दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 30 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 20 जून 2025, वार : शुक्रवार, तिथि : नवमी 09:49, नक्षत्र : रेवती 21:44
योग : शोभन 23:46, करण : वणिज 20:37
सूर्य : मिथुन, चंद्र : मीन 21:44, सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:18
पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. इतरांच्या सांगण्यावरून गुंतवणूक केली तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्या सोडविणे, ही प्राथमिकता असली पाहिजे. आत्मविश्वास उंचावेल. वैवाहिक जीवन सुधारण्याच्या प्रयत्नांचे फळ मिळेल.
वृषभ – व्यवसायात यश मिळण्याचा दिवस आहे. संततीमुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काही कठीण प्रसंग निर्माण होतील. मात्र सहकाऱ्यांच्या मदतीने त्यातून बाहेर याल.
मिथुन – मिथुन राशीच्या जातकांना फारसे उत्साही वाटणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिडचिड होईल. आर्थिक स्तरावर यश मिळू शकेल. एखादा मित्र त्याच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी सल्ला घेऊ शकतो.
कर्क – शारीरिक आणि आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा, अन्यथा आर्थिक समस्या उद्भवू शकतात. घरातील ज्येष्ठांचा सल्ला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.
सिंह – रागीट स्वभावामुळे एखाद्या संकटात पडाल. आयुष्यातील कठीण काळात पैसाच मदत करेल. त्यामुळे गुंतवणूक करण्याचा विचार सुरू करा, नाहीतर त्रास होऊ शकतो. मुलांच्या भविष्यासाठी एखादी योजना आखण्यासाठी चांगला दिवस आहे.
कन्या – आरोग्यात सुधारणा होईल. जास्त पैसे कमावण्याचे मार्ग शोधत असाल, तर सुरक्षित आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करा. घरगुती बाबी आणि प्रलंबित घरगुती कामे निकाली काढण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल.
हेही वाचा – गोष्ट माझ्या शिरा आजीची
तुळ – कोणतेही पाऊल पुढे टाकण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती ठीक असेल. व्यवसाय विस्तारासाठी उत्तम काळ आहे. हट्टी स्वभावामुळे पालकांची शांती मात्र बिघडण्याची शक्यता आहे. छंद जोपासण्यासाठी काही वेळ मिळेल.
वृश्चिक – आर्थिक बाजू बळकट होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला पैसे उधार दिले असतील तर, ते परत मिळतील. काहीही न करता इतरांचे लक्ष वेधण्यासाठी हा चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी व्यावसायिक वृत्तीमुळे प्रशंसेला कारणीभूत ठराल.
धनु – अत्यंत उत्तम दिवस आहे. सकारात्मकता वाढेल. एखाद्या आर्थिक प्रकरणात अडकले असाल तर बाजूने निकाल येईल. आर्थिक लाभाचा दिवस. व्यावसायिकांसाठी मात्र चढ-उतार असलेला दिवस.
मकर – एखाद्या जुन्या आजारापासून आराम मिळू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि सर्जनशीलता दाखवून देणाऱ्या प्रकल्पांवर काम करण्यासाठी देखील चांगली वेळ आहे. व्यवसायातही यश मिळेल.
कुंभ – आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांच्र्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी असेल. काम आणि कौटुंबिक आयुष्यात उत्तम समतोल साधाल. काही चांगले अनुभव येतील.
मीन – आरोग्य चांगले राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अधिक भावनिक बनाल, मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायात स्थिती चांगली राहील. मात्र व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे जपून ठेवा.
दिनविशेष
जागतिक निर्वासित दिन
पूर, युद्ध, संघर्ष, साथीचे रोग अशा विविध प्रकारच्या मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक देशांतील नागरिकांना आपले मूळ स्थान सोडून दुसऱ्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो. अशा निर्वासित लोकांना जगात त्यांची स्वतःची ओळख मिळावी, या लोकांना त्यांचे हक्क मिळावेत या हेतूने 20 जून हा दिवस जागतिक निर्वासित दिन म्हणून ओळखला जातो. 20 जून 2001 रोजी पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने हा दिन साजरा केला. त्याआधी तो ‘आफ्रिका निर्वासित दिन’ म्हणून ओळखला जात होता. दरवर्षी, एक मध्यवर्ती कल्पना घेऊन हा दिवस साजरा करतात. यंदाची कल्पना आहे निर्वासितांसोबत एकजूट – अशा जगासाठी जिथे निर्वासितांचे स्वागत केले जाईल.
हेही वाचा – मालकी नव्हे, माणुसकी हवी…!