Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मार्च 2026

    March 30, 2026

    राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    March 30, 2026

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, March 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मार्च 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 30, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 30 मार्च 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 09 चैत्र शके 1948; तिथि : द्वादशी 07:09; नक्षत्र : मघा 14:47;
    • योग : शूल 16:50; करण : कौलव 18:59;
    • सूर्य : मीन; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:36; सूर्यास्त : 18:51;
    • पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    सोमप्रदोष

    अनंग त्रयोदशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिन विशेष

    कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके

    टीम अवांतर

    प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांचा जन्म 30 मार्च 1942 रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे झाला. काव्यलेखनापासून त्यांची साहित्यिक वाटचाल सुरू झाली. सत्यकथा या मासिकात  त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती सत्यकथेत छापून आलेल्या ‘योगभ्रष्ट’ या दीर्घकाव्यामुळे.

    योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शुन:शेप, चित्रलिपी हे त्यांचे काव्यसंग्रह असून यात्रा-अंतर्यात्रा, माल टेकडीवरून हे त्यांचे ललित लेखन प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय, अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या आहेत. तर, सर्वत्र पसरलेली मुळे हे दीर्घ काव्य देखील‌ त्यांनी  लिहिले.

    निवडक सदानंद रेगे, शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश, वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश यासारखे साहित्य त्यांनी संपादित केले. त्यांच्या योगभ्रष्ट या काव्यसंग्रहाचे टेररिस्ट ऑफ द स्पिरिट या नावाने इंग्रजीत अनुवाद झाला आहे. याखेरीज चित्रकलेचा छंद देखील त्यांनी जोपासला.

    हेही वाचा – राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की

    डहाके यांना 1981 तसेच 1987 साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार, गंगाधर गाडगीळ पुरस्कार. महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार,  विदर्भ साहित्य संघाचा “जीवनव्रती” पुरस्कार, ‘चित्रलिपी’ या काव्यसंग्रहासाठी 2009 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार, मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानतर्फे ‘शांता शेळके’ पुरस्कार, कविवर्य दामोदर अच्युत कारे पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार याशिवाय 2019 मध्ये जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय 2012 रोजी चंद्रपूर येथे झालेल्या 85 व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. परिस्थिती तुमच्या बाजूने असेल, दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल, व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होईल. हाती घेतलेल्या सगळ्या कामांमध्ये यश मिळेल. मानसिक स्वास्थ्यामुळे आरोग्य सुधारेल.

    वृषभ – आजचा दिवस थोडा खर्चिक असू शकतो. जोडीदारासोबत खरेदीला गेल्याने बजेटवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे वैवाहिक जीवनात हलका तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या, आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवा, कारण तो खिशाला भार ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल, कामे वेळेवर पूर्ण होतील. पण अतिआत्मविश्वास टाळा.

    मिथुन – आर्थिकदृष्ट्या, आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी आव्हाने कमी असतील आणि तुमची कामगिरी चांगली राहील. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकतो. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक सलोख्याचे होईल.

    कर्क – आजचा दिवस सामान्य असला तरी व्यावसायिकांसाठी खूप अनुकूल आहे. घरात मालमत्ता खरेदी विक्रीसंबंधी चर्चा होऊ शकते, ज्याचा भविष्यात फायदा होईल. करिअरच्या दृष्टीने चांगला दिवस आहे; तुमच्या मेहनतीला यश मिळेल. वैयक्तिक आयुष्य समाधानकारक आणि सुखद राहील. आज आरोग्य सामान्य असेल. पाणी मात्र पुरेसे प्यायले जात आहे, याकडे लक्ष द्या.

    सिंह – आज परदेशातून एखादी चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या निमित्ताने लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मात्र विरोधकांपासून सावध रहा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

    कन्या – तणावाला तुमच्यावर स्वार होऊ देऊ नका, अन्यथा त्याचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. आत्मविश्वासाने काम करा, यश मिळेल. मानसिक शांती टिकवण्यासाठी योग आणि ध्यानाचा सराव करा. स्थिर आर्थिक परिस्थिती टिकवण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आणि सासरच्या मंडळींकडून पाठिंबा मिळेल.

    तुळ – आजचा दिवस आनंदाचा आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची किंवा व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा मिळेल. जोडीदार तुमच्या कामात मदत करतील आणि त्यांचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. वैयक्तिक आयुष्यात प्रेमाचा वर्षाव होईल. व्यवसायात वाढ होईल, ज्यामुळे आर्थिक लाभ शक्य होईल.

    वृश्चिक – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. पैसे उधार घेणे टाळा, कारण त्यामुळे भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. मानसिकदृष्ट्या खंबीर रहाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. मात्र आज तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा.

    धनु – आज जोडीदाराकडे मनातील भावना व्यक्त करू शकता. संततीकडून एखादा सुखद धक्का मिळू शकतो. उत्पन्नातील वाढ तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करेल. नोकरदार जातक नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात, जे भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. तब्येतीची काळजी घ्या, बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा.‌

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    मकर – मालमत्तेसंबंधी महत्त्वाची बातमी मिळू शकते. घर खरेदी करण्याचा बेत यशस्वी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी निर्भयपणे तुमची मते मांडाल. त्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. कौटुंबिक समन्वय उत्कृष्ट राहील आणि आईकडून तुमच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्यही चांगले राहील.

    कुंभ – आज आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे जोखमीचे निर्णय घेऊ शकाल. मात्र गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. जोडीदारासोबत अहंकारामुळे संघर्ष होऊ शकतो;  त्यामुळे शांत राहा. इतरांसोबतच्या नात्यांमध्ये देखील अहंकार आड येऊ देऊ नका. सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने कामात चांगली कामगिरी कराल. सांघिक कार्यामुळे ध्येये साध्य करण्यास मदत होईल.

    मीन – आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. संपत्तीविषयक योजनांमध्ये किंवा मोठ्या पॉलिसींमध्ये गुंतवणूक करू शकता. नशिबाची देखील मोठी साथ मिळेल, त्याने समस्या सुटतील. व्यवसायात अनुकूलता राहील, नवीन संधी निर्माण होतील. हातात पुरेसा पैसा येईल, त्यामुळे बचत वाढेल. कुटुंब आणि जोडीदारासोबत काही आनंदाचे क्षण घालवाल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 29 मार्च ते 04 एप्रिल 2026

    March 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मार्च 2026

    March 28, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 29 मार्च ते 04 एप्रिल 2026

    By प्राजक्ता काथेMarch 29, 2026

    मेष या आठवड्यात मनःशांती मिळेल. कामाच्या बाबतीत नोकरदारांची धावपळ होईल. जे काम ‘नंतर बघू’ म्हणून…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मार्च 2026

    March 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मार्च 2026

    March 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मार्च 2026

    March 30, 2026

    राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    March 30, 2026

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 29 मार्च ते 04 एप्रिल 2026

    March 29, 2026

    Dnyaneshwari : प्रभु आघवेनि येणें जन्में, जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें…

    March 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 251
    • अवांतर 178
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 367
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 188
    • मैत्रीण 17
    • ललित 518
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn