Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…

    May 12, 2026

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, May 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » 10 साल जवान कर दिया…
    मैत्रीण

    10 साल जवान कर दिया…

    हर्षा गुप्तेBy हर्षा गुप्तेMay 11, 2026Updated:May 12, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, जुन्या मैत्रिणींची मैफल, जुन्या मैत्रिणींबरोबर मैफल, जुन्या मैत्रिणींची भेट, मैत्रिणींबरोबर आठवणींना उजाळा, शाळेतल्या मैत्रिणी भेट, शालेय मैत्रिणी गेट-टुगेदर,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    देशमुख लेन मधल्या ऐनापुरे बाईंकडे दोन वर्षं माँटेसरी केली की, पुढे बाहेरच्या शाळेत ॲडमिशन घ्यायची आणि शिक्षणाची सुरुवात करायची, असा तेव्हा पायंडा होता… आजपासून शाळा सुरू होणार होती आणि आमच्या मातोश्री मला शाळेत घालण्यासाठी गिरगावातल्या चिकित्सक शाळेत घेऊन गेल्या. डायरेक्ट शाळेत बसवायच्या तयारीत. पण हाकलून दिलं आम्हाला… असे सांगून की, “आमच्याकडे खूप आधी मुलाखत घेऊन ॲडमिशन देतात. आता जागा भरल्या.” माझ्या आईला याबद्दल काहीच माहिती नव्हती. घर आणि घरातली कामे या पलीकडे तिला जग नव्हतं. तेव्हा टीव्ही, इंटरनेट नव्हते. बरं, पेपर होते, पण आईला वेळ नसायचा आणि वाचनाची विशेष आवडही नव्हती. मग या गोष्टी तिला कशा समजणार?               मग काय अस्मादिकांचा रवानगी झाली गिरगावातल्या सदानंद वाडीत भरणाऱ्या म्युनिसिपालटीच्या शाळेत!

    एकदा तिथे नेऊन बसवलं ते डायरेक्ट इयत्ता चौथीपर्यंत. तिथून मग पाचवीसाठी चंदा रामजी गर्ल्स हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतली. तिथे काही मुलाखत वगैरे भानगड नव्हती. खऱ्या अर्थाने खूप छान शाळा आयुष्यात आली. पहिल्यांदा कळलं की, मधली सुट्टी दोन वेळा होते. पहिल्या छोट्या सुट्टीमध्ये फटाफट डबा खाऊन मोठ्या सुट्टीत खाली जाऊन बॅडमिंटन खेळायचं… खूप खेळायचं… हेच डोक्यात असायचं! घरी जाऊन अभ्यास करायचा आणि पुन्हा वाडीत खेळायला जायचं. आजच्या पिढीला तेच मिळत नाहीये. शाळेचा अभ्यास, ट्युशन, डान्स क्लास, तबला, ड्रॉइंग, स्केटिंग… जिथे जमेल, सुचेल तिथे आई-वडील लेकरांना अडकवून टाकतात. भरपूर खेळणे, धडपडणे पुन्हा उभे राहणे, हे काही या आजच्या पिढीला माहीतच नाही!

    चंदा रामजी म्हणजे स्वर्ग होता. नव्याने उलगडलेलं विश्व! प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक असू शकतात नाही, तर असतातच, हे तिथे कळलं!! बरं शाळा गुजराती आणि मराठी माध्यमची होती. त्यामुळे काही विषय शिकवायला कॉमन गुजराती शिक्षिका होत्या. जसं की, हिंदी, इंग्रजी, गायन, चित्रकला, पीटी… त्यामुळे एक अतिरिक्त भाषा शिकता आली आणि माझ्या ॲक्टिंग करिअरमध्ये त्याचा खूप उपयोग झाला.

    हेही वाचा – मॉन्टेसरीतच माझा स्मार्टनेस दाबला गेला…

    मुलींची शाळा आणि माणसं जोडायची आवड असल्याने खूप खूप मैत्रिणी लाभल्या. खूप वर्षांनी फेसबुकच्या कृपेने शाळेमधल्या कितीतरी मैत्रिणी भेटल्या. मग काय व्हॉट्सॲप ग्रुप बनले मैत्रिणी गप्पा मारायला लागल्या. सुख-दुःख वाटायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा शाळेत जाऊन बसल्यासारखं वाटतं. बऱ्याच जणी जॉब करताहेत. काहींना मुलांच्या लग्नाची विवंचना, तर काही सासू झाल्यात. काही जणी तर आज्जी पण झाल्यात! एक गोष्ट मात्र कॉमन दिसली सगळ्याजणी आई आहेत आणि आपापल्या मुलांची, नातवंडांचे कौतुक करून थकत नाहीत. बऱ्याच जणींना वयपरत्वे आलेले आजार आहेत. बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, कंबरदुखी आणि काही न काही आहेच… काहीजणी मुंबई सोडून पुणे, नाशिक, नगर किंवा सरळ देशाबाहेर गेल्यात. काहीजणी तर भेटण्याआधीच पुढल्या प्रवासाला निघून पण गेल्यात. दुर्दैवाने, आमची भेट नाही झाली. काहींचे जोडीदार पुढल्या प्रवासाला निघून गेलेत.

    हेही वाचा – सदाफुली, माईफुली अन् राजूफुली…

    अचानक ठरलं की, ‘आता फोन गप्पा पुरे, भेटुयात.’ पण शेवटी आम्ही पडलो बायका. अडचणींवर मात करून चौघीजणी तयार झाल्या आणि माझ्या घरी आल्या. खूप धम्माल वाटली. त्यातली एक पाच-सहा वर्षांपूर्वी भेटली होती. बाकीच्या तिघी 43 वर्षानी भेटल्या. भेटीचा आनंद कमाल होता.

    नवऱ्याने आधीच दम भरला होता की, “घरात जेवण बनवू नकोस. सगळ्याजणी बाहेर जा जेवायला. तू म्हणशील, मी जेवण बनवते. मोजके पाच पदार्थ बनवेन आणि सुचेल तसे 17 प्रकार बनवत बसशील… उपयोग काय मैत्रिणींना भेटून.” मग तो स्वतः सोबत आला. छान जेवण मिळेल, एसीमध्ये बसून मस्त गप्पाटप्पा करत enjoy करता येईल, असे हॉटेल त्याने शोधून दिलं. दिवस संपला. पण गप्पा काही संपेनात. पुन्हा लवकर आणि अजून जास्तजणी भेटुयात, असे ठरवून सगळ्यांचा निरोप घेतला.

    पंधरा दिवस होऊन गेलेत, पण मैत्रिणींच्या भेटीने मिळालेली ऊर्जा अजूनही आनंद ताजा करतेय. आपल्या आयुष्यातील महत्त्वाची आठवण म्हणजे 1983चा वर्ल्ड कप! त्यावरच अलीकडे एक सिनेमा आला होता, ’83’. त्यात वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये गेल्यावर मोहिंदर अमरनाथ कपिल देवला सांगतो, वडील लाला अमरनाथ यांनी सांगितलं की, ‘मुझे 10 साल जवान कर दिया, यार…’

    त्या दिवशी आमचंही यापेक्षा वेगळं काय झालं?

    Avatar photo
    हर्षा गुप्ते

    मालिका, सिने, नाट्य अभिनेत्री

    Related Posts

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026 मैत्रीण

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026 मैत्रीण

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    March 11, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    By प्रदीप केळुस्करApril 10, 2026

    आपा मास्तर नेहमीच्या दुकानात उभे होते. दुकानात गर्दी होती. आज संक्रात, हळदीकुंकू प्रत्येकाकडे असतेच. त्यामुळे…

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    March 11, 2026

    मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…

    May 12, 2026

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 मे 2026

    May 12, 2026

    10 साल जवान कर दिया…

    May 11, 2026

    उपम्याला उपमा नाही…

    May 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 295
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 416
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 206
    • मैत्रीण 19
    • ललित 618
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Kitchen Tips : मसालेभात, पुलाव, रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना…

    May 12, 2026

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.