Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जॉबसंदर्भातील फाइलवरची स्वाक्षरी बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 एप्रिल 2026
    थर्ड अंपायर

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 24, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 24 एप्रिल 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 04 वैशाख शके 1948; तिथि : अष्टमी 19:21; नक्षत्र : पुष्य 20:13;
    • योग : शूल 25:23; करण : विष्टि 08:01;
    • सूर्य : मेष; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 18:57;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    दुर्गाष्टमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर

    टीम अवांतर

    मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. वडील रमेश तेंडुलकर कवी होते तर आई रजनी तेंडुलकर एका विमा कंपनीत काम करत होत्या. सचिनला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. मोठा भाऊ नितीन यांनी सचिनमधले गुण हेरले आणि शिवाजी पार्क येथील रमाकांत आचरेकर सरांकडे रीतसर प्रशिक्षण मिळावे, यासाठी नेले. आचरेकर सरांनी देखील सचिन नामक हिऱ्याला पैलू पाडले.

    या मास्टर ब्लास्टरने 15 नोव्हेंबर 1989 रोजी कराची येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली, त्यावेळी तो फक्त 16 वर्षांचा होता. त्यानंतर 18 डिसेंबर 1989 रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचे पदार्पण झाले. या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सचिनने जगाचे लक्ष नक्कीच वेधून घेतले.

    हेही वाचा – जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    पुढे सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके ठोकली आहेत. याशिवाय, 200 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला असून 15 हजार 921 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके सचिनच्या नावे असून हा एक विश्वविक्रम आहे. तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सकडून खेळताना सचिन तेंडुलकरने संघाला अनेकदा विजय मिळवून दिले.

    24 वर्षांच्या कारकिर्दीनंतर 16 नोव्हेंबर 2013 रोजी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. निवृत्तीनंतरही सचिन तेंडुलकर हा देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. आजही अनेक मोठे ब्रँड त्याला आपल्या जाहिरातींमध्ये घ्यायला उत्सुक असतात. ब्रँड ट्रू ब्लू हा त्याचा फॅशन ब्रँडही लोकप्रिय आहे. याशिवाय तेंडुलकर नावाची रेस्टॉरंट्स देखील त्यांनी सुरू केली आहेत.

    सचिन यांना 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला. 1997मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आणि हा पुरस्कार मिळविणारे सचिन हे पहिले क्रिकेटपटू ठरले. 1999 मध्ये पद्मश्री तर, 2008मध्ये सचिन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय, 2001 साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. तर, 2014 मध्ये ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज मन सकारात्मक असेल. मात्र इतरांशी होणाऱ्या संभाषणाच्या वेळी  संयम ठेवा. समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही, याची काळजी घ्या. कुटुंबाकडून एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात पाठिंबा मिळेल. होतकरू तरुणांना नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना खूप मेहनत करावी लागेल.

    वृषभ – कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी अकारण वाद घालू नका. आज कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. तरीही दुसऱ्यांवर जास्त विसंबून न राहता, तुमचे कार्य सुरू ठेवा. नव्या स्रोतामुळे  उत्पन्नात वाढ होईल, पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. वडिलांना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. आरोग्याची देखील काळजी घ्या.

    मिथुन – आज मनःशांती मिळेल. मात्र अनावश्यक वादविवाद आणि भांडणे टाळा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात, त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागेल. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर खर्चावरही नियंत्रण ठेवा. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.

    कर्क – आशा-निराशेचा कल्लोळ मनात निर्माण होईल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. काहीवेळा तुम्ही चिडचिडे होऊ शकता. एखाद्याला उसने दिलेले पैस परत मिळतील. तुम्ही काही जुन्या मित्रांना भेटू शकता. आज शैक्षणिक कार्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला कपड्यांच्या भेटवस्तू मिळू शकतात.

    सिंह – आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. मेहनतीने नवे काम शिकून घ्याल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारेल. कामाच्या निमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे आणि हा प्रवास फायदेशीर ठरेल. संभाषणात संतुलन राखा. बहिणींचा पाठिंबा मिळेल. तुम्ही काही जुन्या मित्रांनाही भेटू शकता.

    कन्या – कौटुंबिक जीवन सुखी असेल. व्यवसायात सुधारणा होईल आणि उत्पन्न वाढेल. वरिष्ठांशी मतभेद वाढू शकतात. नोकरीचे ठिकाण बदलू शकते. नाराजी आणि समाधानाचे क्षण येतील. लगेचच कोणावर विश्वास ठेवून मनातल्या गोष्टी उघड करू नका. वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात.

    तुळ – अति राग आणि आवेश टाळा, आत्मसंयम राखा. व्यवसायाच्या दृष्टीने बरीच धावपळ करावी लागेल. उत्पन्नात घट आणि खर्चात वाढ होण्याची चिंता लागून राहील. नोकरीत उच्च पद मिळू शकते. पण त्याचबरोबर कामाचा ताणही काही प्रमाणात वाढेल. विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

    हेही वाचा – पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    वृश्चिक – तुमच्यात आत्मविश्वास भरपूर असेल, पण संभाषणाच्या वेळी संयमी रहा. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वाढेल. तथापि, व्यवसाय वाढीसाठी कठोर परिश्रमही कराल. कामानिमित्त खूप प्रवास करावा लागू शकतो. मित्राच्या मदतीने व्यवसायाला नवीन दिशा मिळू शकते. पालकांकडूनही व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळू शकते.

    धनु – नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी सोपविली जाऊ शकते. पण सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सहकारी दुखावले जाणार नाहीत, याची काळजी घ्या. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. त्यानिमित्त नव्या ओळखी होतील. खर्चाकडे बारकाईने लक्ष द्या, अन्यथा अनावश्यक खर्च वाढत जाईल.

    मकर – रागावर नियंत्रण ठेवा, संयम बाळगा. शांत राहूनच कामे मार्गी लावता येतील. मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न वाढू शकते. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी धावपळ करावी लागेल. जुन्या मित्राकडून व्यवसाय भागीदारीचा प्रस्ताव मिळू शकतो, ती एक चांगली संधी असेल. सुसंवादामुळे कुटुंबातील नातेसंबंध अधिक गोड होतील.

    कुंभ – व्यवसायात बदलाच्या संधी मिळू शकतात. नवीन तंत्रज्ञान शिकून घ्या, त्याचा व्यवसायात फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिस्पर्धी सक्रिय होण्याचा प्रयत्न करतील, सावध रहा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी घरापासून दूर रहावे लागेल. कौटुंबिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते.

    मीन – महत्त्वाच्या कामात व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे सतर्क रहा. व्यवसायात नफावृद्धीच्या संधी मिळतील. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. संध्याकाळी धार्मिक कार्यांमध्ये सहभागी व्हाल. तसेच, आपल्या संततीच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026 थर्ड अंपायर

    IPL 2026 : परवानगी नसताना कोणी वापरला मोबाइल? कारवाई होणार का?

    April 12, 2026 थर्ड अंपायर

    अजिंक्य रहाणेला ठरवून केले जातंय का टार्गेट?

    April 5, 2026 थर्ड अंपायर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    थर्ड अंपायर

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    By Team AvaantarApril 13, 2026

    आरेन भारताच्या आयुष शेट्टी याने शानदार कामगिरी करत बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. अंतिम…

    IPL 2026 : परवानगी नसताना कोणी वापरला मोबाइल? कारवाई होणार का?

    April 12, 2026

    अजिंक्य रहाणेला ठरवून केले जातंय का टार्गेट?

    April 5, 2026

    युवराजने मागितली धोनी, कपिल देव यांची माफी; नेमकं काय घडलं?

    April 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जॉबसंदर्भातील फाइलवरची स्वाक्षरी बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026

    Dnyaneshwari : ऐसें तेणें वेदांतवेद्यें, सकळ लोकआद्यें…

    April 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 एप्रिल 2026

    April 24, 2026

    जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक… 

    April 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 277
    • अवांतर 183
    • आरोग्य 104
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 394
    • फिल्मी 46
    • फूड काॅर्नर 198
    • मैत्रीण 18
    • ललित 578
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जॉबसंदर्भातील फाइलवरची स्वाक्षरी बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    पसारा आवरेना आठवणींचा!

    April 24, 2026

    रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…

    April 24, 2026
    Most Popular

    जॉबसंदर्भातील फाइलवरची स्वाक्षरी बघून आराध्या चक्रावते…

    April 24, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.