गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 19 मार्च 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 28 फाल्गुन / चैत्र शके 1948; तिथि : अमावस्या 06:53, प्रतिपदा 28:52; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 28:04;
- योग : शुक्ल 25:16; करण : किंस्तुघ्न 17:56;
- सूर्य : मीन; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:45; सूर्यास्त : 18:48;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण;
- संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
गुढीपाडवा
चैत्र मासारंभ सकाळी 06:53 नंतर
चैत्र नवरात्र आरंभ
श्री शालिवाहन 1948 प्रारंभ
पराभव नाम संवत्सर आरंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शक दादा चांदेकर
टीम अवांतर
प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शक शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म 19 मार्च 1897 रोजी कोल्हापूर येथे संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील मिरजेच्या राजेसाहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीस होते. लहानपणीच ते वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे दादांनी मिरजेतील प्रसिद्ध संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचे शिष्यत्व पत्करले. वयाच्या बाराव्या वर्षीच ते कीर्तनात साथ देऊ लागले. 1914 मध्ये त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश केला. त्यानंतर बलवंत संगीत मंडळी, विश्वनाथ संगीत मंडळी इत्यादी नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते 15 वर्षे नाट्यसृष्टीत होते.
हेही वाचा – पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…
नंतर कोल्हापूर सिनेटोन या चित्रपट निर्मितीगृहात त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. 1935 साली भालजी पेंढारकर दिग्दर्शित कालियामर्दन या चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांना पहिली संधी मिळाली. 1937मधील प्रिन्स शिवाजी प्रॉडक्शन्सच्या स्वराज्य सीमेवर या यशस्वी ऐतिहासिक चित्रपटाचे संगीतही दादांचेच होते; परंतु त्यांचे खरे नाव झाले ते हंस पिक्चर्सच्या मास्टर विनायक दिग्दर्शित ‘ब्रह्यचारी’ या अत्यंत यशस्वी चित्रपटामुळे. या चित्रपटातील दादांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. ‘यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या, का लाजता’ हे मीनाक्षी शिरोडकर यांनी गायिलेले गाणे त्या काळी खूप लोकप्रिय झाले होते. यानंतर दादांनी लपंडाव, अर्धांगी, मोरूची मावशी, ब्रह्मघोटाळा, छाया, अमृत, सासरमाहेर इत्यादी चाळीसहून अधिक चित्रपटांना संगीत दिले. त्यांत बहुतेक मराठी आणि काही हिंदी चित्रपटही होते. ‘नटली चैत्राची नवलाई’ हे पहिली मंगळागौर या चित्रपटामधील लता मंगेशकर यांनी गायलेले त्यांचे आणखी एक लोकप्रिय गीत. जय मल्हार या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत लावणीप्रधान चित्रपटांचा पाया घातला, त्या चित्रपटातील अस्सल लावणी ढंगाचे संगीतही दादा चांदेकर यांचेच होते. काळे गोरे, ब्रह्मचारी, अशी रंगली रात्र पैजेची, जीव सरला पीळ उरला आदी नाटकांचे संगीत नियोजन त्यांनी केले. 27 जानेवारी 1976 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. नोकरीच्या तसेच व्यवसायाच्या ठिकाणी सहकारी नाराज होणार नाहीत, याची काळजी घ्या. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, त्याबाबत मार्गदर्शन कराल.
वृषभ – आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. आर्थिक प्रश्नांबाबत तुमचे जोडीदार/ भागीदार पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आत्मसात केलेले ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरू नका. कौटुंबीक वातावरण आनंदी राहील. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
मिथुन – कलात्मक छंद तणाव करू शकेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी अंतिमत: प्राप्त होईल. नव्याने गुंतवणुकीची योजना आखाल, पण त्यासाठी पूर्ण विचारांती निर्णय घ्या. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. तुम्हाला आणि जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.
कर्क – चारचौघांत वावरताना आपण काय बोलतो याकडे लक्ष द्या, तडकाफडकी शेरेबाजी केल्याने तुमच्यावर जबरदस्त टीका होऊ शकते. सहकाऱ्यांच्या बाबतीत साधे-सरळ धोरण ठेवा, नीट उत्तरे दिली नाहीत तर सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. इतर कुटुंबीयांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही, याकडे लक्ष द्या. परस्परांबाबतचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करा.
सिंह – अचानक धनलाभ झाल्याने प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. व्यवसायात नवीन माणसे जोडली जातील, जी भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, तिथे तुम्हाला सन्मान मिळेल. कुटांबातील ज्येष्ठांशी संवाद साधा, त्यांच्या समस्या जाणून घ्या.
कन्या – नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे घातक सिद्ध होऊ शकते. आज आर्थिक समस्येबाबत चिंतीत होऊ शकता, यासाठी जाणकाराचा सल्ला घेणे योग्य ठरेल. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
तुळ – घरातील ज्येष्ठांच्या आरोग्यावर अधिक खर्च करावा लागू शकतो. परंतु, यामुळे नात्यामध्ये मजबुती येईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास घरी सुख-समृद्धी आणि शांतता नांदेल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. व्यवसायामध्ये नव्या सौद्यांचे प्रस्ताव येतील, त्यावर शांतपणे विचार करूनच निर्णय घ्या.
वृश्चिक – व्यवसायात नवी आघाडी सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. घरगुती वस्तूंची बेफिकीरपणे हाताळणी करणे अडचणीत टाकू शकते. तुमचा कुणी जुना मित्र व्यवसायाबाबत सल्ला देऊ शकतो; हा सल्ला अंमलात आणला तर, धन लाभ नक्कीच होईल. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे गोधळून जाल.
मकर – मनाला ग्रासलेला विषाद काढून टाका, त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. दुसऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून गुंतवणूक केलीत तर आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. भागीदारांच्या/ जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर, नाराजी निर्माण होऊ शकते. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण जोडीदाराच्या मदतीने त्यातून मार्ग काढू शकता.
हेही वाचा – पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!
कुंभ – या राशीच्या नोकरदार जातकांना कार्यक्षेत्रात आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर करता येईल. परदेशातील व्यापाराशी संबंधित जातकांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल; याबाबत जाणकाराची मदत घ्या. कुटुंबातील ताणतणावांमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका. तसेच, स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात वेळ वाया घालवू नका.
मीन – अवतीभवतीचे लोक तुमच्याकडून खूप कामाची अपेक्षा करतील, परंतु जेवढे काम करू शकता तेवढ्याचेच वचन द्या. अशा लोकांना खूश ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. कार्य क्षेत्रात तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो; म्हणून, आज तुम्हाला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मित्र आणि नातेवाईक यांच्या सहवासात आनंदी रहाल.


