Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » जगायला नेमका किती मेंदू लागतो?
    आरोग्य

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरApril 23, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, डोकेदुखीचा पेशंट, मेंदूची गरज किती, सीटी स्कॅनने वैद्यकशास्त्र अचंबित, सीटी स्कॅनने डॉक्टर चक्रावले, मेंदू नसलेला माणूस, IQ म्हणजेच बुद्धिमत्ता नाही
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भावंडांची जोडी ओपीडीत आली होती, पैकी मोठा भाऊ धाकट्या आजारी बहिणीला हसत होता… “काय झालं?” विचारलं तेव्हा तिच्याकडून उत्तर आलं, “डोकं दुखतंय…” हे ऐकून तिचा भाऊ पुन्हा हसला, “अगं, पण कसं शक्य आहे?”

    “एऽऽ चूप रेऽऽ आधीच डोकं दुखतंय…” ती बिचारी खरंच चिडली.

    भावाबहिणीत मस्ती-विनोद-थट्टामस्करी चालत असते; त्यामुळं मी अर्थातच, त्यांच्या संवादाकडं दुर्लक्ष केलं अन् नीट माहिती घेत तिला लक्षणजन्य औषध दिली आणि जाता जाता “डोकं – त्यातला मेंदू – त्यातली अक्कल या तीन वेगवेगळ्या गोष्टीयेत रे,” अशी टीपही दिली. दोघेही “थॅंक्स डॉक,” म्हणत हसतच निघून गेले. त्यांना कळलं की नाही माहीत नाही, पण तुम्हाला या संदर्भातली एक केसच सांगतो….

    तो दिवस डॉक्टरांसाठीही अगदी साधाच होता. फ्रान्समधल्या एका रुग्णालयात मध्यमवयीन, शांत, सुस्वभावी सरकारी कर्मचारी “डोकं दुखतंय” म्हणूनच आला होता… ना सर्दी, ना ॲसिडिटी, ना निद्रानाश, ना काही विचित्र वर्तन, ना स्मरणशक्तीचा त्रास, ना बोलण्यात अडखळणं… नेहमीसारखाच, एक अगदी ‘नॉर्मल’ माणूस…

    बीपी-शुगर-ओटू सगळं अगदी नॉर्मल पण फक्त खबरदारी आणि जिज्ञासा म्हणून डॉक्टरांनी त्याला सीटी स्कॅन करायला सुचवलं आणि… त्याचा तो स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली!

    हेही वाचा – Alcoholism : क्रांतिकारी शोधामागची कथा!

    स्क्रीनवर जे दिसत होतं, ते वैद्यकीय पाठ्यपुस्तकांना आव्हान देणारं होतं… मेंदू असायला हवा तिथं फक्त मोठमोठे काळे पोकळ भाग दिसत होते; जे होतं सेरेब्रोस्पायनल फ्लुईड अर्थात सीएसएफ…!! मेंदूचा जवळजवळ 85 ते 90 टक्के भाग संपूर्णपणे आणि चक्क गायब होता! सेरेब्रल कॉर्टेक्स अगदी पातळ होतं, व्हेंट्रिकल्स प्रचंड फुगलेले होते आणि मेंदू जणू कवटीरुपी भिंतीला नावाला चिकटवून ठेवल्यासारखा लागलेला होता…

    डॉक्टर एकमेकांकडं पाहू लागले… हा माणूस चालतो कसा? बोलतो कसा? अरे, पण हा जिवंत आहे तरी कसा? याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे हा रुग्ण विवाहित होता, दोन मुलांचा बाप होता!!! चांगल्या पगाराची सरकारी नोकरी ईमानेइतबारे करत होता आणि समाजात अतिशय व्यवस्थित वावरतही होता.

    त्याची IQ टेस्ट केली गेली आणि निकाल? आयक्यू थोडा कमी आढळला असला तरी, मानसिकदृष्ट्या अपंग किंवा मतिमंद म्हणावा इतपत तर अजिबात कमी नव्हता! जणू निसर्गानं स्वतःच डॉक्टरांना प्रश्न विचारला होता, “एक माणूस म्हणून जगायला मेंदू नेमका किती लागतो?”

    सखोल चौकशीअंती एक जुनी आठवण पुढं आली; त्याच्या लहानपणी एका आजारपणात त्याच्या डोक्याचं छोटंसं ऑपरेशन झालं होतं आणि निदान होतं ‘हायड्रोसिफॅलस’ अर्थात संसर्गामुळं मेंदूत अतिरिक्त पाणी साठणं…

    हेही वाचा – …यह तो अलगही ‘केमिकल लोच्या’

    त्या काळात यावर उपचार अपुरे होते, सीएसएफ हळूहळू साठत गेलं आणि वर्षानुवर्षे मेंदूला दाबत राहिलं, पण हे सगळं इतकं हळूहळू घडलं की, मेंदूला स्वतःला जुळवून घ्यायला वेळ मिळत गेला… अन् इथंच दडलेला होता खरा चमत्कार! मानवी मेंदूची एक अद्भुत क्षमता आहे, ती म्हणजे न्युरोप्लास्टिसिटी..

    मानवी मेंदू म्हणतो, “जागा कमी आहे? चालेल, मैं ॲडजस्ट करूंगा… पर काम नहीं रुकेगा!”

    त्याच्या मेंदूनं महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक न्यूरॉन्स जपले, निरुपयोगी मार्ग बंद केले आणि उरलेल्या मेंदूवरच संपूर्ण आयुष्य चालवलं… जणू एका खोलीच्या घरात पूर्ण कुटुंब शिस्तीत राहिलं…

    वैद्यकशास्त्र हादरलं! ही केस वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आणि जगभर एकच चर्चा सुरू झाली… IQ म्हणजेच बुद्धिमत्ता नाही, मेंदूचा आकार म्हणजे मेंदूच्या क्षमतेचं मानक नव्हे, मानवी शरीर हे फक्त यंत्र नाही; हा रुग्ण म्हणजे वैद्यकशास्त्राच्या अहंकारावर पडलेली नम्रतेची चपराक होती!

    हा माणूस काही ‘सुपरह्युमन’ नव्हता; तो फक्त एक सामान्य माणूस होता… पण त्याच्या शरीरानं आपल्याला शिकवलं, “तुम्ही जे अशक्य समजता, ते निसर्गासाठी फक्त एक वेगळी वाट असते.”

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026 आरोग्य

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    By रविंद्र परांजपेApril 18, 2026

    मागील लेखात आपण योगासने अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण…

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026

    Dnyaneshwari : एथ कां पां हा उगला, म्हणोनि कृष्णें जंव पाहिला

    April 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 एप्रिल 2026

    April 23, 2026

    आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…

    April 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 276
    • अवांतर 184
    • आरोग्य 104
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 394
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 198
    • मैत्रीण 18
    • ललित 574
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    World Book Day… सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचन आवश्यक

    April 23, 2026

    जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    April 23, 2026
    Most Popular

    पुस्तके… ज्ञानाचा अक्षय्य वारसा आणि जीवनाचे दीपस्तंभ

    April 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.