्याचा बसशील तर बुढाले आवडीन का ते? चाल बाबा घरी चाल.”

    हेही वाचा – गोष्ट कैकेयी आणि मंथराची… अमोल आणि सुशीलाची सुद्धा!

    बोलता बोलता आत्मारामच्या डोळ्यांतून अश्रू पडू लागले. ते अश्रू गोट्याच्या शरीरावर पडताच त्याने अंग थरथरवले आणि तो कूं कूं आवाज करत उभा राहिला. आत्मारामने त्याला उचलले आणि मोटरसायकलच्या सीटवर बसवले.

    “राधे… राधे…” आत्मारामने हाक मारताच आत्मारामची बायको गडबडीने उठून बाहेर आली. तिला पाहताच आत्माराम म्हणाला,
    “एक-दोन भाकरी टाक.”

    ‘आता यावेळी?’ तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह!

    “अगं.. अप्पाच्या पोराने जेवणगिवाणच केले नाही, अप्पा गेल्यापासून. टाक लगीच भाकरी.” आत्माराम गोट्याकडे बोट दाखवून म्हणाला, तशी “बाई गं” म्हणत राधा स्वयंपाकघरात गेली.

    “आता बुढा नाही म्हून काय झाले? आम्ही हायेत ना? आता तुह्यावर डब्बल जबाबदारी हायेना भाऊ? आता वावर पण पाहायचे आणि घरही. आता नियम तोडायचा नाही. पहिले तुवा गरम भाकरी मग मला…” भरलेल्या आवाजात आत्माराम गोट्याच्या अंगावरून हात फिरवत बोलत होता आणि त्याच्या कुशीत बसलेला गोट्या सगळं समजल्यासारखं गरम भाकरी मुकाट्यानं खात होता.

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026 ललित

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026 ललित

    चमचम

    August 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    By प्रणाली मंगेश महाशब्देAugust 22, 2026

    I Love You! तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर, झालं असं की, काल आम्ही सगळे…

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    ताक…

    August 22, 2026

    विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक समस्या

    August 22, 2026

    I Love You अन् अव्यक्त भावना…

    August 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 546
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 867
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 23 ऑगस्ट 2026

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.