Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधआजचे पंचांग आणि दिनविशेष : 29 मे 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष : 29 मे 2025

दर्शन कुलकर्णी

 

आज, भारतीय सौर : 8 ज्येष्ठ शके 1947

अर्थात,

दिनांक : 29 मे 2025

वार : गुरुवार

तिथि : तृतीया 23:18

नक्षत्र : आर्द्रा 22:38

योग : शूल 15:46

करण : तैतील 12:32

सूर्य : वृषभ

चंद्र : मिथुन

सूर्योदय : 06:00

सूर्यास्त : 19:11

पक्ष : शुक्ल

मास : ज्येष्ठ

ऋतू : ग्रीष्म

सूर्य अयन : उत्तरायण

संवत्सर : विश्वावसू

शालिवाहन शक : 1947

विक्रम संवत : 2081

युगाब्द : 5127

महाराणा प्रताप जयंती (तिथीनुसार)

रंभा व्रत


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


दिनविशेष

ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म 29 मे 1905 रोजी मिरज येथे झाला. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीम खाँ आणि ताराबाई माने यांच्या त्या कन्या. हिराबाईंनी पुण्याच्या हुजूरपागा शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांचे सुरुवातीचे संगीताचे शिक्षण ताराबाईंकडे आणि मोठे बंधू सुरेशबाबूंकडे झाले. 1918 ते 1922 या काळात अब्दुल वहीद खाँ यांच्याकडून हिराबाईंना किराणा घराण्याची रीतसर तालीम मिळाली. मुंबईत 1921 साली झालेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत परिषदेमध्ये हिराबाईंचे पहिले जाहीर गायन झाले. 16 वर्षे वयाच्या हिराबाईंनी तेव्हा पटदीप हा राग गायला. अर्थार्जनासाठी गिरगाव टेरेसेस या इमारतीत त्यांनी ‘नूतन संगीत विद्यालय’ सुरू केले होते. तर, 1922पासून त्यांनी स्वतंत्र जलसे करायला सुरुवात केली. मैफलीत गाणे गाणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. 1923 साली एचएमव्हीने (हिज मास्टर्स व्हॉइस) हिराबाईंची ‘जया अंतरी भगवंत’ ही मराठी भजनांची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. त्याचबरोबर ‘सखी मोरी रुमझुम’ ही हिंदी ध्वनिमुद्रिकाही काढली. त्यांच्या या ध्वनिमुद्रिकांना खूप लोकप्रियता लाभली. 1928पासून त्यांनी आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून गाण्यास सुरुवात केली. आकाशवाणी आणि ध्वनिमुद्रिका यातून ख्यातनाम झालेल्या हिराबाईंचे 20 नोव्हेंबर 1989 रोजी निधन झाले.

प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकर

स्नेहल भाटकर यांचे मूळ नाव वासुदेव गंगाराम भाटकर होते. 17 जुलै 1919 रोजी प्रभादेवी येथील पाटील वाडीत त्यांचा जन्म झाला. शिक्षिका असलेल्या आई सखुबाई यांच्या सुरेल आवाजामुळे स्नेहल भाटकर यांना लहानपणीच गाण्याची गोडी लागली. घराजवळच्या मारुती मंदिरातील होणाऱ्या भजनात ते पेटी वाजवत असत. श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी गाण्याचे धडे गिरवले. 16 जून 1939 रोजी ते एचएमव्ही कंपनीत ते पेटीवादक म्हणून रुजू झाले आणि तोच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. बाबूराव पेंटर यांच्या ‘रुक्‍मिणी स्वयंवर’ या चित्रपटाद्वारे भाटकर यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाला सुधीर फडके आणि भाटकर यांचे संगीत असल्याने संगीतकार म्हणून ‘वासुदेव-सुधीर’ असे नाव दिले होते. एचएमव्हीतील नोकरीमुळे त्यांनी ‘स्नेहल’ या टोपणनावाने चित्रपटांना संगीत दिले. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. ‘हमारी याद आयेगी’ चित्रपटामधील ‘कभी तनहाइयों में यूं, हमारी याद आयेगी’ हे त्यांचे सर्वाधिक गाजलेले गाणे. अभिनेते राज कपूरचा नायक म्हणून ‘नीलकमल’ हा पहिला चित्रपट. या चित्रपटात राजकुमारीने गायलेल्या एका गाण्यातील दोन ओळी राज कपूरच्या तोंडी होत्या. या ओळी स्नेहल भाटकर यांनी गायलेल्या आहेत. मधुबाला, गीता बाली, नूतन, तनुजा या नायिकांच्या पहिल्या चित्रपटांना त्यांनीच संगीत दिले होते. 29 मे 2007 रोजी ते काळाच्या पडद्याआड गेले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!