Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मायक्रोवेव्ह येई घरा…!!
    ललित

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरApril 10, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, मायक्रोवेव्हची क्रेझ, मायक्रोवेव्ह येती घरा, मायक्रोवेव्हची चर्चा, अडगळीत पडलेला मायक्रोवेव्ह, मायक्रोवेव्हची चर्चा, मायक्रोवेव्हमधले बिट्टे, बिट्ट्यांची कहाणी, नागपंचमीतील बिट्टे
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी (प्रातिनिधीक)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा फटका भारताला बसला आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागल्याने लोकांनी इंडक्शन, इलेक्ट्रिक कूकर, मायक्रेवेव्ह तातडीने विकत घेण्यास सुरुवात केली. परंतु आता तर युद्धविराम झाले तर, या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुढे वापर झाला तर बरं, नाहीतर या वस्तू अडगळीत जातील किंवा त्यांचा गरजेनुसार उपयोग केला जाईल, असं वाटतं. कारण, माझ्यासारख्या गृहिणींना अजूनही गॅसवरच स्वयंपाक करायची सवय आहे आणि पोहे, रवा, शेंगदाणे यासारखे पदार्थ भाजण्याकरिता मला गॅसवर कढईत हे पदार्थ भाजायला बरे वाटतात… माझ्या मते शेवटी भारतीय गृहिणींना त्यांच्या किचनमध्ये अनेक पदार्थ वेगवेगळ्या तापमानावर करायची सवय असते; फार क्वचित त्या मायक्रोवेव्ह किंवा ओटीजीचा वापर करताना दिसतात. परंपरागत पदार्थ तयार करण्याची पद्धत तसेच स्वयंपाकातील समृद्ध अनुभव आणि आत्मविश्वास या बळावर त्या कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापराशिवाय, वातावरणातील तापमानानुसार विविध पदार्थ झकास बनवू शकतात, हे 100% खरं! परंपरेनुसार बनलेल्या पदार्थांची चव ही नवतंत्रज्ञानावर आधारित मशीन्सवर बनलेल्या पदार्थांपेक्षा नेहमीच सरस ठरलेली आहे, असं मला वाटतं.

    साधारण तीसेक वर्षांपूर्वी मायक्रोवेव्ह आणि ओटीजीचे खूप फॅड आले होते. घराघरामध्ये ओव्हन, मायक्रोवेव्ह, ओटीजी असे विषय उत्सुकतेने चघळले जात होते… मध्यमवर्गीय लोकांना सर्वच गोष्टीचं भारी कौतुक! एखादीकडे मायक्रोवेव्ह किंवा ओटीजी आला तर ती बाकीच्यांशी एकदम फटकून वागत असे, भलेही तिला यामध्ये तयार होणारे पदार्थ कसे करतात ते माहीत नसायचं! परंतु आपल्याकडे ओव्हन किंवा मायक्रेवेव्ह आहे, म्हणजे आपण इतरांपेक्षा जरा वरचढ आणि श्रीमंत आहोत, याचा तिला गर्व वाटायचा आणि ती त्याचं तोऱ्यात राहायची…

    आपल्याकडे आता तेल, तूप कसं कमी लागतं, गॅसची बचत होते, शिरा- लाडवाकरिता रवा भाजण्यासारखी कठीण आणि वेळखाऊ कामं अन् तो भाजता भाजता हातांना कळ लागते… अशी कामं हा मायक्रोवेव्ह कसा चुटकीसरशी संपवतो, याचे किस्से ती मायक्रोवेव्हवाली बाई इतर बायकांना रंगवून सांगायची. त्यामुळे आपल्या घरी मायक्रोवेव्हसारखा ‘सखा’ असावा हे त्या काळात सगळ्याच बायकांना वाटत असे.

    हेही वाचा – घरघंटीची उपयुक्तता नेमकी किती?

    आता त्या काळात आजूबाजूला असे ओव्हनमय भक्तीचे वातावरण असताना तसेच मायक्रोवेव्हचे रेकॅार्डब्रेक किस्से कानावर पडत असताना ओव्हन, मायक्रोवेव्ह आपल्याही घरात असायला हवा, अशी प्रबळ इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आणि मी नवऱ्याच्या मागे लागली की, मला मायक्रोवेव्ह हवा आहे… तो आपल्या घरात कसा महत्त्वाचा आहे वगैरै वगैरे सांगता सांगता आणि नवऱ्याचे मन वळवता वळवता महिना गेला, पण माझ्या नवऱ्याला का  ते माहीत नाही, परंतु फुल्ल कॉन्फिडन्स होता की, हा मायक्रोवेव्ह घेतला तरी तो काही फार दिवस कामात येणार नाही, एक दिवस तो अडगळीत जाणार हे निश्चित! म्हणूनच तो ही वस्तू घ्यायला कां कू करत होता. परंतु माझा आपला सारखा त्याच्यामागे तगादा सुरू होता. त्यामुळे कुरकुरत का होईना, त्याने एकदाचा मायक्रोवेव्ह घ्यायला परमिशन दिली आणि मग काय, त्यात चटकन तयार होणारे विविध पदार्थ माझ्या मनात मोरासारखे थुईथुई फेर धरत नाचु लागले! त्यावर्षी श्रावण महिन्याच्या काही दिवस आधी मायक्रोवेव्ह माझ्या घरात विराजमान झाला. त्याच्या कौतुकात शेजारणी-पाजारणी घरी येऊन कांदाभजी आणि चहाची पार्टी घेऊन गेल्या. मला त्यातील काहीजणींनी खूप महत्त्वाच्या टिप्सपण दिल्या आणि मायक्रोवेव्ह करता काचेची बोरोसिलची भांडी किती आवश्यक आहे, तेपण सांगितलं. त्यानुसार बोरोसिलचे बाऊल्स,  काचेचा रेक्टॅन्गल आकाराचा ट्रे आणि अजून एखाददोन छोट्या-मोठ्या प्लेट्स तसेच बाऊल्सची खरेदी झाली.

    कोणीतरी सुचवलं म्हणून मुद्दाम पुस्तकांच्या दुकानात जाऊन मायक्रोव्हेवमध्ये तयार होणाऱ्या रेसिपीजचे एक पुस्तकपण घरी घेऊन आले. इतकी सगळी खरेदी करून दमलेल्या माझ्या चेहऱ्याकडे माझा नवरा मात्र अजूनही साशंक नजरेने पाहात होता, कारण त्याला त्याचा अंदाज चुकायचा नाही, हे पक्कं ठाऊक होतं… म्हणूनच त्याच्या चेहऱ्यावर त्या वेळेस संमिश्र भावना होत्या.

    पहिल्यांदा मी मायक्रोव्हेवमध्ये पोहे, उपमा, शिरा,  चिवड्याकरिता पातळ पोहे भाजणे वगैरे अशा सोप्या, छोट्या गोष्टी करुन बघितल्या. त्या छान जमल्या… त्यामुळे माझा आत्मविश्वास बळावला. त्यानंतर मुलांनी म्हटलं की, पाव बनवून पाहूया! तेदेखील ड्राय इस्ट, बेकिंग सोडा वगैरे टाकून छान जमले. मला आता या रेसिपीज करण्यात विश्वास वाटायला लागला होता. मी हळूहळू मायक्रोवेव्ह रेसिपीज करण्यात तरबेज होते आहे, असं वाटत असतानाच त्या वर्षाचा श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी आला आणि नागपंचमीला बहुतेक सगळे पदार्थ फक्त वाफवलेले किंवा तळलेले, उकडलेले पदार्थ खायचे असतात, हे समीकरण घरात पक्कं असतं आणि अशातच स्वयंपाकघरात मायक्रोवेव्ह असताना नागपंचमीला उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि पुरी असा दरवेळचा बेत न करता, बिट्ट्या (बाफले), वांगी- बटाट्याची रस्सा भाजी, साधं वरण, तूप- गुळ आणि शिरा असा स्वयंपाक करायचा ही आयडीया मुलांच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडली आणि त्याला जोरदार समर्थन त्यांच्या वडिलांचे मिळाले; कारण एक तर बिट्ट्या आणि वांग्याची भाजी हा सर्वांचा आवडता मेन्यू आणि त्यानिमित्ताने त्या दिवशी माझ्याही मायक्रोवेव्ह पाककलेची परीक्षा होणार होती. मेन्यू निश्चित झाला, आनंदाचे भरते असल्यामुळे मी आदल्याच दिवशी रात्री वांगी चिरून टप्परवेअरच्या डब्यात भरुन ठेवली, मसाले वाटून तेही बरणीत भरून ठेवले. आता काय नागपंचमीची पूजा झाली की, लगेच स्वयंपाक होणार होता…

    मी त्या दिवशी सकाळीच पटापट सगळं आवरलं, पहिले मायक्रोवेव्हमध्ये रवा भाजून शिरा करून घेतला. कारण, तो मला छान जमत होता, त्या दिवशीपण छान मऊसूत झाला होता. एकीकडे गॅसवर कुकरला वरण-भात लावला आणि दुसरीकडे वांगी-बटाट्याची भाजी करून घेतली. भाजीचा सुंगंध तर सर्व घरात दरवळत होता. चटणी वगैरे तयारचं होती. आता मायक्रोवेव्हमध्ये बिट्टया केल्या की, माझं कार्य ‘सुफल संपूर्ण’ होणार होतं. माझा नवरा डायनिंग टेबलवर शांतपणे बसून माझ्या सर्व हालचाली आणि लगबग बारकाईने निरखत होता. तुपाचे मोहन वगैरे टाकून घट्टसर मी बिट्ट्यांकरिता कणिक मळून घेतली. मायक्रोव्व्ह प्री-हिट होण्यासाठी सुरू करून ठेवला. तोपर्यंत कणकेचे गोल गोल आकार करून बिट्ट्या तयार करून घेतल्या. आता मायक्रोवेव्ह चांगला तापला होता… त्याचं टायमर सेट केलं आणि काचेच्या ट्रेमध्ये माझ्या सुंदर आकाराच्या बिट्ट्या भाजायला ठेवल्या. तो ट्रे आतमध्ये गरगर गिरक्या घेत फिरू लागला. बिट्ट्यापण त्याच्यासोबत गरगरा फिरत होत्या…  वेळ संपल्यावर मायक्रोवेव्हने बीप वाजवून बिट्ट्या झाल्याचे सांगितले. मी ट्रे काढून बघितला तर, कसचं काय बिट्ट्यांचा रंग तसाच पांढरा फटफटीत होता! त्यांना लालीमा चढलीचं नव्हती!! मी थोडी साशंक झाले की, आपलं काही चुकलं तर नाही ना? नवरा मिश्कीलपणे माझी कसरत पाहात होता. मी परत टायमर सेट करून त्या कच्च्या बिट्ट्यांना मायक्रोव्हेवच्या तोंडात ढकललं. थोड्या वेळाने पुन्हा बीप वाजला परंतु बिट्ट्या याहीवेळेस वरून पांढऱ्या फटफटीत… आता मात्र माझी दणाणली, कारण बिट्ट्या काही केल्या आपला रंग बदलायला तयार नव्हत्या…

    तिसऱ्यांदा त्या बिट्ट्यांना मायक्रोवेव्हमध्ये टाकलं, टायमर सेट केला आणि त्या तयार होण्याची वाट बघत बसले. इकडे भुकेची वेळ झाल्यामुळे पोट्टे कोकलायला लागले होते, माझी ती केविलवाणी धडपड पाहून माझ्या नवऱ्याला काय वाटले कुणास ठाऊक, तो मला म्हणाला, “मी संध्याकाळसाठी इडलीचा घोळ घेऊन येतो, तोपर्यंत तुझ्या बिट्ट्या तयार होतील, अशी आशा करू या!” नवरा इडलीचा घोळ आणायला घराबाहेर पडला. तो परत येईपर्यंत इकडे टायमर संपला आणि मायक्रोव्हेवने परत बीप वाजवला. मी बिट्ट्या पाहिल्या तर काय, त्या तशाच पांढऱ्या फटफटीत ते पाहून मला हसावं का रडावं, ते कळत नव्हतं.

    हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!

    तोपर्यंत नवरा परत आला होता. त्याने शेवटी त्यातील एक बिट्टी फोडून पाहिली तर काय, अरे देवा! वरून गोरीगोमटी दिसणारी बिट्टी आतून काळी कुळकुळीत झाली होती. बाकीच्या बिट्ट्याही तशाच काळ्या ठिक्कर पडल्या होत्या आणि दगडासारख्या कडक झाल्या होत्या…! नशीब माझं की, माझा नवरा खूपच समजूतदार आणि शांत आहे म्हणून नाही तर, रागाच्या भरात जर त्याने मला ती बिट्टी फेकून मारली असती, तर त्या दिवशी माझं डोकंच फुटलं असतं. बिट्टयांची ती अवस्था पाहून माझा नवरा आणि पोरं फिदफिदी हसायला लागले, मला तर खूप रागही येत होता अन् नवरा आणि पोरं उपाशी राहिलेत म्हणून वाईटदेखील वाटत होतं. बरं, त्या बिट्ट्या गायीला खायला दिल्या तर तिनेही तोंड फिरवले!

    आता काय करावं, या संभ्रमात मी असताना माझ्या नवऱ्याने इडलीच्या घोळाची पिशवी माझ्यासमोर धरली. ती पाहून माझे डोळे आनंदाने लकाकले, कारण त्यामुळे माझं काम सुकर झालं… हे म्हणजे ‘बुडत्याला काडीचा आधार’ तसचं काहीसं झालं… मी लगेच इडली-कूकरला इडल्या लावून वरणाचे पटकन सांबार केले आणि मुलांची भूक शांत केली. सोबतीला शिरा होताच. वांगी बटाट्याची भाजी फ्रीजमधे ठेवून दिली.

    बहुदा त्या दिवशी नागपंचमीला मी नेहमीचा स्वयंपाक न करता जरा वेगळा पदार्थ केला म्हणून नागदेवतेला राग आला असावा का? हा बालिश विचारदेखील त्यावेळी मनात आला होता. परंतु त्या दिवसापासून मायक्रोवेव्ह मी थोडा अडगळीतच ठेवला आहे… आता मायक्रोवेव्हचा वापर मी फक्त काही ठराविक पदार्थ जे माझ्या आवाक्यात आहेत, ते करण्यापलीकडे फारसा करत नाही. त्यापेक्षा मला आपली कढई, कूकर आणि गॅस बरे वाटतात. तर अशी ही माझी बिघडलेल्या बिट्ट्यांची कहाणी सुफळ संपूर्ण!!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026 ललित

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026 ललित

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    By प्रणाली मंगेश महाशब्देApril 10, 2026

    “ए आई कसला मस्त वास येतोय गं भाजीचा!” कालच माहेरी आलेली मीना स्वयंपाकघरात आली. “ए…

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026

    सोनाराने कान टोचताच, नीरज…

    April 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 546
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Most Popular

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.