Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधआजचे पंचांग आणि दिनविशेष : 26 मे 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष : 26 मे 2025

दर्शन कुलकर्णी

 

आज, भारतीय सौर : 5 ज्येष्ठ शके 1947

अर्थात,

दिनांक : 26 मे 2025

वार : सोमवार

तिथि : चतुर्दशी 12:12

नक्षत्र : भरणी 08:23

योग : शोभन 07:01

करण : चतुष्पाद 22:22

सूर्य : वृषभ

चंद्र : मेष 13:41

सूर्योदय : 06:01

सूर्यास्त : 19:10

पक्ष : कृष्ण पक्ष

मास : वैशाख

ऋतू : वसंत

सूर्य अयन : उत्तरायण

संवत्सर : विश्वावसू

शालिवाहन शक : 1947

विक्रम संवत : 2081

युगाब्द : 5127

दर्श अमावस्या

सोमवती अमावस्या

शनैश्चर जयंती


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


दिनविशेष

श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी

श्रेष्ठ नाटककार आणि कवी राम गणेश गडकरी यांचा जन्म 26 मे 1885 रोजी गुजरातमधील नवसारी येथे झाला. किर्लोस्कर नाटक कंपनीच्या नाटकांमध्ये काम करणार्‍या मुलांचे मास्तर म्हणून त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर 1909-10 या काळात ते पुण्याच्या ज्ञानप्रकाशात उपसंपादकही होते. तर, नाटकासाठी पदे रचण्याच्या निमित्ताने 1910मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीशी राम गणेश गडकरी पुन्हा एकदा जोडले गेले. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी ‘मित्रप्रीती’ हे पहिले नाटक लिहिले. तर, 1909मध्ये ‘अल्लड प्रेमास’ ही पहिली कविता त्यांनी लिहिली. 1909-1918 या काळात त्यांनी ‘गोविंदाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन केले. सुमारे 150-160 कविता त्यांनी लिहिल्या. ‘वाग्वैजयंती’ हा त्यांचा काव्यसंग्रह त्यांच्या निधनानंतर 1921 साली प्रसिद्ध झाला.  1913मध्ये त्यांचे ‘प्रेमसंन्यास’ पहिले नाटक रंगभूमीवर आले. त्यापाठोपाठ त्यांची ‘पुण्यप्रभाव’ (1917), ‘एकच प्याला’ (1919), ‘भावबंधन’ (1920) ही नाटके रंगभूमीवर आली. 23 जानेवारी 1919 रोजी निधन झाले.

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. रजनीकांत आरोळे

जामखेड येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि डॉक्टर रजनीकांत शंकरराव आरोळे यांचा जन्म 18 सप्टेंबर 1934 रोजी राहुरी, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे झाला. आरोग्यसुविधा गोरगरिबांपर्यंत पोहचवण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. 1970 साली जामखेडच्या ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी त्यांनी ग्रामीण आरोग्य प्रकल्प सुरू केला. कोठारी कुटुंबीयांनी दान दिलेल्या सात एकर जमिनीवर त्यांनी हा प्रकल्प राबवत अनेक गरिबांना मोफत आरोग्यसेवा पुरविली. प्रामुख्याने कुष्ठरोग, क्षयरोग, आदिवासी भागातील बाळंतपणानंतरचे जंतूसंसर्ग तसेच कुपोषण यावर त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. 26 मे 2011 रोजी त्यांचे पुणे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!