Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार…

    April 25, 2026

    योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 25, 2026

    Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे

    April 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे

    Team AvaantarBy Team AvaantarApril 25, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    हा कोपे कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये । नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ॥172॥ एऱ्हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचे ॥173॥ हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेलें पार्थाअधीन ।
    यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ॥174॥ तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथ कौरवेशा । कृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥175॥ म्हणोनि तो देवांचा रावो । म्हणे पार्था ते तुज दृष्टि देवों । जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तूं ॥176॥ ऐसीं श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंव एकसरें । तंव अविद्येचे आंधारें । जावोंचि लागे ॥177॥ तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका । अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया कृष्णें ॥178॥ मग दिव्यचक्षु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी पाटा फुटला । ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुलें ॥179॥ हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ । विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥180॥ जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे । आपणपें वैकुंठें । दाविलें तया ॥181॥ मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एक वेळ खादली होती माती । तैं कोपोनियां हातीं । यशोदा धरिला ॥182॥ मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाडा द्यावयाचेनि मिसें । चवदाही भुवनें सावकाशें । दाविलीं तिये ॥183॥ ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें । आणि वेदांचियेही मती ठेले । तें लागला बोलों ॥184॥ तैसा अनुग्रहो पैं राया । श्रीहरी केला धनंजया । आतां कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणे तो ॥185॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    अर्थ

    अर्जुन रागावला की कृष्ण निवांतपणे सहन करतात असतात. अर्जुन रुसला म्हणजे देव त्याची समजूत काढत असतात. एकूण देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेड लागले आहे. ॥172॥ सहज विचार करून पाहिले तर, विषयाला जिंकूनच जन्माला आलेले शुकादिक खरे खरे पुरुष, ते भगवंताच्या केवळ वैषयिक लीलांचेच वर्णन करणारे स्तुतिपाठक झाले. ॥173॥ योगी ज्याचे सुख समाधीतच भोगतात, असा हा योग्यांचे समाधीत भोगण्याचे ऐश्वर्य असून, तो अर्जुनाच्या अगदी आधीन झाला आहे. याकरिता राजा धृतराष्ट्रा, माझे मन आश्चर्य करते, ॥174॥ तसेच संजय म्हणतो, कौरवांच्या राजा, (धृतराष्ट्रा), याच्यात आश्चर्य ते काय? कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्य़ाचा असा भाग्योदय होतो. ॥175॥ म्हणून ‘अर्जुना, ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्वरूप पाहशील, ती दृष्टी मी तुला देतो’ असा तो देवांचा राजा (श्रीकृष्ण परमात्मा) म्हणाला. ॥176॥ अशी अक्षरे भागवंतांच्या मुखातून निघतात न निघतात, तोच अज्ञानांधकार एकदम जावयास लागला. ॥177॥ ती अक्षरे नसून ब्रह्मसाम्राज्याला प्रकाशित करणा‍ऱ्या ज्ञानरूपी ज्योतीच अर्जुनाकरिता कृष्णाने उजळल्या, असे समजा. ॥178॥ मग अर्जुनाच्या ठिकाणी दिव्यदृष्टि उत्पन्न झाली आणि त्याच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले. याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपला ऐश्वर्ययोग दाखविला. ॥179॥ हे जे सर्व अवतार, ते ज्या विश्वरूपी समुद्रावरील लाटा आहेत आणि ज्या विश्वस्वरूपी किरणांमुळे विश्व हे मृगजळ भासते ॥180॥ ज्या योग्य आणि अनादि भूमिकेवर हे स्थावर जंगमाचे चित्र उमटते, ते आपले विश्वरूप कृष्णांनी अर्जुनाला (आपल्या ठिकाणी) दाखविले. ॥181॥ पूर्वी बालपणी जेव्हा एका वेळेस या श्रीकृष्णांनी माती खाल्ली होती, तेव्हा यशोदेने त्यास रागावून हाताने धरले ॥182॥ नंतर त्यावेळी भीत भीत जसे काही तोंडातील (मातीचा) झाडा देण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी यशोदेला विस्तारासह चौदाही लोक आपल्या मुखात दाखवले. ॥183॥ अथवा (तपश्चर्या करीत असताना) ध्रुवाच्या पुढे भगवान प्रगट झाल्यावर ध्रुवाच्या मनात भगवंताची स्तुती करावी, असे आले; पण ती कशी करावी हे त्यास कळेना. (तेव्हा) मधुवनामध्ये भगवंतांनी आपला शंख त्याच्या गालास लावला, तेव्हा वेदांचीही बुद्धी जेथे कुंठित होते, ते तो बोलायला लागला. ॥184॥ (संजय म्हणतो,) राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्णाने अर्जुनावर त्याप्रमाणे अनुग्रह केला. त्यामुळे आता माया कोणीकडे आहे, ही भाषा देखील तो जाणेनासा झाला. ॥185॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    April 24, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    By Team AvaantarApril 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा जें अतींद्रिय म्हणोनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया विभागा फिटलें । तें…

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें

    April 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार…

    April 25, 2026

    योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 25, 2026

    Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे

    April 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 एप्रिल 2026

    April 25, 2026

    Ayurveda : निरोगी वसंताचा सारांश आणि रोगप्रतिकारशक्ती

    April 24, 2026

    फाइलवरची सही बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 278
    • अवांतर 183
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 395
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 199
    • मैत्रीण 18
    • ललित 578
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Kitchen Tips : मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार…

    April 25, 2026

    योगनिद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 25, 2026

    Dnyaneshwari : जिये अनादिभूमिके निटे, चराचर हें चित्र उमटे

    April 25, 2026
    Most Popular

    Kitchen Tips : मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार…

    April 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.