Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026

    सार्थक

    August 3, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » लव यू बाबा फॉर एव्हर…!
    ललित

    लव यू बाबा फॉर एव्हर…!

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेApril 20, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नव्या पिढीचे भावबंध, दोन पिढीतील अंतर, आजोबा नातवाची मैत्री, आजोबांबद्दलचे प्रेम, आजोबांबद्दलची आत्मीयता, नव्या पिढीचे भावनिक होणे, आजोबा नातवाचे भावनिक नाते
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी - (प्रातिनिधीक)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आजकाल सगळं झटपट हवं असलेली पिढी स्वतःबद्दल आणि कुटुंबातील व्यक्तींच्या नातेसंबंधांबद्दल इतका खोलवर जाऊन विचार करत असतील, याचं मला आश्चर्य वाटलं… जेव्हा मी माझ्या नातवाने आमच्यातील संवादादरम्यान व्हॉट्सॲपवर पाठवलेला खालील लांबलचक मेसेज वाचला… तेव्हा लक्षात आलं. लहानपणापासूनच तो मला ‘बाबा’ म्हणतो आणि त्याच्या वडिलांना ‘पप्पा’ म्हणतो. एखादी गोष्ट गळी उतरवायची असली की, इमोशनल ब्लॅकमेल कसं करायचं, ते हल्लीच्या पिढीकडून शिकावं.

    0000

    “बाबा, मुंबईत होणाऱ्या माझ्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला तुम्ही यायलाच पाहिजे म्हणजे पाहिजे. मी तुमच्याकडून न येण्याचं कुठलंही कारण ऐकून घेणार नाही.”

    “अरे, असं झालं तर माझं सगळं नाटक पाठ होईल…” माझा लटका विरोध.

    “ते काही नाही. तुम्ही काही बोलूच नका. माझ्या जन्मापासून आजवरच्या आयुष्यात तुमचं असणं किती महत्त्वाचे आहे, हे मी पुरेपूर जाणतो. 20 वर्षांपूर्वी मी जन्मलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी विलेपार्ल्याहून विरारच्या आजीकडे छोट्या बाळाला लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घेऊन तुम्ही पप्पासोबत आला होता. तुम्ही सुचवलेल्या नावामधूनच मम्मीने माझं नाव ठेवले… मी विरारहून पार्ल्याला कधी आलो, ती तारीख तुम्हाला आजही आठवते… आठवायला बसलो तर, आज कितीतरी गोष्टी आठवल्या मला. मी सहा महिन्यांचा असताना तुमच्या दोन्ही हातांच्या पाळण्यात धरून तुम्ही जीवदानीचा डोंगर चढून मला देवीच्या चरणांवर ठेवले होते…”

    “तुम्ही म्हटलेल्या गणपतीच्या आरत्या ऐकून मी म्हणे माझं रडणं थांबवायचो. रोज संध्याकाळी न चुकता तुम्ही मला पार्ला स्टेशनवर लोकल ट्रेन बघायला न्यायचात. तुम्ही आणलेली तीन चाकी सायकल, नंतर मोठं झाल्यावर आणलेली दुचाकी सायकल… त्यावरून आमच्या गल्लीत मी फेऱ्या मारायचो. तुम्ही माझ्या मागे धावायचात आणि दोन ठिकाणी मला श्रीखंडाच्या गोळ्या द्यायचात. मी पहिली, दुसरीत असताना रामरक्षेचे पहिले 10 श्लोक म्हणायच्या स्पर्धेत तुम्ही रोज रात्री आमच्या घरी येऊन न कंटाळता माझ्याकडून ते म्हणून घेतले आणि मला पहिले बक्षीस मिळाल्यावर कौतुकाने फोटो स्टुडिओमध्ये जाऊन माझा फोटो काढला होता…”

    “मी मोठा होत गेलो, तसं आपलं नातं आणखी घट्ट होत गेले. जगासाठी जरी आपल्यात रक्ताचे नाते नव्हते तरी, मी तुम्हाला कायम त्याच नात्याने बघत आलो आजवर आणि म्हणूनच जेव्हा पप्पा-मम्मी काही गोष्ट द्यायचे नाहीत, तेव्हा मी तुमच्याकडून हक्काने प्रत्येक गोष्ट मागून घेतली आणि तुम्ही देखील तितक्याच प्रेमाने मला ती दिलीत. मग तो मोबाइल असो, शूज असोत, कपडे, बेल्ट गॉगल्स असो, पॉकेटमनी असो… पूर्वी मी गंमतीने तुम्हाला माझं एटीएम कार्ड म्हणायचो. आता तर काय जीपेच्या जमान्यात मी तुम्हाला कंगाल करणार अशी गंमतीने तक्रार तुम्ही करता…”

    “तुमच्याशिवाय माझं आयुष्य मी विचारच करू शकत नाही. आज कॉलेज शिक्षणासोबतच अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुमचा मिळालेला पाठिंबा फार मोलाचा आहे माझ्यासाठी. अभिनय क्षेत्र बेभरवशी असल्याने मी पदवीधर होणं किती महत्त्वाचे आहे, हे तुम्ही माझ्या मनावर बिंबवत असता. मला कधी कधी ते सतत ऐकून कंटाळा येतो आणि मी रागाच्या भरात काहीतरी उलटसुलट बोलून जातो, तरी देखील तुम्हाला शांत बघून मी खजील होतो.”

    हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!

    “माझ्या आणि पप्पा मम्मीच्या पिढीला अधूनमधून ताणलेल्या परिस्थितीत देखील बांधून ठेवण्यात तुम्ही आजवर खूप कष्ट घेतले आहेत, याची मला जाणीव आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या गंभीर आणि दीर्घकाळ सुरू राहिलेल्या आजारपणाला समर्थपणे तोंड देण्यासाठी एकटं रहाणं पसंत केले. त्या दोघांच्या पश्चात कितीतरी जणांना न थकता अविरत कष्ट घेऊन तुम्ही आधार दिलात, मोठं केलंत, मार्गदर्शन केलंत. धडपडणाऱ्यांना सावरत त्यांची आयुष्यं मार्गी लावलीत. तुम्ही सुद्धा आता साठी पार करून आणखी पुढे गेला आहात. आता तुम्ही तुमचं उरलेले आयुष्य मनसोक्त जगा, आनंदी रहा जमेल तेवढी भटकंती करा. मी आहे तुमच्यासोबत शेवटपर्यंत…”

    “माझ्या या पुढील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर मला तुम्ही हवे आहात, माझ्या डोळ्यांसमोर! म्हणूनच माझ्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला तुम्ही हक्काने यायचं आहे, कुठलीही सबब पुढे न करता… तुमच्या सारखं कोणीतरी आपलंसं, आपल्या हक्काचं असणं सगळ्यांच्या नशिबात नसतं. पण मी त्या बाबतीत खूप भाग्यवान आहे…”

    “फेसबुक तुमचं दुसरं घर आहे, असं तुम्ही नेहमी म्हणता. तुमची तिथली लोकप्रियता मी जाणून आहे. तुमच्या पोस्ट आणि त्यावरच्या कमेंट्स वाचल्या की, एक गोष्ट लक्षात येते ती ही की, वयाचं अंतर दूर करून तुम्ही प्रत्येकाला आपलंसं करून घेतलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमचा वाचकवर्ग पसरलेला आहे. जे कधी भेटतील याची खात्री नाही, तरीही अशा प्रत्येकाला आयुष्य सुखाने कसं जगायचं, हे तुम्ही सोप्या भाषेत समजावून सांगता तुमच्या पोस्ट आणि चारोळ्यांच्या माध्यमातून. फेसबुकवरील काही समुहात तुम्ही लेखक म्हणून लोकप्रिय आहात हे मी ऐकून आहे.”

    हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…

    “म्हणूनच तुम्ही ग्रेट आणि ऑसम आहात. ‘फेसबुक काका’ हे तुमच्या वाचकमित्रांनी तुम्हाला प्रेमाने दिलेले नाव खरोखरच योग्य आणि सार्थ आहे. तुमच्याच लिहिलेल्या ओळीत सांगायचे तर मी अभिमानाने म्हणेन –

    आजोबा नातू जीवाभावाचे मैतर

    जरी असले दोन पिढ्यांचे अंतर

    लव यू बाबा फॉर एव्हर…


    टीप : मी इतका लांबलचक मराठी निबंध कसा आणि कधी लिहिला याचा विचार नका करू.  झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या माझ्या मालिकेच्या सेटवर बसूनच मी दोन सीनच्या दरम्यान शांतपणे लिहिला आहे.”


    एवढं वाचून मी नि:शब्द झालो! परमेश्वर काही नाती आपल्याला जन्माला घालायच्या आधीच जोडून ठेवतो. फक्त योग्य वेळी ती तुम्हाला कळतात आणि वेगळ्याच भावनेत बांधून ठेवतात. मी आणि माझा नातू रूचिर देखील याला अपवाद नाहीत. कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा देवाने निर्माण केलेली अनोखी नाती अधिक घट्ट असतात, या गोष्टीला आम्ही दोघेही अपवाद नाही आणि म्हणूनच मला आमच्यातील ह्या अनोख्या नात्याचा अभिमान आहे.

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    सार्थक

    August 3, 2026 ललित

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026 ललित

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सार्थक

    By अतुला प्रणव मेहेंदळेAugust 3, 2026

    “नमू, अगं चल नाश्ता करून घे. तुला आवडतात ते डिंकाचे दोन लाडू आणि अळीवाची खीर…

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026

    सार्थक

    August 3, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : भलतेथ बुद्धी बळी, रजे आरिसा उजळी

    August 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 ऑगस्ट 2026

    August 3, 2026

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 382
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 518
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 825
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026

    सार्थक

    August 3, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.