Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?
    ललित

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीApril 30, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, जंगल सफारी, एप्रिल फुलची कथा, चारठाण्याला जंगल सफारी, आदेशची जंगल सफारी, जितूचा चौधरी सरांना फोन, आदेशचा अपघाती मृत्यू, जितूचा अपघाती मृत्यू, समीरकडून चौधरी सरांची मस्करी, खोडसाळ समीर, एप्रिल फूल
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मोबाइलची रिंग वाजली. मी फोन उचलला, “सर, मी आदेश बोलतोय. सर, तुम्ही चारठाण्याला जाणार होतात ना?”

    “हो आदेश. या रविवारी म्हणजे 1 एप्रिलला आपण जातोय. तू येतोयेस का?” मी चारठाण्याला जाणाऱ्यांची लिस्ट डोळ्यासमोर ठेवत त्याला विचारलं.

    “हो सर, माझी खूप दिवसांची इच्छा आहे, जंगलात फिरायची. पण सर हे एप्रिल फूल तर नाही ना?”

    मी जोरात हसलो.

    “नाही, नाही. अरे, आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घेतलीय. गाड्या बुक केल्याहेत. चारठाण्यात जेवणाची ऑर्डर देऊन ठेवलीय. एवढं सगळं एप्रिल फूल कसं असेल?”

    हेही वाचा – पुस्तकांचा ठेवा अन् खरा वारसदार!

    “सॉरी सर, सहजच विचारलं…”

    “इट्स ओके आदेश. काही चेंजेस झाले तर तुला कळवतो.”

    मी फोन ठेवला. लिस्टमध्ये आदेशचं नाव लिहिलं.

    बारावीच्या परीक्षा नुकत्याच आटोपल्या होत्या. कॉलेजच्या मुलांची मागणी होती कुठंतरी घेऊन चला म्हणून… एक दिवसात जंगल सफारी होणारं चारठाणा मी ठरवलं. जंगल सफारीसोबत वनभोजन होणार म्हणून मुलंही खूश होती.

    एका पर्यावरणावरील कार्यक्रमात माझी आणि आदेशची भेट झाली होती. मी निसर्गसहली आयोजित करतो, हे ऐकून तो मला सहलीबाबत सारखी विचारणा करत होता. आज त्याचं समाधान झाल्यासारखं वाटलं.

    31 मार्चला मी सगळ्या पूर्वतयारीचा अंदाज घेत असताना मला तीन जणांचे फोन आले. त्यांनाही सहलीला यायचं होतं. पण गाडीत जागा नव्हती. मी आदेशला फोन लावला.

    “आदेश तू येतो आहेस ना नक्की? कारण बरेच जण इच्छुक आहेत आणि गाडीत जागा नाहीये.”

    “हो सर, मी नक्की येतोय. वाटल्यास सहलीचे पूर्ण पैसे मी घेऊन येतो तुमच्याकडे…”

    “नको, नको… उद्या दिलेस तरी चालतील. ठीक आहे, मी त्यांना नाही सांगतो. सकाळी शार्प सहाला ये स्टॉपवर.”

    “हो सर, येतो,” असं म्हणून त्याने फोन कट केला.

    दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या ठिकाणी साडेपाचलाच बस घेऊन मी उभा राहिलो. बहुतेक सगळी मुलं आली होती. ती सगळी पटापट गाडीत बसली. मी आदेशची वाट पाहू लागलो.

    सहा वाजले, सव्वा सहा झाले… साडेसहा झाले… तरी आदेशचा पत्ता नव्हता. मी अस्वस्थ झालो. शेवटी मी मोबाइल काढला आणि त्याला फोन केला. फोन स्विच ऑफ होता. माझ्या अस्वस्थेतेची जागा आता संतापाने घेतली. पण हा अनुभव मला नेहमीचा होता. कितीही कडक ताकीद द्या, स्वतःच्या फुरसतीने डुलत-डुलत येणारे मी अनेक लोक बघितले होते. अशा लोकांना दुसऱ्याच्या गैरसोयीशी काही देणंघेणं नसतं. मी अजून 15 मिनिटं वाट बघायचं ठरवलं. पंधराची तीस मिनिटं होऊन गेली… ना आदेश आला, ना त्याचा फोन आला. बसमधली मुलं कंटाळून बाहेर आली आणि काय झालं विचारू लागली. त्यांना काय उत्तर द्यावं मला कळेना. मी मोबाइल काढून आदेशला फोन लावला. मोबाइल स्वीच ऑफ! आता मात्र माझी नस तडकली. मी निर्णय घेतला.

    “बसा रे मुलांनो. चला निघूया…”

    मुलं पटापट जाऊन बसली. मीही बसमध्ये चढणार तेवढ्यात मोबाइल वाजला. अनोळखी नंबर दिसत होता.

    “हॅलो, कोण बोलतंय?” मी विचारलं.

    “चौधरी सर बोलताहेत ना?”

    “हो, चौधरीच बोलतोय.”

    “सर, मी आदेशचा भाऊ जितू बोलतोय. सर, आदेश सहलीला नाही येऊ शकणार…”

    “अरे कमाल आहे त्याची! आता सांगतोय हे? मी साडेपाचपासून त्याची वाट पहातोय आणि माहितेय, तो येणार म्हणून तीन जणांना मी नाही सागितलंय. आता हे नुकसान कोण भरणार?”

    मी संतापाने अक्षरशः ओरडलो.

    “सॉरी सर, पण ऐका ना सर… सर… तो येऊ शकणार नाही कारण… कारण त्याचा ॲक्सिडंट झालाय आणि तो ऑन दी स्पॉट गेला सर!”

    “कायSSSS…” मी इतक्या जोरात ओरडलो की, बसमधली मुलं बाहेर आली.

    “कसं… कसं झालं हे?”

    मी आता थरथर कापत होतो. माझ्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं होतं.

    “सर, तो सकाळीच सहलीला जायचं म्हणून घरातून बाइकने बाहेर पडला. हायवेवर आला तर एका भरधाव डंपरने त्याला उडवलं. त्याच्या डोक्यावरून डंपरचं चाक गेलं. तो तिथंच गेला. योगायोगाने एक ॲम्ब्युलन्स तिथून जात होती, त्यांनी त्याला उचलून सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं… आम्हाला त्यानंतरच कळलं… आम्ही आता सिव्हिललाच आहोत.”

    फोनवर आता जोरजोराने रडणं ऐकू येत होतं. माझ्या तर हातापायातले त्राणच गेले. मी मटकन खाली बसलो. एका मुलाने पाण्याची बाटली आणून दिली. मी पाणी प्यायलो. थोडी हुशारी वाटू लागली.

    “सर काय झालं?” त्याने विचारलं, मी थोडक्यात सर्व सागितलं… पोरं हळहळली.

    “सर, मग ट्रिप कॅन्सल करायची का?”

    मी भानावर आलो. ट्रिप कॅन्सल केली तर, माझं नुकसान तर होणार होतंच, पण मुलांचे मूड गेले असते. ते आदेशला ओळखतही नव्हते. खरंतर, माझीही आदेशशी नुकतीच ओळख झाली होती. मी स्वतःला सावरलं. मुलांना बसमध्ये बसायला सांगितलं. मीही जाऊन बसलो. बस चारठाण्याकडे निघाली.

    जंगलात फिरताना माझा मूड वाईटच होता. कशातच मन लागत नव्हतं. फॉरेस्ट गार्डला माहिती सांगायला सांगून मी रेस्ट हाऊसला येऊन बसलो.

    संध्याकाळी आम्ही लवकरच परतीच्या प्रवासाला लागलो. तरीही येतायेता नऊ वाजलेच. जेवण करून मी विचार करत बसलो. उद्या आदेशच्या आईवडिलांना भेटून यावं, असं ठरवलं. मग टीव्ही लावून आदेशची बातमी दिसतेय का, ते बघू लागलो.

    दहा वाजता मोबाइल वाजला. स्क्रीनवर आदेशचं नाव वाचून मी हादरलो. भीतभीतच मी फोन कानाला लावला…

    “सर, मी आदेश बोलतोय. कशी झाली सर ट्रिप?”

    मी इतका जोरात दचकलो की, माझ्या हातातून मोबाइल निसटून खाली पडला. थरथरत्या हाताने उचलून मी तो कानाला लावला.

    “कोण… को…ण बो… ल… तं… य?”

    “सर, मी आदेश बोलतोय. सर, आवाज नाही ओळखला का? आणि माझा नंबर तर सेव्ह असेलच ना?”

    “कोण आदेश? आदेश… अरे, अरे तू जिवंत आहेस? काहीतरी गडबड आहे. अरे. आज सकाळी फोन आला होता की… की तुझा ॲक्सिडंट होऊन तू ऑन दी स्पॉट गेलास!”

    फोनमधून जोरजोरात हसण्याचा आवाज आला. माझ्या अंगावर काटा आला.

    “सर, तुम्ही प्यायला तर नाहीत ना? अहो सर, मी एकदम धडधाकट आहे. मला काही झालेलं नाही आणि तुम्ही प्यायला नसाल तर, नक्कीच कोणीतरी तुम्हाला एप्रिल फुल केलं असावं!”

    बापरे! हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसत होतं.

    “अरे पण, मग तू आला का नाहीस? साधा फोनसुद्धा केला नाहीस तू!”

    “सर, गडबड अशी झाली की, रात्री दहा वाजता मोबाइल खाली पडून फुटला. आईबाबांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे सिम त्यांच्या मोबाईलमध्ये बसेना. सकाळी मी साडेपाचला निघालो. हायवेला लागलो आणि माझ्या गाडीचं चाक पंक्चर झालं. सकाळ आणि त्यात रविवार एकही दुकान उघडं नव्हतं. शेवटी एकाला विनंती करुन पंक्चर जोडलं. पण या सगळ्या भानगडीत पावणेसात वाजले. मी स्पॉटवर पोहोचलो, तेव्हा बस निघून गेली होती. घरी येऊन मोबाइल दुरुस्त करून तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण फोन लागला नाही. कदाचित जंगलात रेंज नसावी…”

    मला एकदम आठवलं .त्याच्या भावानेच तर फोन करून ती बातमी दिली होती. माय गॉड चक्क भावानेच हा खोटारडेपणा करावा?

    “आदेश चक्क तुझ्या भावानेच फोन करून मला ती वाईट बातमी दिली. काय नाव बरं त्याचं… हं जितू! हो जितूच. तो तुझाच भाऊ ना?”

    “काय जितूने तुम्हाला फोन करून सांगितलं? सर, कसं शक्य आहे?”

    “का? का शक्य नाही?”

    “सर…” तो चाचरत बोलत होता, “सर, मी तुम्हाला आता भेटायला येतो.”

    आणि फोन कट झाला.

    15-20 मिनिटांत दाराची बेल वाजली. आदेश आला असावा… मी भीतभीतच दरवाजा उघडला. बाहेर आदेशच उभा होता… अगदी धडधाकट! भुताचे पाय उलटे असतात, असं मी कुठंतरी वाचलं होतं. मी त्याच्या पायांवर नजर टाकली… ते सरळ होते. मला हायसं वाटलं. मी त्याला आत घेतलं. तो सोफ्यावर बसला, पण घाबरलेला दिसत होता.

    हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!

    “हं काय झालं आदेश? तू असा घाबरलेला का दिसतोय?”

    “सर, तुम्ही म्हणता तुम्हाला जितूचा फोन आला होता?”

    “हो नक्की. जितूच नाव सागितलं त्याने! का रे?”

    “सर, शक्यच नाही. जितू… जितू एक वर्षापूर्वीच वारलाय सर…”

    “कायSS….” मी जोरात ओरडलो.

    “हो सर. मागच्या मार्चमध्येच रोड ॲक्सिडंटमध्ये त्याचा मृत्यू झाला.”

    “ओ माय गॉड!”

    आदेशने आपले डोळे पुसले… “सर, कोणीतरी तुम्हाला एप्रिल फुल करण्यासाठी हा फोन केला असावा.”

    “शक्य आहे. पण कोण असेल ही व्यक्ती, जी तुला आणि मलाही ओळखते?”

    “सर आपल्या दोघांना ओळखणारा फक्त समीर आहे, बघा… ज्याने माझी तुमच्याशी ओळख करून दिली होती.”

    “हो आलं लक्षात. पण तो असं करेल, असं वाटत नाही. शिवाय, अनोळखी नंबर होता. समीरचा नंबर तर सेव्ह आहे माझ्या मोबाइलमध्ये.”

    “सर, ओळख पटू नये म्हणून त्याने दुसऱ्या कुणाच्या मोबाइलवरून फोन केला असेल. मला तरी वाटतं, हे त्याचेच उद्योग असावेत. तसा तो जरा खोडकरच आहे…”

    मला ते पटलं. समीरच्या खोड्या मीही पाहिल्या होत्या. अनेकदा तो खोटंनाटं सांगून मित्रांची टर उडवायचा, हे मी प्रत्यक्ष अनुभवलं होतं.

    “ठीक आहे. मी त्याला उद्या फोन करून चांगला खडसावतोच बघ,” मी आदेशला म्हणालो.

    “मी निघतो सर आणि सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला मनःस्ताप सहन करावा लागला.”

    “असू दे आदेश. त्यात तुझाही नाईलाजच होता!”

    आदेश गेला आणि मी झोपायला गेलो.

    दुसऱ्या दिवशी मी सकाळीच समीरला फोन केला.

    “समीर काल तूच फोन केला होता ना, मला आदेशच्या ॲक्सिडंटची बातमी द्यायला? अरे, मी काय तुझ्या बरोबरीचा वाटलो काय, अशी चेष्टा करायला?”

    “नाही सर… मी नव्हता केला फोन. जितूने, आदेशच्या भावाने केला होता फोन! आणि ती चेष्टा नव्हती… ते सगळं खरंच होतं सर.”

    “काय…?” मी ताडकन उडालोच, “समीर, अरे जितू जिवंत आहे?”

    “सर, काय पण तुम्ही! हे घ्या जितूशीच बोला.”

    “सर, मी जितू बोलतोय. काय झालं सर?” होय हा तोच आवाज होता. जो माझ्याशी काल सकाळी बोलला होता. माझ्या अंगावर शहारे आले. भीतीने मी लटपटू लागलो…

    “जितू, अरे काल रात्री आदेश आला होता घरी. मला म्हणत होता जितूचा एक वर्षापूर्वी ॲक्सिडंटमध्ये मृत्यू झालाय.”

    “कायSSS” जितू जोरात ओरडला, “सर, तुम्हाला काय वेड लागलं की काय? अहो, काल रात्री नऊ वाजता मी माझ्या हाताने आदेशला अग्नीडाग दिला आणि तुम्ही म्हणता आदेश तुमच्या घरी आला होता!”

    माझी थरथर अजूनच वाढली. थरथरत्या आवाजात मी त्याला म्हटलं, “मी खोटं बोलत नाहीये जितू! आदेश खरंच आला होता. चक्क अर्धा तास त्याने गप्पा मारल्या माझ्यासोबत”

    “बस करा सर… अशा दुःखाच्या प्रसंगी चेष्टा नका करू,” जितू आता हमसून हमसून रडत होता, “माझ्याकडून आता हे सहन होत नाहीये…” आणि फोन कट झाला.

    फोन ठेवता ठेवता माझं लक्ष बायकोकडे गेलं. ती माझ्याकडे रोखून पहात होती. तिच्या नजरेची मला भीतीच वाटली.

    “काय म्हणालात तुम्ही? आदेश इथे आला होता? किती वाजता आला होता तो?” तिने विचारलं.

    “झाले असतील साडेदहा का?”

    “अहो महाशय साडेदहाला तुम्ही शुद्धीत तरी होता का? साडेनऊला जेवण करून तुम्ही टीव्ही बघायला बसलात आणि बसल्याबसल्या झोपून गेलात. तुम्ही झोपलात म्हणून मी टीव्हीवर एक गाण्याचा कार्यक्रम लावला आणि साडेअकरापर्यंत तो बघत बसले होते. तोपर्यंत आणि पूर्ण रात्रभरात कोणीही आलं नाही, आपल्याकडे. झोपेत तुम्ही सारखं आदेश, जितू, समीर असं बडबडत होतात. साडेअकराला मी तुम्हाला उठवून बेडरुममध्ये नेलं.”

    माझ्या अंगात आता चांगलंच कापरं भरलं. मी डोळे फाडून तिच्याकडे बघू लागलो.

    “अहो, असं काय बघताय? ही बातमी बघा आदेशच्या अपघाताची. वाचा खरं काय घडलं ते!”

    तिने मला दिलेल्या पेपरवर मी नजर टाकली.

    “डंपर-बाईक अपघातात तरुण जागीच ठार”

    खाली आदेशचा फोटो होता. त्यातला आदेश माझ्याकडे बघून हसतोय आणि जणू म्हणतोय “कसं एप्रिल फूल केलं!!” असं मला वाटू लागलं.

    हे सगळे मिळून मला एप्रिल फूल करताहेत की, मीच स्वतःला एप्रिल फूल करतोय, हेच मला समजेनासं झालं आणि सततच्या मानसिक धक्क्यांनी माझी शुद्ध हरपली.

    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026 ललित

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026 ललित

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    By प्रदीप केळुस्करApril 30, 2026

    नरू जोरात सायकल चालवत होता, त्याच्या पाठीमागे शिऱ्या बसला होता. शिऱ्या घड्याळ बघत म्हणाला, “साडेसहा…

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026

    Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज

    April 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 283
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 401
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 201
    • मैत्रीण 18
    • ललित 594
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026
    Most Popular

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.