Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…
    ललित

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यApril 17, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्याचा नवा अध्याय, तन्वीकडून आराध्याची फसवणूक, आराध्या आलिशान खोलीत लॉक, आराध्याला अडकवण्याची तन्वीची खेळी, तन्वी शेखरचा आराध्याविरुद्ध कट, आराध्या शेखरसह मुंबईत, तन्वी आराध्या मुंबईत, मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू, आराध्याला मदत करणारा कोण
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link
    भाग – 21

    समुद्राच्या लाटा लांबवर किनाऱ्यावर आदळत होत्या. सूर्यप्रकाश त्या लाटांवर चमकत होता, आणि तिच्या डोळ्यांत एक अनामिक चमक निर्माण करत होता. तिचं मन क्षणभर सगळी शंका, सगळं अस्वस्थतेचं सावट विसरून त्या दृश्यात हरवून गेलं… पण हाच क्षण, जिथून गोष्टी अचानक कलाटणी घेणार होत्या!

    आराध्याचं अंतर्मन तिला काहीसं सावध करायचा प्रयत्न करत होतं, पण त्या भव्यतेच्या मोहात ती हलक्याच सुरात हरवलेली होती…

    आराध्या फ्रेश होण्याकरिता म्हणून बाथरूममध्ये गेली. नाही म्हणायला दीड तास प्रवास करून ते इथे आले होते… थोड्या वेळाने ती बाथरूममधून बाहेर आली… चेहऱ्यावर पाण्याचे थेंब, कपाळावरची बट अलगद बाजूला करत ती हसतच बोलू लागली —

    “अन्वी, शेखर, मी फ्रेश झाले… आपण खाली जायचं का?”

    पण प्रतिसाद काहीच नाही. खोलीत एकदम शांतता होती. अन्वी आणि शेखर दोघंही कुठेच दिसत नव्हते. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर आता हळूहळू चिंता उमटू लागली. तिने खोलीत पाहिलं — मोबाइल, पर्स, सगळं तसंच होतं… पण ती दोघं मात्र गायब होती.

    हेही वाचा – गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    ती दरवाज्याकडे गेली. बाहेर डोकावून पाहणार होती, पण… दरवाजा लॉक! आराध्या घाबरली. तिने पटकन लॉक फिरवून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो हलायलाही तयार नव्हता. उलटसुलट लॉक फिरवले, कडी पाहिली, हँडल जोरात ओढलं – काही उपयोग नव्हता.

    तिच्या काळजाचा ठोका चुकू लागला…

    “अन्वी!… शेखर!… कुणी आहे का बाहेर?” ती जोरात दरवाज्यावर हात आपटत, हाक मारत होती. पण प्रतिसाद नव्हता… फक्त खोलीच्या AC चा सौम्य आवाज आणि खिडकीबाहेरच्या लाटांचा गुंजारव.

    ती दरवाज्यावर हात आपटतच राहिली… आणि तेव्हाच तिचं अंतर्मन ओरडून सांगत होतं –

    “तुझा विश्वासघात झाला आहे…”

    आराध्याच्या डोळ्यांत भीतीचे सावट दाटून आलं. तिचा श्वासोच्छ्वास जोरात सुरू होता… घाम फुटला होता. आता तिला पक्कं जाणवू लागलं – अन्वीने आपला घात केला होता… त्या भव्य खोलीचा गारवा आता थंडगार फासासारखा वाटू लागला.

    आराध्या दरवाज्यावर हात आपटत होती, पण खोलीतील गूढ शांतता तिला वेढून टाकत होती.

    “कोणी आहे का? मदत करा!” ती पुन्हा पुन्हा ओरडत होती.

    पण उत्तर येईना. तिच्या आवाजाचे प्रतिध्वनी त्या भव्य रूममध्ये पसरत होते, जणू तिच्या भीतीची खिल्ली उडवत होते. ती खिडकीकडे धावत गेली… शांत, अथांग समुद्र… पण आज ते दृश्य अजूनच अस्वस्थता वाढवत होतं. खालचा रस्ता खूप दूर होता – कोणालाही आवाज देणं शक्य नव्हतं…

    अचानक लक्षात आलं – टेबलवर एक फोन ठेवलेला होता! ती धावत गेली. फोन उचलला… पण तो डमी फोन होता – आता आराध्याला पक्कं समजलं – हे ठरवून, नीट आखलेलं सगळं होतं.

    आराध्या पळत दरवाज्याकडे गेली, श्वास फुललेला, मन गोंधळलेलं… तिने दरवाजा  आतून लॉक केला. दाराच्या पलीकडे कोणीतरी होत — तिच्या नकळत हालचाल सुरू झाली होती. ती थरथरत्या हातांनी लॉकवर हात ठेवून उभी होती. मनातच ती म्हणाली, “कुणी आहे तिकडे?”

    आतून कडी लावूनही, बाहेरून ती फिरवण्याचा हलकासा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. कोणी तरी सिस्टमॅटिकली लॉक उघडण्याचा प्रयत्न करत होतं…

    आराध्याला लक्षात आलं – हा कुणी सामान्य माणूस नाही, त्याला माहितीय इथे काय आहे, आणि तो कुठून काय उघडेल!

    ती मागे सरकली… खोलीत काहीतरी हत्यारासारखं शोधू लागली – काही जड वस्तू, काही वापरता येईल असं! एक पितळी शोपीस तिच्या नजरेस पडलं, तिने ते उचलले…

    तेवढ्यात “टक…टक…टक…” करत लॉकवर गती वाढली. आराध्याच्या मनात एकच गोष्ट पक्की होती, ती म्हणजे – धाडस!

    दरवाज्याच्या कडांमधून आता हलकीशी लाइटची रेघ दिसू लागली होती — जणू ते उघडण्याच्या अंतिम टप्प्यात होतं…

    आराध्याचं हृदय धडधडत होतं, पण डोळ्यांमध्ये निर्धार होता… ती सावधपणे चालत गॅलरीपर्यंत आली. समोर समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या गार झुळुकीतही तिच्या अंगावर सरसरून शिरशिरी गेली. वेळ कमी होता. दार उघडण्याचा आवाज अजूनही येतच होता.

    तिने आधी आपली बॅग उचलली, मग सॅंडल्स… एका हातात बॅग, दुसऱ्या हातात सॅंडल्स धरून ती गॅलरीच्या कठड्याजवळ आली आणि गतीने ती वस्तू बाजूच्या गॅलरीत फेकून दिल्या — तिथे एक  खिडकीची स्लायडिंग उघडी दिसली, जिथून आपण आत जाऊ शकतो, असा अंदाज होता… क्षणभर ती थबकली. तिचं संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोरून सरकलं. तिने डोळे मिटले, देवाचं स्मरण केलं – “या धाडसाला तुझा वरदहस्त असू दे…” ती पुटपुटली.

    हेही वाचा –  आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    मग दोन्ही हातांनी कठड्याला धरून ती हलकेच गॅलरीच्या कडेवर चढली. तिचं श्वास घेणंही थांबल्यासारखं झालं होतं. थोडं वाकून, अंग हलवून ती बाजूच्या गॅलरीकडे झुकली. खाली खोल रस्ता दिसत होता… आणि वर ती — एका अवघड निर्णयाचं धाडस करत होती…

    शेवटी, एक क्षण… आणि तिने बाजूच्या गॅलरीकडे उडी मारली…

    आराध्याने उडी घेतली आणि काही क्षण तर वेळच थांबला असावा… तिचं मन, शरीर, श्वास – सगळं एका क्षणात गोठल्यासारखं झालं! तिचं शरीर थेट समोरच्या गॅलरीवर आदळलं – जोरात! सुदैवाने, ती गॅलरीच्या कठड्याला पकडून लटकली होती.,.. खालून गाड्यांचे आवाज तर समोरून समुद्राच्या लटांचा गुंजारव….तिचा हात घसरत होता…

    “देवा… फक्त एक शेवटचा धक्का दे…” ती पुटपुटली आणि दोन्ही हातांनी जोर लावून ती गॅलरीत शिरली. ती धपकन् आत पडली – घामाघूम… धडधडत्या हृदयाने…

    खोली अंधारी होती, पण रिकामी वाटतं होती. दाराच्या फटीतून प्रकाश झिरपत होता. ती उठली, श्वासाची गती कमी झाली… पटकन आपली बॅग आणि सॅंडल्स उचलल्या… तेवढ्यात मागच्या खोलीत – जिथून ती आली होती – मोठा आवाज झाला… कोणीतरी तिच्या मागावर आलं होतं…

    आराध्याचं रक्त गोठलं… “ते मागे आहेत…” ती मनात म्हणाली. ती खोलीत शिरण्यासाठी  रांगतच पुढे सरकत होती… तेवढ्यात गॅलरीतून दोन वेळा आवाज आणि हालचाल जाणवली, त्याची पावलं शांतपणे पडत होती, पण नजरेत शोध होता. त्याने सावकाश पडदे हलवले… आणि क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही…

    तिथे, गॅलरीच्या एका कोपऱ्यात – भिंतीला टेकून – आराध्या बसली होती. पाय पोटाशी ओढून, दोन्ही हात घट्ट पायांना गुंडाळलेले. तिचं शरीर थरथरत होतं. डोळ्यांत भीती ठासून भरलेली होती… आणि चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहात होत्या. तिचे केस चेहऱ्यावर चिकटले होते, ओठ थरथरत होते, आणि डोक्यात एकच विचार – “मी इथून वाचणार आहे का?”

    तो काही क्षण स्तब्ध झाला – त्या दृश्यानेही अस्वस्थ झाल्यासारखा… पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी कुटील स्मितरेषा उमटली.

    “तू इथे कशी? इतक्या उंचावरून  गॅलरीत काय करत आहेस?  एवढं का घाबरतेस?” तो हळूवार आवाजात म्हणाला, पण त्या शांतपणामागचं सावट ती स्पष्ट ओळखू शकली.

    आराध्या काहीच बोलली नाही. फक्त तिचा थरथरता श्वास आणि भीतीने मोठे झालेले डोळे — सगळं सांगत होतं. ती पळून आली होती, पण अजूनही धोका टळलेला नव्हता.

    तो पुढे सरकू लागला… आणि खोलीतला हवेचा प्रवाह अचानक गडद आणि दाट झाला… त्याने क्षणभर तिची अवस्था पाहिली. आराध्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते, ओठ कोरडे पडले होते. तो परत आत वळला — मिनिटभरात एक ग्लास पाणी घेऊन आला.

    “हे घे… पाणी पी आधी,” त्याने सौम्य आवाजात म्हटलं, पण त्याचं मृदू बोलणंही तिला अस्वस्थ करत होतं.

    हात थरथरत असतानाही तिने पाणी घेतलं आणि घोट-घोटाने प्यायला सुरुवात केली. शरीरातील थरथर काहीशी थांबली, पण भीती अजूनही डोळ्यांत स्पष्ट दिसत होती.

    त्याने काही वेळ तिला पाणी प्यायला आणि शांत व्हायला देत फक्त तिच्याकडे पाहात राहिला. मग तो हळूच पुढे आला…

    “चल… इथे बस,” असं म्हणत त्याने तिच्या हाताला अलगद स्पर्श केला. त्या स्पर्शाने आराध्या पुन्हा हलकंसं दचकली, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

    तो तिला आतल्या खोलीत घेऊन गेला, आणि एका सुंदरशा सोफ्यावर बसायला सांगितलं. ती अजूनही सावध होती, कुठलाही आवाज आला की दचकायची…

    तो तिच्यासमोर शांतपणे बसला… पण नजरेत एक वेगळीच उत्सुकता होती… कसली असेल ती उत्सुकता? तिला फसवण्याची की तिला समजून घेण्याची…?

    क्रमशः
    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026 ललित

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026 ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    By प्रणाली मंगेश महाशब्देApril 17, 2026

    रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा… नुकतेच हे गीत…

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 270
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 387
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 560
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026
    Most Popular

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.