Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    April 29, 2026

    कालाय तस्मै नमः

    April 29, 2026

    Dnyaneshwari : अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके

    April 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…
    ललित

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यApril 29, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, संकेतच्या भावाचे लग्न, अजय नीलमची प्रेमकहाणी, अजय नीलमचे पहिल्या नजरेतले प्रेम, अजय नीलम आंतरजातीय विवाह, संकेतचे नीलमवर प्रेम, नीलमने अजयला केले प्रपोज,
    काल्पनिक फोटो (सौजन्य - गूगल जेमिनी)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मित्राच्या भावाच्या लग्नाला गेलो होतो. संकेत आणि मी एकाच कॉलेजमध्ये चार वर्षे रूमपार्टनर. त्यामुळे घट्ट संबंध. आता दोघेही नोकरीमुळे वेगवेगळ्या गावी. तरीपण त्याच्या आग्रहामुळे गेलो लग्नाला. लग्न एका छोट्या तालुक्याच्या गावी होतं. गाव छोटं असलं तरी व्यवस्था उत्तम होती. तर, मुख्य मुद्द्यावर येतो. तिथे एक निळा ड्रेस घातलेली चटपटीत मुलगी होती. भराभर काम करत होती. नवरीच्या सोबत राहायची. नवरीची जवळची नातेवाईक असावी. बहुतेक सगळे तरुण तिच्या सौंदर्याने, उत्साहाने, दिलखुलास हास्याने घायाळ झाले. त्यात अर्थात संकेतही होता. लग्न लागल्या लागल्या संकेत मला बाजूला घेऊन म्हणाला,

    “यार, त्या निळ्या ड्रेसवालीचा काही ट्रेस लागतं नाही. नवरीकडची असल्याने एकदम विचारणेही बरोबर नाही. तू तिचे नाव गाव विचारशील? आमच्याच जातीची आहे… पुढे जाता येईल.”

    मी तसा बिनधास्त होतो. त्यातही संकेतची जात आणि माझी जात भिन्न असल्याने तिला विचारायला हरकत नव्हती. थोड्या निरीक्षणाने कळले की, तिच्यासोबत फक्त आई होती. ते तर फारच बरे. एखादा मुच्छड बाप असता तर, हिम्मत झाली नसती. माझा आणखी एक प्लस पॉइंट म्हणजे माझा चेहरा एकदम सभ्य आणि निरागस आहे, त्यामुळे कोणी मला निदान चेहऱ्यावरून तरी वाईट म्हणत नाहीत.

    हेही वाचा – सासू, सून अन् लेक…

    लग्न झाले तसे सगळे जेवणाला गेले. ती निळ्या ड्रेसवाली तिच्या आईसोबत एका कोपऱ्यात बॅगेतून काही काढत होत्या… बहुदा गिफ्ट असावे. त्यांच्यासोबत कोणी नसल्याने मी ही संधी साधायची ठरवली.

    “नमस्कार,” मी तिच्या आईला म्हणालो.

    “नमस्कार…” तिची आई काहीशा आश्चर्याने म्हणाली.

    “काही नाही. तुमच्या मुलीबद्दल माहिती विचारायला आलो. तिच्या लग्नाचे बघत असतील ना या वर्षी.”

    मुलीचे लग्न हा मुलीच्या आईचा वीक पॉइंट असतो.
    “हो, हो, यावर्षी सुरुवात करणारच आहे बघायला. कोणाला हवी माहिती?”

    इथे मी थोडं गडबडलो. संकेतचे नाव कसे सांगणार!

    “ते काका आहेत तिथे, त्यांनी विचारले. काय नाव मुलीचे?”

    “नीलम रामचंद्र XXX”

    “आणि शिक्षण?”

    “ग्रॅज्युएट झाली. आता एमएसडब्ल्यू (Master of Social Work) करतेय. म्हणजे झालेच आहे, पण निकाल बाकी आहे.”

    “आणि गाव कुठले?”

    “पाचोरा. पण आता जळगावला राहतो. नीलमच्या वडिलांची बदली तिथे झाली. मुलीच्या आईची मी मामेबहीण, पण अगदी सख्ख्या बहिणीसारखे संबंध आहेत.”

    इतक्या वेळ शांतपणे आमचे बोलणे ऐकत असलेली नीलमची रोखलेली नजर मला अस्वस्थ करत होती.

    “चालेल काकू, मी निघतो.” मला नीलमच्या नजरेपासून दूर पळायचे होते.
    “थांबा.” पहिल्यांदाच नीलम बोलली.

    “कोणत्या काकाने पाठवले तुम्हाला? ”

    “ते तिथे आहेत ना… मंडपाजवळ.” मी कसेतरी म्हणालो.

    “आणि ते स्वतः का नाही आले तपास करायला?” तिचा आवाज शांत पण ठाम होता.

    “ते तिकडे आहेर द्यायचं घ्यायचे बघत आहेत,” मी तिच्याकडे बघत थातुरमातुर उत्तर दिले. खूप छान होती दिसायला… इतक्या जवळून प्रथमच बघत होतो.

    मी जायला निघणार तेवढ्यात ती म्हणाली,

    “तुमचे नाव काय?”

    “अजय मनोहर XXX”

    “काय करता?

    “मी बी. एड. झालोय. नुकताच शाळेत लागलोय मलकापूरला…”

    “अच्छा… आणि तुम्ही नवरदेवाचे कोण?”

    आता काही लपवणे शक्य नव्हते.

    “मुलाचा लहान भाऊ आहे संकेत. त्याचा मी जवळचा मित्र. तो आणि मी सोबत बी. एड. केले.”

    “त्या निळ्या ड्रेसवालीची माहिती काढ असेच म्हणत होता ना तुमचा मित्र!”

    अरे, हिला कसे कळाले? माझी तर बोलतीच बंद झाली.

    ती हसली अगदी सगळे समजल्यासारखी.

    “तुम्ही आमच्या जातीचे नाहीत म्हणून तुम्हाला माहीत नाही; पण तुमच्या मित्राला सांगा. आपल्या जातीत आडनाव एकच असले तर लग्न होतं नाही.”

    मी मान हलवली आणि निघालो. आता बोलण्यासारखे काही राहिलेच नव्हते.

    “तुम्ही आता मलकापूरला असतात का?”

    “सध्या रजा घेतली आहे, चार-पाच दिवस अंमळनेरला आहे.”

    आता माझ्याशी बोलण्याचे प्रयोजन काय?

    “अंमळनेर ना? Ok.”

    त्यात ok काय? मला तर काहीच समजेना. मी निघालो.

    संकेतला बाकीच्या गोष्टी न सांगता फक्त तिचे नाव आणि माहिती सांगितली. तो लगेचच म्हणाला, “एक आडनाव चालत नाही यार आमच्यात! जाने दो… लक नाही आपल्यासोबत.”

    0000

    महिनाही झाला नसेल. शनिवार होता. सकाळी सकाळी फोन वाजला. अनोळखी नंबर…

    “हॅलो अजय का?” समोरून मुलीचा आवाज.

    “हो. कोण बोलतंय?”

    “मी नीलम.”

    “कोण नीलम?”

    “तीच… निळ्या ड्रेसवाली,” ती हसत म्हणाली.

    “अरे नीलम तू? सॉरी, सॉरी, तुम्ही? काय काम काढले?”

    “चालेल, एकेरी हाक मारली तरी. मीही एकेरीच बोलणार. तू आता अंमळनेरला आहेस का मलकापूरला?”

    “अंमळनेर. आज, उद्या सुट्टी आहे.”

    “मी अंमळनेरला आलीय. मी एमएसडब्ल्यू इथेच केले. रिझल्ट घ्यायला आलीय…”

    “छान,” मला अजून शब्द सुचत नव्हते.

    “मी पास झालीय. म्हणजे ऑनलाइन तर दोन दिवसापूर्वीच कळाले. आज मार्कशीट घ्यायला आलीय.”

    “अभिनंदन!”

    “Thanks! ते जाऊ दे. आपण भेटूया.”

    “चालेल ना. ये घरी.”

    “घरी नको. कुठल्यातरी हॉटेलला भेटू. तुझ्याकडून जेवण, मी पास झाल्याबद्दल.”

    “पास तू झाली आणि जेवण माझ्याकडून?”

    “हो. तुझ्याकडूनच, काही स्त्री-दाक्षिण्य वगैरे आहे का नाही तुला? आणि चांगले हॉटेल बघ. जिथे व्यवस्थित बोलता येईल.”

    हेही वाचा – गोष्ट कैकेयी आणि मंथराची… अमोल आणि सुशीलाची सुद्धा!

    “बघतो. पण एवढे काय बोलायचे आहे?”

    ” अरे बुद्दू, एखादी मुलगी तुझ्याबरोबर चांगल्या हॉटेलामध्ये जेवायला येते आहे आणि तुझ्याशी बोलू पाहते आहे, याचा अर्थ काय?”

    “काय? ” मी समजून न समजल्यासारखे केले.

    तिने फोन कट केला.

    0000

    त्या नवीन हॉटेलच्या फॅमिली रूममध्ये आम्ही दोघे बसले होतो. जेवणाचा आस्वाद घेताना मी बोललो,

    “हे एकदम कसे काय? पहिल्या नजरेत प्रेम वगैरे.”

    “मिस्टर अजय, थोडे इकडे तिकडेही बघत जा. तू राहतो एसटी स्टॅंडच्या मागे… त्याच्याच पुढच्या बाजूला आम्ही चार मैत्रिणी एका रूममध्ये राहत होतो. तुझ्या घरावरून जायचो. बरेचदा दिसायचा तू. तू मुलींकडे बघत नाही, हे बघूनच मी तुझ्याकडे खेचली गेली. पण तुला विचारणार कसे? पण नशीब बघ… तूच विचारायला आला.”

    “पण मी अजून हो कुठे म्हणालो? घरून आंतरजातीय विवाहाला हो म्हणायला हवे, शिवाय तू नॉन-व्हेज खात असशील तर, कायमचे सोडावे लागेल.”

    “सगळे सोडेन, पण आता तुला सोडत नाही सात जन्म.”

    “अगं, पण एवढ्या फास्ट…” पुढे मला बोलताच आले नाही, कारण नीलमने मला प्रेमाने गुलाबजाम भरवला.

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    कालाय तस्मै नमः

    April 29, 2026 ललित

    मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…

    April 28, 2026 ललित

    मृत्यू… एक रूटीन!!

    April 28, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कालाय तस्मै नमः

    By दिलीप कजगांवकरApril 29, 2026

    उत्तरार्ध दुसऱ्या दिवशी दुपारी मुलाशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे म्हणून सदानंद हॉलमध्ये बसले होते. आज त्यांचा…

    मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…

    April 28, 2026

    मृत्यू… एक रूटीन!!

    April 28, 2026

    आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    April 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    April 29, 2026

    कालाय तस्मै नमः

    April 29, 2026

    Dnyaneshwari : अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके

    April 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 एप्रिल 2026

    April 29, 2026

    मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…

    April 28, 2026

    मृत्यू… एक रूटीन!!

    April 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 282
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 400
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 589
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    April 29, 2026

    कालाय तस्मै नमः

    April 29, 2026

    Dnyaneshwari : अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके

    April 29, 2026
    Most Popular

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    April 29, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.