मागील लेखात आपण सूर्यनमस्कार अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. योगाभ्यासातील आसने ही अष्टांग योगातील तिसरी पायरी आहे. योगासने हा योगाभ्यासातील गाभा आहे.
योगासन म्हणजे काय?
स्थिर-सुखमासनम् हा योगासनाचा मूलमंत्र आहे. योगाच्या भाषेत ज्या शारीरिक स्थितीमध्ये आपण स्थिरता व सुखकारकता अनुभवतो, त्यास आसन म्हणतात.
योगासनांसंबंधी महत्त्वाचे मुद्दे
- योगासने अभ्यास रिकाम्या पोटी करणे आवश्यक आहे. यासाठी सकाळची वेळ योग्य आहे. पण सकाळी न जमल्यास सायंकाळी रिकाम्या पोटी योगासने अभ्यास करावा.
- जागा स्वच्छ, मोकळी आणि हवेशीर असावी.
- शारीरिक हालचाली सुकर होण्यासाठी पोषाख सैलसर आणि सुटसुटीत असावा.
- योगासने अभ्यास करताना हालचाली संथ, सावकाश आणि सुखकारक असाव्यात.
- योगासने अभ्यास क्षमतेनुसार करावा.
- योगासने अभ्यासानंतर विश्रांतीसाठी विश्रांतीदायक आसने घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शवासन, मकरासन, तडागासन इत्यादी.
हेही वाचा – भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
निवडक उपयुक्त योगासने
मानसिक आरोग्य संवर्धनासाठी पुढील निवडक उपयुक्त आसनांचा समावेश दैनंदिन योगाभ्यासात आवर्जून करावा.
- शवासन / चैतन्यासन
- तडागासन
- मकरासन
- स्वस्थ बैठक
- पद्मासन
- वज्रासन
- भद्रासन
- शशांकासन
- ताडासन
- ध्रुवासन
- शरणागत मुद्रा
योगासने अभ्यासाचे मानसिक आरोग्य लाभ
वरील सूचीतील निवडक उपयुक्त आसनांच्या अभ्यासातून मिळणारे विविध मानसिक आरोग्य लाभ साररूपाने पुढील प्रमाणे आहेत.
- मन स्थिर, शांत आणि प्रसन्न होते.
- मानसिक संतुलन सुधारते.
- मनाची एकाग्रता वाढते.
- मानसिक ताणतणाव कमी होण्यास साहाय्य लाभते
विविध मानसिक व्याधी-विकारांवर उपयुक्त अभ्यास आहे. दैनंदिन योगाभ्यासात सूर्यनमस्कार अभ्यास झाल्यावर योगासने अभ्यासाचा समावेश आवर्जून करावा. योगासनांच्या नियमित अभ्यासातून साधकास निश्चितच शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभते.
हेही वाचा – सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
योगाभ्यासातील उपयुक्त योगासनांच्या कृती आणि फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.
आपण पुढील लेखात योगाभ्यासातील अशाच एका अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत.
क्रमश:
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हाटसॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


