मेष
- या आठवड्यात घरात शांतता राहील. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. नोकरदारांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी अनावश्यक कटकटी वाढतील, अशा परिस्थितीत सांभाळून बोला. शक्यतो वादाची सुरुवात तुमच्या बोलण्यामुळे होणार नाही, याची काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाला व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यवहार करतान सावध राहावे. विशेषत: स्पर्धक आणि हितशत्रूंपासून जपून रहा. महिलांनी शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक टाळावी. विद्यार्थ्यांना मित्रांसोबत चांगला वेळ घालवता येईल; छंदातून फायदा होऊ शकतो.
वृषभ
- या आठवड्यात शुक्राच्या भ्रमणामुळे नवीन संधी उपलब्ध होतील. इच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. कामे जलदगतीने पूर्ण कराल. घरासाठी देखील पुरेसा वेळ देता येईल. व्यावसायिक वर्गाने बेकायदेशीर काम टाळावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. महिलांना जुन्या व्याधी त्रास देऊ शकतात. विद्यार्थ्यांना काही व्यक्तींच्या भेटीतून नवीन शिकायला मिळेल.
मिथुन
- या आठवड्यात भावंडांविषयी चिंता वाटू शकते. नोकरदारांच्या बदलीची चर्चा होऊ शकते. फील्डमध्ये काम करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. व्यावसायिक वर्गाकडून तरुणांना कामाची संधी दिली जाऊ शकते. ओळखीमधून व्यवसायाच्या दृष्टीने नवीन कामे मिळतील. महिलांना मैत्रिणींसोबत सहलीचा आनंद घेता येईल. विद्यार्थ्यांना नवीन कल्पना सुचतील; तथापि, उन्हात जाणे टाळा.
कर्क
- या आठवड्यात सुट्टीनंतर कामावर जाण्याचा कंटाळा येईल. मात्र, कार्यालयात गेल्यावर नोकरदारांची कामे सहज पूर्ण होतील. सहकाऱ्यांची लक्षणीय मदत मिळेल. सर्वांना खूश ठेवण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. व्यावसायिक वर्गाला स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून फायदा होईल. महिलांना आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल.
सिंह
- या आठवड्यात मान-सन्मान मिळू शकतो. नोकरदारांच्या मेहनतीची दखल घेतली जाऊन कामाच्या ठिकाणी अचिव्हमेंट अवॉर्ड मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ खूश राहतील. शनी-मंगळ युतीमुळे व्यावसायिक वर्गाला अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते, तसेच खर्च संभवतो. महिलांना चिंता जाणवेल, अपुऱ्या झोपेचा त्रास होऊ शकतो; पित्त वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वाहन वापरताना काळजी घ्यावी.
हेही वाचा – एकीकडे जमदग्नी नाना तर, दुसरीकडे आदिनाथ… गौरीसमोर पेच!
कन्या
- या आठवड्यात उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी संभवतात. त्वचेचे प्रश्नही उद्भवू शकतात. त्यामुळे त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल. शनी-मंगळ युतीमुळे कामाच्या ठिकाणी नोकरदारांवर दबाव येऊ शकतो, तसेच धावपळही वाढेल. व्यावसायिक वर्गासाठी अनुकूल काळ आहे, नवीन करार होतील. महिलांना जोडीदाराच्या प्रगतीचा लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ आहे; मनाप्रमाणे गोष्टी घडतील.
तुळ
- या आठवड्यात आपले मत मांडून इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्यांचेही ऐकून घेण्याला प्राधान्य द्या. नोकरदारांना वरिष्ठांच्या कृपेने लाभ होतील. त्यांना बढती आणि नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. व्यावसायिक वर्गाकडून महत्त्वाचे करार केले जातील, तसेच नव्या संधी मिळतील. महिलांनी घरगुती वाद टाळून सामंजस्याने प्रश्न सोडवावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या बाबतीत मित्रांची मदत मिळेल.
वृश्चिक
- या आठवड्यात अनेक गोष्टींमध्ये विरोध जाणवेल. नोकरदारांनी कोणचीही मस्करी करणे टाळावे; गैरसमज होऊ शकतो. व्यावसायिक वर्गाने उधारीचे व्यवहार बंद करावेत, त्यातून आर्थिक लाभापेक्षा नुकसान जास्त होऊ शकते. महिलांना जोडीदारासोबत आनंदाचे क्षण मिळतील, सहलीला जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वाईट संगत टाळून चांगले मित्र निवडावेत.
धनु
- या आठवड्यात कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल आणि कामे वेळेत पूर्ण होण्यात अडचणी येतील. व्यावसायिक वर्गाची अडकलेली कामे पूर्ण होतील आणि जुनी येणी वसूल होतील. घरात लग्नकार्याचे वातावरण असल्याने महिलांचा प्रसन्न मूड राहील. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
मकर
- या आठवड्यात लहानसहान गोष्टींची काहीशी चिंता वाटेल. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. व्यावसायिक वर्गाच्या कामाचा वेग वाढेल. नवीन प्रॉडक्टला चांगला प्रतिसाद मिळेल. घरात लग्नाच्या चर्चा होतील, त्यामुळे आनंदी वातावरण राहील, महिलाही त्यात उत्साहाने सहभागी होतील. विद्यार्थ्यांना अपयशावर मात करून प्रगती करता येईल.
कुंभ
- या आठवड्यात घरातील सुरक्षा व्यवस्थित राहील, याकडे लक्ष द्या. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण अनुभवायला मिळेल. तसेच, नवीन संधीही मिळतील. इच्छुक तरुणांसाठी विवाहयोग आहे. व्यावसायिक वर्गाने व्यवसायातील गुपिते जपून ठेवावीत. भागीदारीतही उघड करू नयेत, सावध राहावे. महिलांना घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांचे घरात कौतुक होईल.
हेही वाचा – फाइलवरची सही बघून आराध्या चक्रावते…
मीन
- या आठवड्यात नकारात्मक विचार टाळा. नोकरदारांसाठी कामाचा ताण वाढेल. काम करताना घाईगडबडीत चुका होऊ शकतात, त्यामुळे सावध राहावे. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. व्यावसायिक वर्गाला जाहिरातीचा ओघ वाढवावा लागेल; त्याद्वारे नवीन प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवावे लागेल. महिलांच्या बाबतीत घरातील कामे वाढतील आणि त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल; मेहनतीला पर्याय नाही.


