Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी

    August 2, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …तेच मातीने माखलेले पाय!
    ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    रेवती निलेश पांडेBy रेवती निलेश पांडेApril 15, 20262 Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मातीने भरलेले पाय, मातीचा सुगंध, लोकांचा कोरडेपणा, लोकांमधील भावनांचा अभाव, वासरहित जीवन, सुगंधरहीत जीवन, लोकांमधील निर्जिवता,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी - (प्रातिनिधीक)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दवाखान्यातून बाहेर पडताना कवीशने एक दीर्घ श्वास घेतला आणि जड पावलांनी तो तिथून निघाला. हातातल्या फाइलमधील कागदावर उमटलेल्या ‘ॲनोस्मिया’ या शब्दाभोवतीच त्याच्या विचारांचे चक्र गरगरत होते… हे सारे घरी जाऊन स्नेहाला कधी सांगतो, असे त्याला झाले होते. त्याने बाजारात एका कोपऱ्यावर गाडी थांबवली आणि स्नेहासाठी तिच्या आवडीचे पेरू विकत घेतले. सवयीप्रमाणे तो पेरू नाकाला लावून बघितला, पण या पेरूचा वास त्याला आला नाही; मात्र त्याला लहानपणी त्याच्या शेतात असलेल्या पेरूंचा तो परिचित सुगंध आठवला. त्याच्या आयुष्यात आता फक्त या ‘गंध-स्मृतीच’ दरवळणार होत्या!

    तो घरी पोहोचला, तेव्हा स्नेहाने हसतमुखाने दार उघडले. कवीशने आणलेले पेरू बघून तिला खूप आनंद झाला. या मुंबई शहरात तिचे डोहाळे पुरवणारे दुसरे होते तरी कोण? कवीशचे लक्ष सोफ्याकडे गेले, तर स्नेहा लोकरीची प्राजक्ताची फुले विणत होती. ती फुले अतिशय सुंदर आणि नाजूक दिसत होती. क्षणभर ती फुले हातात घेऊन त्यांचा वास घ्यावा, असे त्याला वाटले आणि पुन्हा त्याला आपल्या आजाराची आणि फुलांच्या निर्जीवपणाची जाणीव झाली. त्याला स्वतःच्या गावच्या घरच्या परसबागेल्या प्राजक्ताच्या झाडाची आठवण झाली. प्राजक्ताचे फुलं अंगावर पडताना होणारा स्पर्श आणि त्याचा सुगंध याची उपमा दुसऱ्या कुठल्याच गोष्टीला देता येणार नाही, असे त्याला वाटले.

    हेही वाचा – सौंदर्याचा सुवर्णपाश!

    स्नेहाला सुद्धा फुलांची खूप आवड होती. ‘टू बीएचके’ फ्लॅटमध्ये झाडांची हौस कुठे पूर्ण होणार, म्हणून स्नेहाने बाल्कनीत चार-पाच कुंड्या लावल्या होत्या. ती त्यांची मनापासून काळजी घ्यायची. परंतु, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये, “त्या कुंड्यांचे पाणी खाली गळते आणि त्यामुळे खालच्या फ्लॅटधारकाला त्रास होतो,” अशी तक्रार केली होती. त्यामुळे त्या कुंड्या तिथून काढून टाकण्यात आल्या. तसेही कवीशला सोसायटीच्या मीटिंगमध्ये काडीमात्र रस नव्हता. तिथे होणारी भांडणे— कधी पार्किंगमध्ये मुलांच्या खेळण्यावरून, लोकांच्या कुंड्यांवरून, घरात पाळलेल्या प्राण्यांवरून, इतकंच काय तर भाडेकरूंकडे येणाऱ्या पाहुण्यांवरून — अशा कुठल्याही क्षुल्लक गोष्टींवरून तिथे वाद व्हायचे. सोसायटीच्या या अनेक यांत्रिक नियमांमुळे त्याचे मन गुदमरत होते…

    त्याला दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या काकांचे शब्द आठवले. काकांच्या अतिशय शांत असलेल्या कुत्र्याविरोधात तक्रार केल्यानंतर काका हताश होऊन म्हणाले होते, “कवीश, आता नॉन-व्हेज खाणे लोकं सहज स्वीकारतील, परंतु सजीव प्राण्यांवर असणारे प्रेम कुणाला मान्य नाही.”

    एकमेकांशी संबंध नसलेल्या या सगळ्या गोष्टींची आणि विचारांची साखळी का तयार होत होती, हे त्याला कळत नव्हते.

    “काय म्हणाले डॉक्टर?” स्नेहाच्या या प्रश्नाने कवीशची विचारांची साखळी तुटली.

    कवीश काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, “स्नेहा, खरं सांगू का? मला असं वाटतंय की, या जगात सगळेच आजारी आहेत. माझ्या आजूबाजूचे सगळे लोक ‘डेफिशिअन्सी ऑफ इमोशन’ (भावनेचा अभाव) या आजाराने ग्रस्त आहेत. अशा कोरड्या जगात आपण आपल्या बाळाला आणून खरंच चूक तर करत नाही आहोत ना? या विचाराने मी पुरता हादरून गेलो आहे.”

    स्नेहा अवाक् होऊन त्याच्याकडे बघत राहिली. “हे काय बोलतोयस तू कवीश? अरे, तू तुझी सगळी स्वप्नं पूर्ण केलीस. लोकांचं स्वप्न असतं, असं आयुष्य तू जगतोयस. काय कमी आहे आपल्याला? सगळी भौतिक सुखं आहेत आणि आता आपलं बाळ या जगात येतंय… जरा आयुष्याची सकारात्मक बाजू बघ ना! अरे, गंध नाही तर नाही…”

    कवीश गहिवरून म्हणाला, “स्नेहा, गोष्ट फक्त मला वास येत नाही इतकीच नाहीये. तुला सांगू का, मला लहानपणी सगळ्यात जास्त चीड कशाची होती? बाबांच्या मातीने भरलेल्या पायांची! मला ते पाय अजिबात आवडायचे नाहीत. त्याउलट किती स्वच्छ आणि गोरेपान पाय असायचे माझ्या काकाचे! सतत बूट-मोज्यांत असलेले त्यांचे पाय कारमधून उतरताना दिसायचे. मातीत राबणाऱ्या माझ्या बाबांच्या पायांत आणि त्यांच्या पायांत जमीन-अस्मानाचा फरक होता. मी खूप आधीच ठरवलं होतं की, माझ्या पायाला कधी माती लागू देणार नाही. पण आज काय होतंय माहीत आहे? माझ्या स्वप्नात बाबांचे तेच माखलेले पाय येतात. त्यांच्या पायांतून मला मातीचा ओला सुगंध येतो. त्यांच्या कपड्यातून मला आमच्या घरच्या प्राजक्ताचा गंध येतो. हाताला आमच्या गौरी गायीच्या दुधाचा वास येतो.” या सगळ्या यांत्रिक जगात ते एकटेच मला सजीव वाटतात!

    तो पुढे बोलू लागला, “प्रश्न फक्त वासाचा नाहीये स्नेहा… मला असं वाटतंय की मी अनेक निर्जीव वस्तूंमध्ये वावरतोय. मला माझ्या अवतीभवती सजीव गोष्टी हव्या आहेत, ज्यांना जीव असेल, भावना असतील आणि ज्यांना स्वतःचा असा वास असेल! त्यासाठी मी कितीही पैसा खर्च करायला तयार आहे.”

    आणि कवीश एका लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडू लागला…

    हेही वाचा – आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…


    महक

    जब मेरे बाबा मेरी उम्र के थे,
    मैं उनके साथ खेतों की पगडंडियों पर जाता था।
    उनके पैरों से सोंधी मिट्टी की वो आदिम खुशबू आती थी,
    मानो वे खुद इस धरती का एक जीवंत हिस्सा हों।
    जब वे खेत की मुंडेर पर खड़े,
    उस हरसिंगार के पेड़ को दुलार से सहलाते थे,
    तो उनके कपड़ों के रेशों से हरसिंगार की महक छनकर आती थी।
    उनके हाथों से आती थी अमरूद की रसीली सुगंध,
    जब भी वे वृक्षों का ‘फल-रूपी दान’ पाते,
    तो बड़ी कृतज्ञता से उन दरख्तों को नमन करते थे।
    वे सूरज के तेज को और बारिश की बूंदों को नमन करते थे,
    सच मानिए, उनका पूरा व्यक्तित्व ही महकता था।
    पर अब, जब मैं खुद को देखता हूँ,
    तो सोचता हूँ कि मेरे बदन से कैसी खुशबू आती होगी?
    क्योंकि इस मोबाइल, लैपटॉप और नींद भरी दोपहरों,
    इस कार और महँगे फर्नीचर की अपनी कोई खुशबू नहीं होती।
    इन कागजी रुपयों और मशीनों की कोई अपनी महक नहीं होती।

    Avatar photo
    रेवती निलेश पांडे

    विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 8552893399

    Related Posts

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026 ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026 ललित

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026 ललित

    2 Comments

    1. Chala on April 17, 2026 10:54 pm

      लेखिका रेवती यांचे लहानपण नक्की शेतात गेलेले आहे असे वाटते. खूप छान

      Reply
      • Pande revati on April 22, 2026 10:07 pm

        खूप धन्यवाद 😊😊

        Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    फ्रेंडशिप डे

    By सतीश बर्वेAugust 2, 2026

    ‘‘फ्रेंडशिप डे’पर्यंत तरी माझा श्वास चालू रहाण्यासाठी प्लीज प्रार्थना करा देवाजवळ सगळ्यांनी!’ रविवारी सकाळी वैजूचा…

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    July 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी

    August 2, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 381
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 516
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 822
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी

    August 2, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 02 ते 08 ऑगस्ट 2026

    August 2, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.