Friday, February 27, 2026

banner 468x60

Homeअवांतरकरिअर हा शब्द अफूसारखा बनलाय!

करिअर हा शब्द अफूसारखा बनलाय!

श्रीकृष्ण काळकर

आजची तरुणाई करिअर आणि त्यातून मिळणारा पैसा, याच्या मागे लागली आहे, असे चित्र आहे. करिअर म्हणजे अनेक मोठया पदव्या आणि त्या ‘भाड्याने’ देऊन मिळणारा लठ्ठ पगार! तो पगार मिळवण्यासाठी अर्ध आयुष्य बिनालग्नाचे व्यतित होते! त्याचसंदर्भातील या कथा –


बबड्या अजून लहान आहे!

कोणत्याही महानगरातील मोठया शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती. त्रिकोणी कुटुंब. आई वडील या दोघांनाही लठ्ठ पगार. त्या दोघांच्या इच्छा-आकांक्षा केंद्रित झाल्यात बबड्यावर. त्यांच्याकडे दरमहा इंग्रजी दैनिके, पाक्षिके, मासिके आणि बबडयासाठी कॉमिक्स भरपूर येत असत.

रद्दीवाला प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडून येऊन रद्दी गोळा करून जायचा. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा असायचा. बबड्याच्या वयाचा. तो पण वडिलांना रद्दीचा गठ्ठा उचलायला मदत करायचा. कामाचा व्याप वाढला तसं त्याने लहान भावाला मदतीला घेतले. बबड्या पुस्तकातून शिकत होता. हा जगाच्या व्यवहारातून! दहावीत बबड्याची सायकल बिघडली, ती भंगारात विकली. रद्दीवाल्याच्या मुलाने ती दुरुस्ती केली आणि वापरू लागला. अजून दुसरा भाऊ रस्ताच्या कडेला बसून सायकली दुरुस्त करू लागला.

बबड्या इंजिनीअर झाला, तो अमेरिकेत गेला. बबड्याला स्थळ आली, त्याचे आईवडिल म्हणाले, ‘तो लहान आहे. अजून शिकतोय.’ दुसरीकडे, रद्दीवाल्याच्या मुलाने एक गाळा विकत घेतला. विशीत त्याच्या आई-वडिलांनी त्याचं लग्न उरकले.

बबडया अमेरिकेत करिअरच्या पायऱ्या चढत होता. लग्नाला त्याच्या लेखी किंमत नव्हतो. त्याला तुरळक मुली सांगून आल्या, पण त्या त्याच्या इतक्या कमवत नव्हत्या. म्हणून तो मुली नाकारात होता. बबडया देशात आला. आता तो चाळीशी तला बाप्या दिसत होता. तर इकडे, रद्दीवाल्याच्या मुलाने बबड्याच्या सोसायटीत थ्री बीएचके फ्लॅट घेतला. एक मोठा ट्रक विकत घेतला. आपल्या मुलाच्या लग्नाला बबड्याला बोलावलं. बबड्याच्या बरोबरीच्या मुलांची मुलं लग्न करीत होती. बबड्या बिनलग्नाचा होता.

बबड्या अजून लहान आहे…

हेही वाचा – आई-वडिलांचे कष्ट अन् मुलांची संवेदनशीलता


 बनी ऐकत नाही!

एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी. वडील सरकारी नोकर. आई गृहिणी. एकत्र कुटुंबातून विभक्त झालेली. खूप सोसलं, इच्छा आकांक्षांना सतत मुरड घातली. मौजमजा माफकच! बनी मुळातच हुशार. विविध स्पर्धेत बक्षिसे मिळवायची. पण घरात इकडची काडी तिकडे करायची नाही. बनी आयटोत इंजिनीअर झाली. पॅकेज मिळालं, वडिलांच्या पेक्षा जास्त पगाराचं! दोन वर्षांकरिता बनीला अमेरिकेत जॉब मिळाला. तिच्या आईला स्वर्ग दोन बोट उरला… बनीला मागणी आली, आईने फेटाळून लावली… सांगायची, ‘बनी ऐकत नाही.’

त्यांच्या शेजारी एक कुटुंब होतं, त्याना बनीच्या वयाची मुलगी होती. त्यांची परिस्थिती साधारण होती. घरातले सर्वजण काम करून संसारात आनंदी होते. ती मुलगी अभ्यासात साधारणच होती, पण कामाला वाघ होती. पैसे मिळवण्यासाठी ती अनेक प्रयत्न करीत होती. एका निर्व्यसनी होतकरू मुलगा बघून तिच्या आई-वडिलानी तिचे लग्न लावून दिले. सुरुवातीला कामगाराना डबे देण्यास सुरुवात केली. घरत सासू, सासरे, नणंद दीरांची साथ लाभली. तिचं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठे हॉटेल उभे राहिले.

बनी भारतात आली. तिला स्थळं सांगून येत होती. तिच्या आईच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यांना एकही स्थळ पसंत पडत नव्हतं. बनो चाळीशीत आली होती. एक दिवस ती गायनाकॉलाजीस् कडे गेली होती. मोहाच्या बेसावध वेळी तिला गर्भ राहिला होता. तेवढ्यात ती हॉटेल मालकीण आपल्या मर्सिडीजमधून नुकत्याच लग्न झालेल्या मुलीची प्रेग्नन्सी टेस्ट करायला आली होती.

तिला बघताच बनी आर्श्चयचकीतच झाली. आपल्यापेक्षा सामान्य असलेली मुलगी आज एवढी श्रीमंत झाली! तिचा संसार फुलला आणि आपला? ती तिरमिरीत उठली… माझ्या आयुष्याचं मातेरे का केलंय? याचा आईला जाब विचारायला गेली.

हेही वाचा – Unreasonable expectations : मुला-मुलींचे विवाह का रखडतात?


निसर्गाचे नियम

एक शेतकरी होता. परंपरागत शेती करणारे त्याच्या लेखी वेडे होते. मान्सून पूर्व नांगरणी करणे, त्याला मूर्खपणा वाटत होता. त्याने निम्मा पावसाळा गेल्यावर पेरणी केली आणि त्याच्या हातात पिक आलं नाही. तो आत्महत्या करायला निघाला, पण गावातील लोकांनी त्याला अडवलं. गावातील मोठ्या लोकांनी त्याला समजावलं निसर्गाचे नियम समजावून सांगितले… मान्सूनव्या पावसावर शेती अवलंबून आहे. निसर्गाच्या नियमांप्रमाणे वागून शेती करावी लागते.

आजच्या तरूण-तरुणींची अवस्था त्या अतिशहाण्या शेतकऱ्यासारखी झाली आहे. वयाची तिशी ओलांडली तरी मुली लग्न करायला तयार नाहीत. तीच अवस्था मुलांची. मुलींनी 23 वयापर्यंत आणि मुलानी 26 वर्षांपर्यंत लग्न करणे गरजेचे आहे आणि ते टिकवणे पण तेवढेच आवश्यक आहे. सशक्त संस्कारीत प्रजा निर्माण करणे, ही या पिढीचे दायित्व आहे, जबाबदारी आहे. पण, करिअर हा शब्द यांच्यासाठी अफूसारखा बनला आहे, हे दुर्दैव.


मोबाइल – 8600998065

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!