Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    March 28, 2026

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, March 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मार्च 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 28, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 28 मार्च 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 07 चैत्र शके 1948; तिथि : दशमी 08:45; नक्षत्र : पुष्य 14:49;
    • योग : सुकर्मा 20:05; करण : वणिज 20:13;
    • सूर्य : मीन; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:38; सूर्यास्त : 18:50;
    • पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिन विशेष

    आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की

    टीम अवांतर

    आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा जन्म 28 मार्च 1868 रोजी रशियातील निझ्निनॉव्हगोरॉड येथे झाला. त्यांचे मूळ नाव होते अल्यिक्स्येई मक्स्यीमव्ह्यिच प्येश्कॉव्ह. लहानपणीच आईवडील वारल्यामुळे वयाच्या आठव्या वर्षापासून स्वतःचे पोट भरण्यासाठी त्यांना धडपड करावी लागली. मिळतील ती कष्टाची कामे करीत ते रशियाभर हिंडले आणि त्यामुळे रशियातील श्रमिकांच्या दुःखांशी त्यांचा जवळून परिचय झाला. नोकरीत मारपीट आणि मानहानीही त्यांना सोसावी लागली. या कडवट अनुभवांमुळेच त्यांनी  गॉर्की (कटू किंवा दुःखी) हे टोपणनाव घेतले. त्यांचे नियमित शालेय शिक्षण थोडेच झाले पण वाचन मात्र अफाट होते. शिकण्याचा तेवढा एकच मार्ग त्यांना उपलब्ध होता.

    ‘Makar Chudra’ ही कथा लिहून त्यांनी लेखनास सुरुवात केली. प्रारंभीच्या कथांमध्ये त्यांनी समाजाच्या खालच्या थरातील उनाड, भटके, गुन्हेगार आदींचे सहानुभूतिपूर्वक चित्रण केले. हे लोक शूर आणि ध्येयनिष्ठ असतात ही त्यांची धारणा होती. त्यानंतरच्या काळातल्या त्यांच्या कथा भौतिकवादी आहेत. अपवाद फक्त ‘Dvadtsat shest i odna’  (ट्‌वेंटीसिक्स मेन अँड अ गर्ल’) या सुप्रसिद्ध कथेचा आहे. ही प्रेमकथा होती.

    हेही वाचा – महालक्ष्मी सरस… ग्रामीण जिद्दीची अनोखी गाथा!

    1899 ते 1910 या काळात गॉर्की यांनी कथांबरोबरच काही कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. Mat (द मदर) ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी याच काळातली. मराठीत आई  या नावाने ही कादंबरी विनायक महादेव भुस्कुटे यांनी अनुवादित केली आहे. याशिवाय Na dne (लोअर डेप्थ्‌स) हे विख्यात नाटक त्यांनी याच काळात लिहिले. 1913 च्या सुरुवातीपासूनच गॉर्की यांनी आपले त्रिखंडात्मक आत्मचरित्र — Detstvo (चाइल्डहूड), V Iyudyakh (इन द वर्ल्ड) आणि Moi Universitety (माय युनिव्हर्सिटीज) लिहिण्यास सुरुवात केली होती.

    1932 मध्ये सोव्हिएट साहित्यिकांच्या संघटनेचा पहिला अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याच सुमारास त्यांनी साहित्यातील ‘समाजवादी वास्तववादा’ची घोषणा केली. समाजवादी वास्तववाद हे सोविएट साहित्यिकांचे वाङ्‌मयीन तत्त्वज्ञान होऊन बसले. 18 जून‌ 1936 रोजी लेनिनग्राड येथे त्यांचे‌ निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज पदोन्नतीच्या शक्यतेसह चांगल्या नोकरीची एखादी संधी देखील मिळू शकते. कौटुंबिक व्यवसायात काही तोटा होऊ शकतो, परंतु काळजी करण्याची गरज नाही. कामात समर्पण आणि कठोर परिश्रमाने पूर्णपणे गुंतून जाल, ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतील. मुलांच्या संगतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल.

    वृषभ – आजचा दिवस जीवनमानात सुधारणा घडवून आणणार आहे. कामाच्या ठिकाणी एखादे काम पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागू शकते. आज सुग्रास भोजनाचा  आनंद घ्याल, पण पोटाच्या किरकोळ समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. घरासाठी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी होऊ शकते.

    मिथुन – आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या खूप चांगला असेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात, तुम्हाला कामाच्या  नवीन कल्पनाही सुचतील. मात्र कोणत्याही अनावश्यक किंवा क्षुल्लक बाबींवर मत प्रदर्शन टाळणेच उत्तम. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदार प्रत्येक पावलावर तुम्हाला साथ देईल.

    कर्क – आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असू शकतो. कामात बदल करण्याचा विचार कराल, पण सध्या तो निर्णय फारसा फायदेशीर ठरणार नाही. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. ते तुम्हाला काही उपयुक्त व्यावसायिक सल्ला देऊ शकतील. सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार टाळणे शहाणपणाचे ठरेल.

    सिंह – आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तुमची काही खास लोकांशी भेट होऊ शकते, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. मात्र बोलण्यात संयम राखणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून बोलणी खावी लागल्याने तुम्ही थोडेसे दुखावले जाऊ शकता, ज्याने कामातील रुची कमी होण्याची शक्यता आहे.

    कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यग्र असेल. एकाच वेळी अनेक कामे हाती घेतल्याने थोडी चिंता आणि ताण निर्माण होऊ शकतो. काही जातक मित्रांसोबत एक छोटी पार्टी किंवा गेट-टुगेदर आयोजित करू शकतात. घाईघाईने निर्णय घेणे टाळा, कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होऊ शकतात. व्यावसायिक निर्णयदेखील काळजीपूर्वक घ्यावे लागतील.

    तुळ – आज विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही संयमाने परिस्थिती हाताळाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. मात्र एखादे काम पूर्ण होण्यापूर्वीच बिघडू शकते, त्यामुळे एकाग्रतेने काम करणे महत्त्वाचे आहे. कुटुंबात एखाद्या मंगल प्रसंगाचे आयोजन केले जाऊ शकते, ज्यामुळे सर्वजण व्यग्र राहतील.

    वृश्चिक – आजचा दिवस प्रगतीचा मार्ग खुला करेल. एकामागून एक चांगल्या बातम्या ऐकून आनंद होईल. व्यावसायिक योजनांबाबत निष्काळजीपणा दाखवू नका. जुन्या समस्यांपासून दिलासा मिळू शकतो. आज स्वतःसाठी नवीन कपडे किंवा नवीन गॅझेटची खरेदी करू शकता. पण त्याचबरोबर तब्येतीची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ खायचे टाळा.

    धनु – आज बजेटकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कुठे पैसे अडकले असतील, तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक गोड होतील. पालकांशी एखाद्या कौटुंबिक विषयावर चर्चा करावी लागू शकते. व्यवसायाशी संबंधित प्रवासादरम्यान महत्त्वाची माहिती मिळू शकते. लांबच्या प्रवासाचे नियोजन करत असाल, तर पालकांची परवानगी घेणे उत्तम राहील.

    हेही वाचा – आराध्याविरोधात निशा अन् माधवने कट रचला, पण

    मकर – व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. संततीकडून अपेक्षा पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आज महत्त्वाची माहिती इतरांना सांगणे टाळा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सुटू शकतात. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.

    कुंभ – तुएखादे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल, तर ते पूर्ण करणे आज थोडे कठीण जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण संयम ठेवा. कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. वेळेचा सदुपयोग करणे खूप महत्त्वाचे असेल. कार्यालयातील जबाबदारी मोठ्या शिताफीने पार पाडाल.

    मीन – आध्यात्मिक कार्यांतून आदर आणि मान्यता मिळू शकेल. सभोवतालच्या लोकांना समजून घेणे आणि छुप्या प्रतिस्पर्ध्यांना ओळखणे आवश्यक आहे. कोणाबद्दलही मत्सर किंवा द्वेष बाळगणे टाळा. जोडीदार प्रत्येक पावलावर तुम्हाला साथ देईल, त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करणे महत्त्वाचे ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मार्च 2026

    March 27, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 29, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 मार्च 2026; वार : रविवार भारतीय सौर : 08…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मार्च 2026

    March 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 25 मार्च 2026

    March 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 29 मार्च 2026

    March 29, 2026

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    March 28, 2026

    भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 28, 2026

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026

    कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…

    March 28, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनें गाये…

    March 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 250
    • अवांतर 177
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 365
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 187
    • मैत्रीण 17
    • ललित 517
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn