Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » तणाव कमी करणारा त्रिवेणी संगम
    ललित

    तणाव कमी करणारा त्रिवेणी संगम

    जितेंद्र अभ्यंकरBy जितेंद्र अभ्यंकरMay 5, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, त्रिवेणी संगमाचे महत्त्व, निसर्गाचा मनावरील प्रभाव, व्यायामाचे महत्त्व, ज्ञानार्जन महत्त्वाचे, ज्ञानाचा दैनंदिन उपयोग, रागावर नियंत्रण, तणावावर नियंत्रण, तणावविरहीत जीवन
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अपटुडेट पोषाख केलेला आणि एका नामवंत बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेला तो उमदा तरुण उत्सुकतेने माझ्याकडे पहात होता. मी त्याची जन्मपत्रिका काळजीपूर्वक तपासत होतो. काही वेळानंतर मी त्याला म्हणालो, ” तुझ्या जन्मलग्नकुंडलीतील कर्मस्थानी असलेली ग्रहस्थिती बघता असं दिसत आहे की, तुला कामाच्या ठिकाणी तीव्र अशा मानसिक चढउतारांना तोंड द्यावं लागत आहे. तसेच, अशुभ स्थितीत असलेल्या राहूची पूर्ण दृष्टी चंद्रावर असल्याने कोणत्याही लहानसहान समस्येवरून तुझी मनःस्थिती बिघडत असण्याची शक्यता आहे.” माझे बोलणे ऐकून तो अस्वस्थ झाला आणि अभावितपणे त्याचा हात वरच्या खिशातील सिगारेटच्या पाकीटाकडे गेला. पण तत्क्षणी मी समोर आहे, हे लक्षात येऊन तो भानावर आला. स्वतः ला सावरुन तो मला म्हणाला, “मला भरपूर पगार आहे. पण त्याच्या दुप्पट कामाचा ताण आहे. सततच्या तणावामुळे मी रिलॅक्स होऊ शकत नाही. त्यामुळे काहीही मनाविरुद्ध झालं की, मला खूप राग येतो. अशा परिस्थितीमुळे गेल्या काही काळात माझे खूप जवळच्या लोकांशी संबंध बिघडले आहे. त्याला माझा चिडचिडा बनलेला स्वभाव कारणीभूत आहे, हे मला कळतंय, पण मानसिक ताण कमी करणं काही केल्या जमत नाहीये.”

    यावर मी थोडा वेळ विचार केला आणि दीर्घ श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली,

    “तणाव कमी करण्यासाठी तुला निसर्ग, नियमित व्यायाम आणि ज्ञान या तीन जीवनसरितांचा त्रिवेणी संगम मनाच्या तीर्थक्षेत्रावर घडवून आणायचा आहे. निसर्ग म्हणजे तुझी गंगा, नियमित व्यायाम म्हणजे तुझी यमुना आणि ज्ञान म्हणजे तुझी अदृश्य सरस्वती नदी असणार आहे. या त्रिवेणी संगमाला संयम, विवेक, सहनशीलता यासारखे अनेक लहान-लहान झरे सुद्धा येऊन मिळणार आहेत. यात तू निरंतर अमृतस्नान करत राहणार आहेस. हे स्नान म्हणजे तुझ्या मनावरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी असलेला रामबाण उपाय आहे.

    हेही वाचा – झाले मोकळे आकाश…

    मनावर प्रचंड ताण आणण्यात निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा फार मोठा वाटा आहे. त्यातही सतत तुझ्या मानगुटीवर बसणारा स्मार्टफोन हा अत्यंत घातक आहे. त्याचा आवश्यक तितकाच वापर करणं योग्य आहे. पण सकाळी उठताक्षणी स्मार्टफोन हाती घ्यायचा मोह तुला होत असेलच. अशावेळी तू निसर्गाच्या गंगेत डुबकी मारायची आणि आजूबाजूच्या झाडांवर बसलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटावर लक्ष केंद्रित करायचे. काही क्षणांतच स्मार्टफोनचा विचार मनातून हद्दपार होईल. त्यानंतर काही वेळाने तुला सिगारेटची आठवण येऊ शकते. त्याक्षणी तू व्यायामाला सुरुवात करायची. व्यायामासोबत प्राणायाम, योगसाधना केलीस तर फारच उत्तम होईल. व्यायामानंतर तुझे शरीर आणि मन एकदम हलकेफुलके होऊन जाईल. अशाच पद्धतीने दिवसभर येणारे वेगवेगळे मानसिक ताण या त्रिवेणी संगमात स्नान करत विशुद्ध ज्ञानाच्या जलाने तुला कमी करता येतील.”

    माझे बोलणे ऐकून तो बराच रिलॅक्स झालेला दिसला. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. मग मी त्याला काही ज्योतिषशास्त्रीय उपायसुद्धा सांगितले. माझ्या सर्व सूचना तंतोतंत पाळण्याची ग्वाही देऊन तो समाधानाने निघून गेला.

    या घटनेला बराच काळ लोटला. रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो…

    एके दिवशी मी सोलापूर शहरातील निसर्गरम्य अशा पंखाबावडी विभागातून जात होतो. विद्याविहार कॉलनीपाशी आल्यावर मी अचानक स्तब्ध झालो. माझ्यापासून काही अंतरावर एक तरुण अत्यंत तल्लीनतेने एक दृश्य पाहात होता. मी हलक्या पावलांनी, त्याची तंद्री भंग होणार नाही, याची काळजी घेत त्याच्या थोडं मागे थांबून ते नजरबंद करणारं दृश्य पाहू लागलो.

    हेही वाचा – ही वाट एकटीची…

    कॉलनीच्या कंपाऊंडला लागूनच असंख्य छोटी छोटी रानफुले फुलली होती. एका लहानशा रोपट्याच्या पानावर एक इवलंसं सरड्याचं पिल्लू बसलं होतं. तितक्यात एक फुलपाखरू गिरकी घेत आलं. पिल्लाने त्याला पकडायचा प्रयत्न केला, पण फुलपाखराने त्याला हुलकावणी दिली. फुलपाखरू फुलांच्या ताटव्यांत बागडत होतं. मृत्यूच्या इतक्या निकट सान्निध्यात ते जीवनाचा आनंद लुटत होतं. ते वर जात होतं, खाली येत होतं… मृत्यूभोवती गिरक्या घेत त्याला जगणं शिकवत होतं. काही वेळाने ते फुलपाखरु दूरवर उडून गेलं आणि तो तरुण जाण्यासाठी वळला… तो तोच होता. आमची नजरानजर होताच तो हर्षभरित होऊन म्हणाला,

    “निसर्गाच्या सहवासात आपली पुन्हा भेट होत आहे, हा किती सुंदर योगायोग आहे. तुमच्या सल्ल्याप्रमाणे मी सध्या रोज त्रिवेणी संगमात अमृतस्नान करत आहे. त्यामुळे माझा जणू काही कायापालटच झाला आहे. मी संपूर्ण तणावमुक्त झालो आहे. सिगारेटची तर आता मला आठवणसुद्धा येत नाही.”

    बोलता बोलता त्याने वरच्या खिशाकडे बोट दाखवले. मला खूप समाधान वाटलं की, आता त्याच्या वरच्या खिशात सिगारेटचं पाकीट कधीच दिसणार नव्हतं. मग त्याच्याशी थोडावेळ बोलून मी आनंदाने तिथून निघालो.

    Avatar photo
    जितेंद्र अभ्यंकर

    नाव - जितेंद्र अभ्यंकर गाव - सोलापूर. व्यवसाय - Astrologer मोबाईल नंबर - 8605396156 व्हाॅटसअप नंबर - 8605396156 शिक्षण - इंजिनियर. वैशिष्ट्ये - संपूर्ण स्वतंत्र विचारसरणी , समस्येकडं बघण्याचा समतोल दृष्टिकोन. छंद - समाजमाध्यमांवर व्यक्त होणे व लेखन करणे.

    Related Posts

    बेटर हाफ

    June 22, 2026 ललित

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026 ललित

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    बेटर हाफ

    By अतुला प्रणव मेहेंदळेJune 22, 2026

    “अगं ऐकलंस का… झाली की नाही तुझी बासुंदी बनवून? आवर पटापट. आत्ता येईल सरू…” गजाननरावांनी…

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 337
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.