मागील लेखात आपण योगनिद्रा अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. आपल्या विविध मनोकायिक व्याधी-विकारांपासून मुक्ती मिळविण्याचे ध्यान हे सर्वोत्कृष्ट प्रभावी साधन आहे. यावरून ध्यान साधनेचे योगाभ्यासातील महत्त्व ध्यानात येते. आता आपण ध्यान म्हणजे काय, हे थोडक्यात जाणून घेऊयात.
ध्यान म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्या गोष्टीकडे मनाची एकाग्रता करण्याची सवय म्हणजे ध्यान होय. ध्यान म्हणजे निर्विचार आणि निर्विकार अवस्था, म्हणजेच विचाररहित आणि विकाररहित राहणे.
ध्यानाच्या विविध पद्धती
ध्यान करण्याच्या विविध पद्धती प्रचलित असून त्यापैकी काही पध्दती वानगीदाखल पुढीलप्रमाणे सांगता येतील.
- ओंकार साधना
- सोsहम् ध्यान
- ज्योती ध्यान
- श्वसनध्यान
हेही वाचा – योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
ध्यान साधनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
ध्यान साधनेतून साधकास शारीरिक तसेच मानसिक पातळीवर निश्चितच लाभ प्राप्त होतात. ध्यान साधनेतून मिळणारे विविध मानसिक आरोग्य लाभ पुढील प्रमाणे आहेत.
- शरीराबरोबर मनाला देखील पूर्ण विश्रांती मिळते.
- मनःशांती लाभते.
- मनाची एकाग्रता वाढते.
- ध्यान व्यसनमुक्तीसाठी उपयुक्त आहे.
- मानसिक ताणतणाव निवळतात.
- मनात सकारात्मक विचार येतात.
- नियमित ध्यान साधनेने मानसिक आणि शारीरिक व्याधी – विकारांपासून मुक्ती मिळून निरामय आरोग्य लाभते.
ध्यान साधनेसंबंधी महत्त्वाचे मुद्दे
- ध्यान करण्यासाठी मनापासून इच्छा, नियमित योगाभ्यास, सात्त्विक आहार आणि पुरेशी शांत झोप या सर्व गोष्टी आवश्यक आहेत.
- ध्यानासाठी शांत जागा असावी.
- ध्यानासाठी सैलसर पोषाख वापरावा.
- ध्यान ही अनुभवण्याची बाब आहे.
हेही वाचा – आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
ध्यानाच्या बाबतीत ध्यान लावावे लागत नाही, ध्यान आपोआप लागते, ही मूलभूत बाब ध्यानात ठेवावी.
ध्यानाची कृती आणि फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.
आपण पुढील लेखात आरोग्यावर सुपरिणाम करणाऱ्या विषयाबाबत जाणून घेणार आहोत.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


