Monday, August 4, 2025

banner 468x60

Homeललित'बटाटा'प्रेमी मुंबईकर!

‘बटाटा’प्रेमी मुंबईकर!

मनोज जोशी

बटाटा… एकवेळ भाज्यांबद्दल आवडनिवड असू शकते, पण बटाटा आवडत नाही, असा विरळाच. अलीकडेच लहान-थोरांच्या आवडत्या ‘चिंटू’चे एक कार्टून प्रसिद्ध झाले होते. आईसोबत बाजारहाट करायला गेलेला चिंटू भाजीवाल्याला विचारतो, ‘अहो, या पालेभाजीऐवजी बटाटे द्याल का बदलून?’ एकूणच बटाटा हा सर्वांच्याच आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. फक्त मुंबईचाच विचार करता, या महानगरीला दरदिवशी बटाटे लागतात तरी किती? हा प्रश्न अनेक दिवसांपासून माझ्या मनातून जातच नाही.

मी कधीकाळी बटाटावडा प्रेमी होतो. त्यामुळे बटाटावड्याचे अनेक स्टॉल मी धुंडाळले आहेत. त्यापैकी अनेक पसंतीस उतरले तर, काही ठिकाणी ‘आता येथे पु्न्हा नाही,’ अशी मनाशी खूणगाठ मारली आहे. मुंबईत तर बटाटावड्याची दुकाने, स्टॉल्स आणि गाड्यांची कमतरता नाही. अगदी नाक्या-नाक्यावर बाजू-बाजूला दुकाने, स्टॉल्स पाहायला मिळतात. त्यामुळेच प्रश्न पडतो, मुंबईत दरदिवशी किती बटाट्यांचा वापर होतो. केवळ बटाटेवडेच नाहीत तर, सामोशांमध्येही बटाट्यांचा वापर केला जातो. त्यात सौराष्ट समोशांची क्रेझ आहेच. मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्टॉल्सवर बटाटेवडे, समोसे यांच्या जोडीलाच कटलेस हा प्रकार देखील असतो.

वांद्रे रेल्वेस्थानकातील चार आणि पाच प्लॅटफॉर्मवर पुलाखाली असलेला फूड स्टॉल हा अलीकडचा माझा ठरलेला ‘थांबा’ होता. तिथे आधी वडे खात होतो, नंतर सामोसा. इतर स्टॉलप्रमाणेच स्टॉलवरचे सर्वच माझ्या ओळखीचे झाले होते. एकदिवस माझ्या डोक्यातील प्रश्नाने ‘डोके’ वर काढले. त्याला विचारले, ‘दिवसभरात किती सामोशांची विक्री होते?’ त्याने सांगितलेला आकडा ऐकून मी थक्कच झालो. तो म्हणाला, ‘दिवसाला जवळपास 700!’ म्हणजे, वडे आणि कटलेस वेगळे! हाच प्रकार प्रभादेवी (पूर्वीचे एलफिन्स्टन) स्थानकावरील चर्चगेटच्या दिशेला असलेल्या फूड स्टॉलबद्दल म्हणता येईल. तिथे रगडा-पाव, बटाटावडा आणि सामोसा खाण्यासाठी खूप गर्दी दिसते. आता स्टेशनवरील स्टॉलवर काहीही तळायला बंदी घातली आहे. फक्त रगड्याचा गॅस सुरू असतो. त्यामुळे थिएटरप्रमाणे तिथेही सामोसा आणि इतर खाद्यपदार्थांचे आऊट-सोर्सिंग होते. परिणामी, त्यांची वैशिष्टे आता उरलेली नाहीत.

हेही वाचा – निद्रा… देवी की राक्षस?

हे झाले वडा-सामोशांबाबत. याच रेल्वेच्या स्टॉल्ससह शहरात सर्वत्र अनेक दुकानांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या बटाटा वेफर्सची पाकिटे लटकवलेली दिसतात. त्यातही वेगवेगळ्या फ्लेव्हरचे वेफर्स! शिवाय, बटाट्याचा चिवडा, बटाटा सळी, बटाट्याचे जाळीदार वेफर्स असे वेगवेगळे पदार्थ असतात ते वेगळे! या दुकानांच्या आसपासच एकतरी भेळीचे दुकान किंवा स्टॉल किंवा ठेला असतो. त्या भेळीसाठी, शेवपुरीसाठी लागणारा उकडलेला बटाटा, रगडा पॅटीस हे जिन्नस आहेतच. बाजूला सँडविचवाला असेल तर, सँडविचमध्ये उकडलेल्या बटाट्याचे स्लाइस किंवा मसाला टोस्टमध्ये बटाट्याची भाजी असते. अशीच भाजी मसाला डोशातही असते. अगदी मॅकडीमध्ये गेलात तरी तुम्हाला फ्रेंच फ्राईज हा बटाट्याचा प्रकार असतोच.

अनेक घरांमध्ये बटाट्याशिवाय भाजी पूर्ण होत नाही. त्यातच बटाटा भात, बटाटा पोहे, साबुदाण्याची खिचडी हे पदार्थ आहेतच. असा हा बटाटा सर्वांशीच जोडला गेलेला आहे. अनेकदा मधुमेहींनी बटाटा खाणे टाळावे, असे म्हटले जाते. पण आसपास बटाट्याचे इतके पदार्थ असतील तर, करायचे काय?

हेही वाचा – माझा मोबाइल चोरीला गेला अन्…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!