आम्ही होमिओपॅथी अभ्यासक्रमाला असताना ॲनॉटॉमी… शरीर रचनाशास्त्र शिकताना, विशेषत: बोन सेटवर मसल अटॅचमेंट अभ्यासताना ओरिजीन… इन्सर्शन… नर्व्ह… सप्लाय… ॲक्शनचा अभ्यास करत असू. त्यातूनच फ्लेक्शन… दोन पृष्ठ भागांनी जवळ येणे… एक्सेटेंशन… दूर जाणे… असा अभ्यास असायचा… सोप्या भाषेत गुडघा फोल्ड करणे फ्लेक्शन आणि सरळ करणे एक्स्टेंशन… असं प्रत्येक सांध्याचं….तर असो. आपल्या पोटरीखाली घोडशीर म्हणतात, ते टेंन्डो एकियालीस… (ग्रीक योद्धा एकियालीसची (Achilles) घोडशीर कापली आणि तो युद्धात मेला म्हणून हे बारसं!)
तसेच गुडघ्याला समोरून दोन स्नायू बंधनं असतात, त्यांना ए.सी. एल. (anterior crucial ligament) म्हणतात. माझा भाऊ पपू डॉक्टर आहे. एकदा बॅडमिंटन खेळतांना अचानक कट् असा आवाज आला आणि त्याला पायावर उभेच राहता येईना. अस्थिरोग तज्ज्ञांनी टेंन्डो एकियालीस इन्जुरी निदान केलं. प्लास्टर केलं. विश्रांती सांगितली…
हेही वाचा – सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!
आता तो डॉक्टर असल्याने, क्रॅक एन्ड रिट्रॅक्ट होतील आणि जुळणारच नाही, असं त्याचे मत होते. पण तरीही उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी वाट बघण्याचा सल्ला दिला. हालचाली मर्यादित केल्या. दोन-तीन महिन्यांनी तो पूर्ण नॉर्मल झाला…
असं झालंच कसं…
स्थूलता, व्यवसायात बसून काम करणे अधिक, सतत एसीचा वापर, आहारात चविष्टपणासाठी मिठाचा वापर, ॲस्पिरिन आणि अन्य औषधांचा अपरिमित असा वापर… अशी अनेक कारणे आजाराला पूरक ठरली… नंतर योग्य उपचार, संयम आणि पथ्य यामुळे पुन्हा त्याला आरोग्य मिळाले.
शरीर स्वत:च सुधारण्यासाठी अनाकलनीय असे पूरक बदल घडवून आणत असते. डॉ. रवी बापट यांच्या ‘के. ई. एम. वॉर्ड नं. 5’मध्ये सुद्धा अशा रिट्रॅक्शनचा उल्लेख आहे.
हेही वाचा – सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


