मेष
- या आठवड्यात रवी मेष राशीमध्ये आला आहे. तो उच्चीचा असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तब्येत उत्तम राहील. नोकरदारांचे ऑफिसमध्ये वर्चस्व राहील. तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि कामाचे श्रेय तुम्हालाच मिळेल. व्यावसायिक वर्गाकडून नवीन प्रॉडक्ट बाजारात आणले जाऊ शकते. नवीन करार होतील. सरकारी कामे जलद गतीने पूर्ण होतील. महिलांच्या बाबतीत मनाप्रमाणे घरात कामे होतील. मदतनीसाकडून वेळेत मदत मिळेल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परदेशी शिक्षणासाठी चांगला कालावधी आहे.
वृषभ
- या आठवड्यात कामाचा ताण जाणवेल. नोकरदारांना सुट्टी मिळण्यात अडचणी येतील. काम आणि घरच्या जबाबदाऱ्या यामध्ये अडकून पडाल. घरातील लग्नकार्याला ऐनवेळी उपस्थित राहू शकाल. व्यावसायिक वर्गाला नवीन योजना अमलात आणता येतील. नवीन व्यवहार उत्साहात सुरू कराल. महिलांना लग्नसमारंभात आनंद घेता येईल, माहेरची माणसं भेटतील. विद्यार्थ्यांच्या नवीन ओळखी होतील, नवे मित्र मिळतील.
मिथुन
- या आठवड्यात खेळाडूंना प्रसिद्धी आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन नोकरी शोधणाऱ्या नोकरदारांसाठी हा योग्य काळ आहे. नवीन संधी उपलब्ध होतील आणि आवडीच्या क्षेत्रात काम करता येईल. आधी सुरू केलेल्या योजनांचा लाभ व्यावसायिक वर्गाला पाहायला मिळेल. मेहनत आणि चिकाटी ठेवावी लागेल. महिलांना घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे.
कर्क
- या आठवड्यात आराम मिळेल. नोकरदारांच्या बाबतीत कामाचा ताण कमी असेल. वरिष्ठ सुट्टीवर असू शकतात, त्यामुळे काम जास्त करावे लागेल, पण ताण जाणवणार नाही. व्यावसायिक वर्गाला अचानक आर्थिक अडचणी येऊ शकतात. तथापि, मित्र किंवा नातेवाईकांकडून मदत घेऊ नका; बँकेकडून मदत घेता येईल. महिलांना माहेरी जाण्याची संधी मिळेल. खरेदीचा आनंद घेता येईल. विद्यार्थ्यांना आजोळी जाण्याची संधी मिळेल.
सिंह
- या आठवड्यात तब्येतीच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. नोकरदारांना कामाचा कंटाळा येईल, सातत्याने काम नकोसे वाटेल. सुट्टी घेऊन कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. व्यावसायिक वर्गाने भागीदारीत थोडे अलिप्त राहून निरीक्षण करावे. त्यामुळे व्यवसाय वाढीस मदत होईल. महिलांना सामाजिक तसेच कामाच्या ठिकाणी मान मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल.
हेही वाचा – कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…
कन्या
- या आठवड्यात घरात धार्मिक कार्यक्रम होतील. वातावरण प्रसन्न राहील. नोकरदारांची कामे सुरळीत पार पडतील. विरोधक त्रास देणार नाहीत. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यावसायिक वर्गाला तेजी अनुभवता येईल. घेतलेले व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. भागीदाराचा तुमच्यावर विश्वास वाढेल. पाहुण्यांमुळे महिलांचे काम वाढेल. विद्यार्थ्यांनी उन्हात भटकणे टाळावे.
तुळ
- या आठवड्यात थोडा कंटाळा जाणवेल. नोकरदारांवर कामाचा ताण राहील. तरी, सहकारी मदत करतील आणि वातावरण आनंदी राहील. व्यावसायिक वर्गाला भागीदारीतून मोठा फायदा होईल. तुमच्या योजना यशस्वी होतील. शिवाय, जनसंपर्क वाढेल. महिलांना जोडीदाराच्या माध्यमातून लाभ होईल. घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांनी सुसंगतीवर भर द्यावा.
वृश्चिक
- या आठवड्यात पोटाच्या तक्रारी संभवतात. कला आणि क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. नोकरदारांनी वाद टाळावेत. बोलताना शांतपणे विचार करून बोलावे. व्यावसायिक वर्गाला आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याची गरज भासेल. तसेच, काही जुनी येणी वसूल होतील. महिलांना कुटुंबासोबत सहलीचा आनंद घेता येईल. विद्यार्थ्यांना क्रीडा आणि कला क्षेत्रात यश मिळेल.
धनु
- या आठवड्यात अडथळ्यांचा सामना करावा लागेल. नामस्मरण केल्यास मार्ग निघेल. नोकरदारांनी वेळेचे नियोजन करावे. कामाचे योग्य वर्गीकरण करून ते हाती घेऊन पूर्णत्वास न्यावे. त्यामुळे कामाचा उरक राहील. व्यावसायिक वर्गाने महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. यासाठी डायरी लिहिण्याची सवय लावून घ्यावी. जेणेकरून ऐनवेळी धावपळ होणार नाही. महिलांना भावंडांकडून मदत मिळेल. विद्यार्थ्यांना मित्रांसोबत सहलीची संधी मिळेल.
मकर
- या आठवड्यात भावंडांची भेट होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. कामाच्या ठिकाणी राजकारण होऊ शकते. पण तुम्ही अलिप्त रहा, त्यात अडकू नका. व्यावसायिक वर्ग व्यवसायासाठी नवीन जागा घेऊ शकतो. जुन्या स्पर्धकांबरोबरचे संबंध सुधारतील. महिलांना माहेरच्या संपत्तीबाबत निर्णय घ्यावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी.
कुंभ
- या आठवड्यात घरातील कामे वाढतील. नोकरदारांची कामे वेळेत पूर्ण होतील. महत्त्वाच्या मुद्द्यावरील चर्चा यशस्वी ठरेल. स्थावर मालमत्ता खरेदीचा योग आहे. जुनी येणी वसूल करताना व्यावसायिक वर्गाला अडचणी येतील. मात्र, व्यवसायावर त्याचा परिणाम होणार नाही, व्यवसाय स्थिर राहील. महिलांना घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
हेही वाचा – पाऊस असा रुणझुणता…
मीन
- या आठवड्यात लग्नसमारंभात जाण्याचा योग आहे. नोकरदारांची कोर्ट-कचेरीची कामे पूर्ण होतील. कामाच्या बाबतीत वरिष्ठ समाधानी राहतील, सुट्टीचा अर्ज मंजूर होईल. व्यावसायिक वर्गाने आळस टाळून कामाचा वेग वाढवावा. नवीन संधी तुमची वाट पाहात आहे. महिलांच्या दृष्टीने घरातील काम वाढेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल आणि कौतुक होईल.


