दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 09 मे 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 19 वैशाख शके 1948; तिथि : सप्तमी 14:02; नक्षत्र : श्रवण 23:23;
- योग : शुक्ल 26:34; करण : बालव 26:39;
- सूर्य : मेष; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:07; सूर्यास्त : 19:02;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
कालाष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
भारताचे फ्रँक सिनात्रा तलत महमूद
टीम अवांतर
भारताचे फ्रँक सिनात्रा (अमेरिकन गायक आणि अभिनेते) म्हणून ओळखले जाणारे गझलसम्राट तलत महमूद यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1924 रोजी लखनऊमध्ये झाला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी गायनाला सुरुवात केली. ऑल इंडिया रेडिओच्या लखनऊ स्टेशनवर तलत मीर तकी मीर, दाग देहलवी, जिगर मुरादाबादी यांच्या गजल ते गात असत. त्यांची प्रतिभा पाहून एचएमव्हीने 1944 मध्ये ‘सब दिन एक समान नहीं’ या नावाचा एक अल्बम काढला. 19 वर्षांच्या तलत यांना आपल्या या पहिल्या रेकॉर्डिंगसाठी 6 रुपये मिळाले होते.
तलत यांनी संगीताचे शिक्षण लखनऊच्या भातखंडे संगीत महाविद्यालयात घेतले. तिथे प्रवेश घेण्यासाठी त्यांनी परीक्षा दिली, मात्र लेखी परीक्षेत ते काही खास कामगिरी करू शकले नाही, मात्र स्वर परीक्षा झाली, तेव्हा परीक्षक त्यांचा आलाप ऐकून चकित झाले आणि एकही प्रश्न न विचारता तलत यांना या महाविद्यालयात प्रवेश मिळाला.
हेही वाचा – दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद
यानंतर त्यांनी कलकत्त्यात काही बंगाली चित्रपटासाठी गाणी गायली. तेथेच त्यांना तपन कुमार नावदेखील मिळाले. दिसायला देखणे असल्यामुळे त्यांना तीन बंगाली चित्रपटात कामही मिळाले. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. त्यांना पहिला ब्रेक ‘शिकस्त’मधील गाणे ‘सपनों की सुहानी दुनिया को’मधून मिळाला, तर 1944 मध्ये गायलेल्या ‘तस्वीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी…’ या गाण्यातून प्रसिद्ध मिळाली. पुढे अनिल विश्वास यांनी तलत यांना 1950 मध्ये पार्श्वगायनाची संधी दिली. ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल…’ हे दिलीपकुमार यांच्यावर चित्रित झालेले गाणे लोकप्रिय झाले.
तलत मेहमूद यांना 1956 मध्ये स्टेज शोसाठी दक्षिण आफ्रिकेला बोलावण्यात आले होते. स्टेज शोसाठी एखादा कलाकार भारताबाहेर जाण्याची ती पहिली वेळ होती. त्यांचा हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला की, दक्षिण आफ्रिकेच्या बऱ्याच शहरांमध्ये त्यांचे 22 कार्यक्रम झाले. 1979 मध्ये तलत मेहमूद यांना लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये गाण्याची संधी मिळाली. लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये गाणारे ते दुसरे भारतीय गायक ठरले. 21 मार्च 1974 रोजी लता मंगेशकर यांनी पहिल्यांदा तिथे परफॉर्म केले होते.
1940 ते 1980 या काळात तलत यांनी 12 भाषांमध्ये सुमारे 750 गाणी गायली. चित्रपट आणि गझल संगीताच्या क्षेत्रातील कलात्मक योगदानाबद्दल तलत महमूद यांना 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 9 मे 1998 रोजी त्यांचे निधन झाले. 2016 मध्ये भारतीय टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट जारी केले होते.
आजचे राशीभविष्य
मेष – बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या आत्मविश्वासाचा इतरांवर स्पष्टपणे प्रभाव पडेल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदाराकडून सकारात्मक पाठिंबा मिळू शकेल.
वृषभ – आजचा दिवस संयम आणि समजूतदारपणा दाखवत पुढे जाण्याचा आहे. कामे सोप्या पद्धतीने केल्यास यश मिळू शकते. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे आवश्यक असेल. बऱ्याच काळापासून चालत आलेला एखादा जुना कौटुंबिक वाद मिटू शकतो.
मिथुन – काही सकारात्मक बदलांचा अनुभव येऊ शकतो. मित्र आणि प्रियजनांच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण सुधारेल, जुने तणाव हळूहळू कमी होत जातील. संयम आणि शांत स्वभाव फायदेशीर ठरेल.
कर्क – आजच्या दिवशी घाई टाळणे योग्य ठरेल. कामाच्या ठिकाणी स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी संयम आवश्यक असेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा, विश्रांतीला प्राधान्य द्या.
सिंह – नवीन योजनांची जबाबदारी आणि संधी मिळू शकते. सर्जनशील विचारसरणीमुळे प्रयत्नांमध्ये यश मिळू शकेल. सामाजिक वर्तुळ विस्तारू शकते, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटणे फायदेशीर ठरेल. अगदी लहान संभाषणांमधूनही नवीन मार्ग खुले होऊ शकतात.
कन्या – लहान यश भविष्यात मोठे फायदे मिळवून देऊ शकते. विचारपूर्वक घेतलेले आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांसोबत सलोखा टिकून राहील. योग्य नियोजन करून त्यानुसार कृती लाभदायक ठरेल. नियमित दिनचर्या पाळल्याने मानसिक आणि शारीरिक आराम मिळेल.
तुळ – आज दृष्टिकोन संतुलित आणि समंजस असेल. तुमची मधाळ वाणी आणि शांत स्वभाव यांचा इतरांवर प्रभाव पडेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. नात्यांमधील विश्वास वाढेल.
वृश्चिक – दिवस कठोर परिश्रम आणि एकाग्रतेने भरलेला असेल. तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक फळ मिळू शकते. लहान यशांमुळे आत्मविश्वास वाढेल. सामाजिक जीवनात सक्रिय राहील आणि नवीन लोकांना भेटणे फायदेशीर ठरू शकते. संयमाने पुढे जाणे उत्तम राहील.
हेही वाचा – माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!
धनु – दिवस थोडा व्यग्रतेचा असू शकतो, पण कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा तुम्हाला शक्ती देईल. आखलेल्या योजनांमध्ये अचानक बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. शिस्तीने सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबींमध्ये घाई टाळणे उत्तम.
मकर – कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने अनेक समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. मानसिक शांतीसाठी विश्रांती आणि सकारात्मक विचार आवश्यक आहेत. लहानसहान यशसुद्धा मोठे समाधान देणारे असेल.
कुंभ – अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मेहनतीचे फळ तुमच्या कामात दिसून येईल. संभाषणातून अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. आर्थिक बाबतीत सुधारणेची चिन्हे दिसत आहेत. आत्मविश्वासाने वाटचाल केल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
मीन – स्वतःच्या आरोग्याकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष देण्याला प्राधान्य द्या. कुटुंबात सौहार्दपूर्ण संबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबींवर काळजीपूर्वक विचार करणे योग्य ठरेल. आतापासूनच हळूहळू केलेल्या प्रयत्नांमुळे भविष्यात मोठे यश मिळू शकते.


