Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मृत्यू… एक रूटीन!!

    April 28, 2026

    आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    April 28, 2026

    Dnyaneshwari : आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हातियेर

    April 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, April 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मृत्यू… एक रूटीन!!
    ललित

    मृत्यू… एक रूटीन!!

    Team AvaantarBy Team AvaantarApril 28, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, मृत्यूची भीती, मृत्यूचे रुटीन, मृत्यूबाबत भावना गोठत चालल्या, विचलित न करणारा मृत्यू, शेजारच्या मृत्यूनंतरही सुरू असलेली दैनंदिनी
    प्रातिनिधीक फोटो (सौजन्य - गूगल जेमिनी)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    संध्या हरदास

    गेली वीस वर्षे मुंबईत नियमाने सकाळी फिरायला जातेय. सोसायटीजवळच्या मोकळ्या मैदानात किंवा बागेत पोहोचेपर्यंत रस्त्यात अनेक इमारती दिसतात. निऑन, ट्रिऑन, झिऑन यासारखी अपरिचित नावे असलेले टोलेजंग (30 मजली) टॉवर किंवा, ओडिसी, कॉमेट, टोपाझ यासारख्या इंग्रजी नाव असलेल्या सोसायटीच्या इमारती, रोजच्या रोज दिसतात. रोजची सकाळची दृश्येही ठरलेली…!

    सकाळी लिफ्ट अखंड शेवटच्या मजल्यावर थांबलेली. आपल्यापर्यंत थांबत थांबत पोहोचते. ‘खुला जा सिम सिम’ आपण म्हणत असताना लिफ्टचे दार उघडते, लिफ्ट गच्च भरलेली… आपण परत वेटिंग लिस्टवर…

    तळमजल्यावर ‌सिक्युरिटी वॉचमन कायम वहीत कसली तरी नोंद करीत आपल्याकडे न‌ बघता आपल्याला गुड मॉर्निंग करतो. एखादा भैय्या मोबाइलवर गाणी ऐकत कुणाची तरी कार पुसत असतो (मला तर फडकं फिरवतानाच दिसतो),  कामाला येणाऱ्या मावशींची वेगळीच लगबग सुरू असते. झोमॅटो-स्वीगीची मुले ही सकाळपासून पार्सल आणताना सर्रास दिसू लागली आहेत, सफाई कर्मचारीही आपापला ठरलेला एरिया स्वच्छ करताना दिसतात, सोसायटीच्या झाडांना पाणी देण्याचे (जागोजागी पाण्याची तळी तयार करणे) कामही सुरू असते…

    दोन विंगचे किंवा जवळजवळच्या सोसायटीचे तिघे चौघे वॉचमन मिळून सकाळ-वार्ता करत असतात, तर क्वचित, पण कार पार्किंगवरुन होणारी भांडणेही दृष्टीस पडतात. चिमुकल्यांना स्कूल बसपर्यंत सोडायला येणारी आई-बाबा, आजी आजोबा मंडळी बघणं मला फार आवडते.

    असेच पाच-सहा महिन्यांतून‌ दिसणारे एक दृश्य… मनाला थोडंसं नर्व्हस करणारं, विरक्त करणारे दृश्य म्हणजे सोसायटी समोरची शांत गर्दी किंवा सोसायटीच्या मुख्य दारासमोर तयारीनिशी उभी असलेली पांढरी ॲम्ब्युलन्स.

    हेही वाचा – Local train : डोंबिवली ते कसारा प्रवासातील ‘ते’ नातं

    ती शांत गर्दी, ती पांढरी ॲम्ब्युलन्स मला काहीसं डिस्टर्ब करते. गर्दीच्या आजूबाजूला इतर घरांचे, इतर लोकांचे रोजचे व्यवहार रोजच्या प्रमाणेच सुरू असतात. नारळपाणीवाला ठरलेल्या घरी नारळ पोहोचवतो, धोबी कपड्यांचे गाठोडे बरोबर नेमक्या घरी अचूक ठेवून येतो. दुधाची पिशवी आणि रोजचे वर्तमानपत्रही ठरलेल्या घरी दाराशी पडलेले असते…

    माझाही सकाळचा फेरफटका रोजच्या प्रमाणे सुरू असतो… मनात विचार मात्र अखंड सुरू असतात.

    आजही सकाळी एके ठिकाणी शांत गर्दी दिसली आणि वाटले… मृत्यू, आता एक रुटीन झालाय का माणसाच्या आयुष्यात? कुणाच्या जन्माची बातमी आपण ऐकतो, तेव्हा क्षणभर प्रसन्न होतो, दुसऱ्या क्षणाला रोजचे व्यवहार करू लागतो… कुणाच्या तरी घरी नवीन जीव जन्माला आलाय, हे साफ विसरून जातो. तसंच ‘मृत्यू’ची बातमीही आपल्याला फार विचलित करत नाही, मृतात्म्यास शांती लाभो, असे म्हणत पुढच्या कामास लागतो.

    आपणही सतत गर्दीत वावरत असतो, दररोज सकाळ उगवते, संध्याकाळ मावळते तसे कुठे जन्म तर कुठे मृत्यू होणारच… असा भाव मनात असतो का की, रोज मरे, त्याला कोण रडे? ही म्हण आपण खरी करून दाखवत असतो…

    मृत्यूची भीती कमी झाली की, मृत्यूची वास्तविकता आपण स्वीकारली आहे? की आयुष्य इतकं बिझी झालंय की आपण हळुहळू भावना शून्य होत जातोय?

    हेही वाचा – पोटभर आशीर्वाद

    एक ना दोन, असे असंख्य विचार मनात पिंगा घालत असतात.

    मृत्यूची भीती नाही वाटत, पण सकाळी सकाळी शांत गर्दी दिसली की, मन सैरभैर होतं. संध्या-छाया फेर धरू लागतात. ‘मरे एक त्याचा, दूजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे…’ हा श्लोक हमखास आठवतो. मग माझी मीच स्वतःला समजावते,

    जे अटळ आहे, जे घडणार आहे, त्याची चिंता कशाला करायची? तो येईल तेव्हा स्वागतच आहे! पण या क्षणी मला घरी जाऊन नातवाच्या दुपारच्या खाण्याची सोय करावयाची आहे, मला लवकर घरी जायला हवे, असे म्हणत मी माझी प्रभात फेरी पूर्ण करते आणि घरी येताच आपले ‘रूटीन’ सुरू करते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    April 28, 2026 ललित

    सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!

    April 27, 2026 ललित

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    By जितेंद्र अभ्यंकरApril 28, 2026

    नेहमीप्रमाणे ती महानगरातील आपल्या कंपनीतून सुट्टी घेऊन आईवडिलांना भेटायला आणि काही दिवस राहायला आली होती.…

    सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!

    April 27, 2026

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मृत्यू… एक रूटीन!!

    April 28, 2026

    आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    April 28, 2026

    Dnyaneshwari : आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हातियेर

    April 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 एप्रिल 2026

    April 28, 2026

    वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!

    April 27, 2026

    सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!

    April 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 281
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 399
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 586
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मृत्यू… एक रूटीन!!

    April 28, 2026

    आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    April 28, 2026

    Dnyaneshwari : आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हातियेर

    April 28, 2026
    Most Popular

    मृत्यू… एक रूटीन!!

    April 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.