Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…
    ललित

    जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…

    सुधीर करंदीकरBy सुधीर करंदीकरMay 1, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, रोजगाराची समस्या, नोकरी नसल्याने चोरी, चोराला न्यायालयाकडून दंड, जजने दिले 10 डॉलर, चोराला व्यवसायासाठी आर्थिक मदत, परदेशातील न्यायालय, कोर्टाचा न्यायनिवाडा
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    बेरोजगारी, कामधंदा न मिळणे हा प्रकार सगळ्याच देशांमध्ये कमीजास्त प्रमाणात असतोच. परिणामी कमीजास्त प्रमाणात चोऱ्यामाऱ्या होणे, हे पण ओघाने येतेच. परदेशामधली एक घटना आहे… ती याच संदर्भातली आहे. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले आणि कोर्टाने याबाबत दिलेला निर्णय काय होता, हे आपण पाहूया.

    एका माणूस रोजगाराच्या शोधात होता. दोन दिवस त्याला काहीही काम मिळाले नाही, त्यामुळे ते दोन दिवस त्यानी उपाशी राहून कसेबसे काढले. काहीतरी काम मिळेल आणि पोटाला काही खायला मिळेल, या आशेवर तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी पण काम मिळाले नाही आणि दोन दिवस पोटात अन्नाचा कण नाही, शेवटी अनावर होऊन त्याने एका दुकानामधून ब्रेड चोरला आणि भूक थोडी शांत केली. दुकानदाराने त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले…

    हेही वाचा – आनंदी जगायला काय लागतं?

    ‌कोर्टामध्ये केस उभी राहिली. सुनावणीच्या वेळी काही मंडळी तिथे उपस्थित होते. लिपिकाने केसची माहिती कोर्टाला वाचून दाखवली.

    जज् : (आरोपीला) तू ब्रेडची चोरी केली, हे खरे आहे का? आणि केली असेल तर का केली? चोरी करणे हा गुन्हा आहे, हे तुला माहीत आहे ना?

    माणसाने चोरी केल्याचे कबुल केले… चोरी करणे हा गुन्हा आहे, हे माहीत असल्याचे पण कबूल केले आणि चोरी का करावी लागली, ते कारणही त्याने सांगितले.  त्याचे बोलणे ऐकून कोर्टात उपस्थित सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. या वेळेस आरोपीचा हा गुन्हा माफ करावा, अशी विनंती त्याच्या वकिलाने कोर्टाला केली. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जज साहेबांनी निर्णय जाहीर केला.

    जज् : आरोपीने चोरी का केली, याचे कारण जरी पटण्यासारखे असले आणि चोरी तशी किरकोळच असली, तरी चोरी करणे हा कायद्याने गुन्हाच ठरतो आणि चोरी करणाऱ्याला शिक्षा ही असतेच. शिक्षेचे प्रयोजन अशाकरिता असते की, त्याने पुन्हा चोरी करू नये! ही जी चोरी केली आहे, त्याकरिता 10 डॉलर दंड भरणे, ही शिक्षा आरोपीला कोर्ट देत आहे.

    निर्णय ऐकून सगळेच उपस्थित लोक हळहळ व्यक्त करतात.

    जज् : अजून निर्णयाचे काम संपलेले नाही. आरोपी हा दंड भरू शकत नाही, याची कोर्टाला निश्चितच कल्पना आहे. म्हणून, 10 डॉलर ही दंडाची रक्कम मी आरोपीच्या वतीने कोर्टाकडे भरत आहे. असे म्हणून जजने खिशामधून 10 डॉलर नोट काढून बाजूला बसलेल्या लिपिकाकडे दिली.

    सगळ्यांच्या चेहेऱ्यावर समाधान उमटले.

    जज् :  निर्णयाचा पुढचा भाग –  आपल्या देशात पोट भरण्याकरिता माणसाला काम मिळू शकत नाही, याकरिता आपण सगळेच अप्रत्यक्षरीत्या जबाबदार आहोत आणि शिक्षेला पात्र आहोत. म्हणून कोर्ट इथे हजर असलेल्या सगळ्यांना 10 डॉलर दंड करत आहे. सगळ्यांनी दंडाची रक्कम सरकारी लिपिकाकडे जमा करायची आहे आणि मगच बाहेर पडायचे आहे.

    हेही वाचा – फोनवर पुणेरी उत्तरे…

    सगळ्यांनीच आनंदाने 10-10 डॉलर जमा केले. दोन मिनिटांत 200 डॉलर जमा झाले.

    जज् :  हे 200 डॉलर मिस्टर क्ष याला (चोरी करणाऱ्या व्यक्तीला) कोर्ट देत आहे. त्यांनी छोटा-मोठा उद्योग सुरू करावा आणि मेहेनत करून आपली रोजीरोटी कमवावी. इथे कोर्टाचे या केसचे कामकाज संपते आहे.

    मिस्टर क्षने खाली मान वाकवून जज् साहेबांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. सगळेजण जज्ज साहेबांना धन्यवाद देत आणि त्यांचे कौतुक करत बाहेर पडले.

    Avatar photo
    सुधीर करंदीकर

    मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

    Related Posts

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026 ललित

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026 ललित

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    By दीपक तांबोळीJune 17, 2026

    “दादा मी काय म्हणतोय, आम्ही मुलांच्या शाळेजवळ एक फ्लॅट बघितलाय आणि तिथे शिफ्ट व्हायचं म्हणतोय,”…

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026

    संशय

    June 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 331
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 458
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 711
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.