Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » …अन् आम्हीही आमची जबाबदारी उचलली
    ललित

    …अन् आम्हीही आमची जबाबदारी उचलली

    Team AvaantarBy Team AvaantarApril 13, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, दनू, पिदू, अमेरिका,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिप्ती चौधरी

    आमच्या पप्पांची बदली अमेरिकेला झाली आणि सगळं चंबूगबाळं उचलून त्या अनोळखी जगात स्थलांतराची तयारी सुरू झाली… कोरोना या जागतिक महामारीमुळे त्यावेळी जरी विमानसेवा सुरू असली तरी, खूप कमी प्रमाणात. Cargo विमानाने जसे सामान पाठवतात, तसे आम्हाला एकट्याला पाठवण्याचा पर्याय होता. सामानाची ने-आण करणाऱ्या विमानातही खास प्राण्यांना ठेवण्यासाठी वातावरण नियंत्रित कप्पा असतो. तिथून प्रवास करायचा… पण त्यासाठी देखील आगाऊ बुकिंग करावे लागते.

    कुठल्याही विमान प्रवासाआधी प्राण्यांची शारीरिक तपासणी करून ‘fit to fly’ असे प्रमाणपत्र प्राण्यांच्या डॉक्टरकडून घ्यावे लागते. मग विमानतळावरील कस्टमच्या कचेरीत जाऊन सर्व कागदपत्रे दाखवून, मायक्रोचीप तपासून त्यांच्या काही औपचारिकता पार पाडाव्या लागतात. हे सर्व विमान प्रवासाच्या बरोबर सात ते आठ दिवस आधी करायचे असते.

    आमचे सर्व कायदेशीर पूर्ततेकरिता, प्राण्यांच्या स्थलांतरासाठी मदत करणारी एक एजन्सी निवडली होती. आमचे बुकिंग आणि सर्व सोपास्कार पूर्ण करण्यासाठी ते मदत आणि मार्गदर्शन करणार होते. त्यांना परिस्थिती समजत होती. पण विमान सेवेकडून काही कळत नसल्याने तेही हतबल झाले होते. आम्हाला सवय व्हावी, या उद्देशाने प्रवासासाठी लागणारे मोठे पिंजरे त्यांनी आधीच घरी आणून ठेवले.

    एक आठवडाआधी होणारी कस्टमची औपचारिकता आपल्या जबाबदारीवर पार पाडू शकतो, असे या एजन्सीने सांगितले. कारण तिथे आम्हाला पिंजऱ्यातून बाहेर काढावे लागत नाही, पण जेव्हा विमानात बसवायची वेळ असते तेव्हा ज्या मोठ्या पिंजऱ्यातून आम्ही प्रवास करणार त्या पिंजऱ्यातून काढून ते पिंजरे X-rayसाठी पाठवावे लागतात. त्यावेळी एकवेळ कुत्रा शांत बसतो, पण मांजराचा भरोसा नाही… मुद्दा अगदी बरोबर होता… कदाचित आधी काही भीषण अनुभव त्यांना आलेही असतील! पण आईचं म्हणणं होतं की, ती जरी त्या ठिकाणी हजर असली तरीही आमचा भरोसा नाही… त्यामुळे तिची अशी योजना होती की, आम्हाला आमच्या छोट्या पिंजऱ्यातून घेऊन जायचे मोठ्या पिंजऱ्याची तपासणी झाली की, मग आमचे छोटे पिंजरे मोठ्या पिंजऱ्याच्या आत उघडायचे. ही कल्पना त्यांना पसंत पडली आणि ते जबाबदारी घ्यायला तयार झाले. ते म्हणाले, तुमचं बुकिंग करा… जर माऊचे उशिरा झाले तर आम्ही त्यांना विमानात बसवून देऊ.

    हेही वाचा – अमेरिकेला तर जायचंय, पण कसं?

    पण जर आई आधी गेली तर आम्ही राहणार कुठे… यासाठी आईचा इतर कोणावरही विश्वास नव्हता… फक्त एकच व्यक्ती तिला दिसत होती, ती म्हणजे डॉ. इरफान अहमद. कोरोना काळात बहुदा त्यांची कॅटरी बंद होती, पण त्यांच्याशी बोलून बघूया म्हणून फोन लावला. त्यांनी सगळं ऐकून घेतले… त्यांना प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले… क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले, “तुम्हाला जे लवकरात लवकर विमान मिळेल, ते बुक करा आणि निघून जा… परिस्थिती झपाट्याने बिघडत आहे… तुम्ही हा देश सोडल्यापासून जोपर्यंत हे दोघे विमानात बसत नाहीत, तोपर्यंत त्या दोघांची संपूर्ण जबाबदारी माझी! विमान प्रवासाच्या दिवशीही त्यांची विशेष काळजी, त्यांचा आहार सगळं मी बघून त्यांना सुखरूप बसवून देईन तुम्ही निश्चिंत रहा…” देव किती रुपांनी मदतीला उभा ठाकतो! त्याचे काय आभार मानणार…

    माणसांचे बुकिंग दहा दिवसांनंतरचे पक्के केले. तारीख ठरली 22 एप्रिल. इतक्यात आमचेही बुकिंग पक्के झाले… त्यानंतर पाचच दिवसांत आम्हीही निघणार होतो, 27 एप्रिलला. त्यामुळे आईला एक बरे वाटले की, जास्त दिवसांचा विरह नाही… आम्ही पाठोपाठ निघणार आहोत.

    आता अक्षरशः रणधुमाळी उडाली होती, कारण जी आवराआवर आम्ही एक महिन्यात करणार होतो, ती दहा दिवसात करायची होती! सामानाची बांधाबांध सगळ्यात मोठी होती. कारण आम्ही काही प्रवासाला जाऊन परत येणार नव्हतो… आम्ही कायमचे घर सोडून चाललो होतो. त्यामुळे प्रत्येक वस्तूची विभागणी करून मार्गी लावायची होती. काही महत्त्वाच्या वस्तू आमच्याबरोबर येणार होत्या, काही पॅकर्समार्फत अमेरिकेला पोहोचणार होत्या. काही अमेरिकेला न्यायच्याच नव्हत्या म्हणून त्या दुसऱ्या पॅकरमार्फत गावाला पाठवून द्यायच्या होत्या. काही इथेच कलोनजी, नमिता आणि इतरांना वाटून टाकायच्या होत्या आणि काही चक्क फेकून द्यायचा होत्या.

    दिवस-रात्र हीच विभागणी चालू होती. त्यात आमचीही तयारी सुरू होती. रेबीजचे इंजेक्शन दिल्याचे प्रमाणपत्र एका विशिष्ट स्वरूपात हवे होते, त्यासाठी डॉक्टरकडे जाऊन ते आणले. प्रवासासाठी पाणी पिण्यासाठी चाटून पिता येतील अशा बाटल्या… आम्हाला त्यातून पाणी पिण्याचे शिकवण्याचा अयशस्वी प्रयत्न… त्यात आई आणि दिदीने असे वाचले की, विमान प्रवासाआधी माऊ थोडी धीट करावी… म्हणजे कमी घाबरेल. थोडी बाहेर फिरवून इतर माणसांचे आवाज, वास, गडबड असे अनुभव करू द्यावे.

    हेही वाचा – मांजर पाळले, असे खोटे बोलू नका!

    मला बाहेर नेण्याचा अनुभव त्या दोघी विसरल्या नव्हत्या! म्हणून त्यांनी दनूला पहिलं नेण्याचे ठरवले. पहिल्या दिवशी दनू एकदम शिस्तीत होता. त्याच्या पिंजऱ्यात ओरडत बसला, पण बाहेर निघाला नाही. त्यामुळे यांचा आत्मविश्वास भलताच वाढला त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढायचे ठरवले. साहेब दबकत-दबकत बाहेर निघाले. भिंतीच्या कडे-कडेने हळूहळू  निघाले. माझ्याबरोबरच्या अनुभवातून पट्टा खेचायचा नाही, हे त्या शिकल्या होत्या म्हणून त्याच्या पाठी निघाल्या. दनूने हळूच मोर्चा एका गाडीखाली वळवला… तो बहुदा गाडीखाली बसेल असे वाटून त्या आरामात बघत होत्या. इतक्यात दनूच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या! त्याने सरळ खालून गाडीच्या इंजिनात वर चढण्याचा पवित्रा घेतला! आता मात्र त्यांचे धाबे दणाणले! पट्टा टाकून दोघी मातीत पूर्ण आडव्या झाल्या… घाईघाईने सरपटत गाडीखाली शिरल्या आणि त्याला पकडून खाली खेचला. सरळ पिंजऱ्यात घातला आणि घर गाठलं! आधीच इतका गोंधळ सुरू होता की, आमचे कुठलंही कांड निस्तरायची ताकत कोणाकडे नव्हती! त्यामुळे आम्हाला काही शिकवण्याचा आगाऊपणा त्यांनी ताबडतोब सोडून दिला!

    आई, दिदी आणि दादा सारेच जण खूप-खूप काम करत होते. आईच्या खालोखाल दिदी सारी जबाबदारी उचलू बघत होती, पण तरीही आई खूप ताणाखाली होती. रात्री झोपतानाही डोक्यात सतत कामाची चक्र फिरत असत… या सगळ्यात आम्हीपण आमची जबाबदारी उचलली…

    रात्री आईला शांत झोप लागावी म्हणून मी पायाशी झोपून तिचे लाड करायचो आणि दनू डोक्याशी बसून तिचे डोकं चाटत राहायचा……!

    हेही वाचा – डॉ. इरफान अहमद यांच्याशी ऋणानुबंध

    क्रमशः

    (पिदू या मांजराची आत्मकथा)

    diptichaudhari12@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn